पर्यावरणीय शौचालय शिकण्याची संधी, आणि इतर…

2 views
Skip to first unread message

Mukta Navrekar

unread,
Jul 29, 2014, 7:43:57 AM7/29/14
to nirman-north...@googlegroups.com, nirman...@googlegroups.com, nirmaan...@googlegroups.com, nir...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com
नमस्कार !
आपला जळगावचा मित्र दीपक पाटील हा जामनेर तालुक्यातील सोनाळे गावात काम करतो. आम्ही काही जण त्या गावात शाळेतल्या मुलांसाठी कार्यक्रम घ्यायला गेलो होतो. त्यावेळी गावातल्या महिलांशी बोललो, तेव्हा शौचालय ही त्यांची मोठी गरज आहे असं लक्षात आलं. या गावात शौचालय बांधणीचं काम सुरु करावं हे ठरलं. या कामाचे २-३ भाग आहेत. या विषयाच्या सामाजिक, तांत्रिक, सरकारी अशा अनेक बाजू आहेत. ज्यांना त्यातील काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्याचं या उपक्रमात स्वागत ! तसंच गावात, शाळेत, महिलांमध्ये जर कोणाला काही अभ्यास, काम किंवा प्रयोग करायचे असतील तर त्यांनीही जरूर सहभागी व्हावं. या कामाचे ढोबळ टप्पे पुढील प्रमाणे असतील -

१. गावकर्यांची मिटिंग -
उद्देश - गावातील स्वछातेची आणि शौचालयांची सद्य:स्थिती समजून घेणे आणि खात देणाऱ्या शौचालयाची (  Twin pit latrine ) माहिती देणे. सरकारी योजनेची माहिती देणे. आत्तापर्यंत काम का होऊ शकलं नाही हे जाणून घेणे. 
अपेक्षित सहभागी - गावकरी (विशेषतः महिला),  ग्राम  पंचायत आणि पंचायत समिती प्रतिनिधी 

२. सर्व्हे 
उद्देश - सुरुवातीला ज्या घरी शौचालय बांधायची आहेत अशा घरांचा प्राथमिक सर्व्हे. (यात उपलब्ध जागा, पाणी, मातीचा प्रकार आणि इतर आवश्यक गोष्टी असतील )
अपेक्षित सहभागी - दीपक, ग्राम सेवक, इतर स्वयंसेवक 

३. शौचालय प्रशिक्षण -
सोनाळे व आजूबाजूच्या गावातील गवंड्यांना या इको toilet चे शास्त्रीय प्रशिक्षण देणे. इ 
अपेक्षित सहभागी - गवंडी, पंचायत समिती प्रतिनिधी, निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे कार्यकर्ते. 
(civil engineer / architect friends are most welcome)


४. गावात शौचालय बांधणीची सुरुवात
(civil engineer  / architect friends are most welcome)

या टप्प्यांमध्ये गरजेनुसार थोडेफार बदल होऊ शकतात. तसेच संपूर्ण स्वच्छता या विषयावर गावकर्यांसोबत एखादं  शिबीर किंवा सफाई जत्रेचं आयोजनही करता येईल. पथनाट्य, प्रभातफेरी, पोस्टर्स  इ. माध्यमांचाही वापर करता येईल. ज्यांना या विषयाची सामाजिक बाजू अभ्यासायची आहे त्यांना ही संधी आहे !

या कामाची ऑगस्टमध्ये सुरुवात होईल. (अंदाजे १५ ऑगस्ट नंतर).  या संपूर्ण प्रक्रियेत ज्यांना पूर्ण वेळ किंवा थोडा वेळ सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर संपर्क करावा. काही नवीन कल्पना असतील तर त्याही नक्की शेअर करा :-)

संपर्क - दीपक 9403553683                       
मुक्ता -9405177106                      
प्रफुल्ल - 9420650484

--

जय जगत्
“Boundaries break when people walk,
Barriers break when people talk !!"
Reply all
Reply to author
Forward
0 new messages