sayali
unread,Apr 23, 2013, 2:47:47 AM4/23/13Sign in to reply to author
Sign in to forward
You do not have permission to delete messages in this group
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to nirma...@googlegroups.com, NIRMAN 4 Googlegroup, nirm...@googlegroups.com, nirman...@googlegroups.com, nirman-a...@googlegroups.com, nirman_m...@googlegroups.com, nirmaan...@googlegroups.com
प्रिय सर्व,
नुकतेच आम्ही दुष्काळी भागात काम करण्यासाठी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार ह्या तालुक्यात जाउन आलोत. त्यात जिल्हाधिकारी केंद्रेकर, तहसीलदार, बी. डी. ओ. व काही स्वयंसेवी संस्थांशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले कि रोजगार, चारा छावण्या इत्यादींवर काम करण्याबरोबरच दोन प्रकारच्या एक्स्पर्टिजची गरज भासते आहे -
१. सिव्हिल इंजिनियर्स किंवा water harvesting तज्ञ
२. डॉक्टर्स - विशेषता महिला, मुले व म्हाताऱ्या माणसांच्या आरोग्य समस्या निवारण करण्यासाठी
निर्माणच्या आपल्या समुहात अनेक डॉक्टर्स आणि सिविल इंजिनियर्स आहेत, त्यांनी १ -२ दिवस दिलेत तरी खूप मदत होऊ शकेल. तसेच ह्या संपूर्ण प्रोसेस मधून आपल्याला स्वत:च्या शिक्षणाचे डायरेक्ट application करण्याची व शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच दुष्काळी भागातील समाज जीवन, प्रश्न समजून घेण्याची व अनुभवण्याची मोठी शक्यता आपल्याला प्राप्त होइल.
आपल्यापैकी ज्या लोकांना ह्या उपक्रमात भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर माझ्याशी ९२ २ ९ ३ ७ ८ ८ ४ ह्या नंबरवर संपर्क करावा (फोन न लागल्यास मेसेज करावा :) )
--
sayali (A +ve)