---------- Forwarded message ----------
From:
Kalyan Tanksale <kalyant...@gmail.com>
Date: 2013/6/4
Subject: Re: [Nirman] Re: एका गावाच्या पाण्याचे संपूर्ण नियोजन समजून घेण्याची सुवर्ण संधी
To:
nirman...@googlegroups.comCc:
nirm...@googlegroups.com, NIRMAN 4 Googlegroup <
nirm...@googlegroups.com>,
nirman-a...@googlegroups.com, nirman_mumbaikar <
nirman_m...@googlegroups.com>,
nirmaan...@googlegroups.com
दोस्तो,
संतोष आणि जयश्रीने यांविषयी जास्त माहिती सांगणच योग्य ठरेल.
परंतू हे काम ईतर काही गावांत केलं जात असतांना सहभागी होण्याची आणि पुढे ते स्वतःच करण्याची संधी मिळाल्यामुले मला यांविषयी थोडी माहिती आहे. शिवाय काल संतोष सोबत बोलणं झालं. त्या आधारे काही तपशील देण्याचा प्रयत्न करतोय (अर्थात उत्सुकता वाढवण्या पुरताच ! संतोषने काय विचार केलाय हे त्याच्याकडून समजून घ्यावं)
एक आठवडाभर त्या गावामध्ये 'सूक्ष्म नियोजन' (Micro-Planning) केले जाणार आहे, प्रक्रिया ५ जून पासून सुरु होईल. यशदाने प्रशिक्षित केलेले Facilitators ही प्रक्रिया घडवून आणतील. खरं तर ते PRA (Participatory Rural Appraisal) करणार आहेत, परंतू प्रक्रियेला अधिक Authentic आणि गावकऱ्यांना तसेस स्थानिक शासकीय कर्मचारी, तालुका पातळीवरील विकास प्रशासनातील (Line Departments Under CEO, like Health, Education etc) अधिकारी यांना अधिक Accountable बनविण्याचा यामध्ये अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.
कार्यक्रमात सर्वसाधारणपणे पुढील घटक असू शकतात: (१) प्राथमिक गावं बैठका, प्रभात फेरी, मशाल फेरी, शिवार फेरी (२) गावाचे काही नकाशे बनवणं-उदा. संसाधनं नकाशा, सामाजिक नकाशा, (३) वेगवेगळया समाज गातांसोबत आणि संबंधित विषयाशी संलग्न शासकीय प्रतिनिधींच्या एकत्र बैठका, (४) गावामध्ये कोणत्या विकास कामांची आवश्यकता आहे (उदा. पायाभूत सुविधा, शेती सुधारणा, जंगल आणि पशुधन संवर्धन इत्यादी), (५) शासकीय योजनाच्या आणि सेवा पुरवण्यासंबंधी ग्रामस्थांच्या तक्रारीची चर्चा, (६) आवश्यकते नुसार सर्व्हे (७) पुढील वर्षाचा आणि आणखी पाच वर्षाचा नियोजन आराखडा यातून तयार करणं (८) आराखड्याला मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभा, (९) महिलांची विशेष ग्रामसभा.
दुष्काळाची समस्या लक्षात घेता संतोष कदाचित जल संवर्धनाची कामं अजेंड्यावर आणण्याचा कदाचित प्रयत्न करेल. आणि ते योग्यच आहे.
अशा प्रकारे तयार झालेल्या सूक्ष्म नियोजन अहवालाला शासकीय पातळीवर एक प्रतिष्ठा आहे. शिवाय या प्रक्रियेत शासकीय प्रतिनिधी आणि गावकरी एकत्र येवून पुष्कळ काम करतात (असा अनुभव आहे), त्यामुळे त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचं नातं निर्माण होऊ शकतं. ज्याची पुढे खुपच मदत होते.
संतोषला ही सगळी प्रक्रिया पाहून तीचं Documentation करण्यासाठी मदत हवी आहे. ग्रामीण विकासांत विशेष आवड/आस्था असणाऱ्या आणि दिशा शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहकाऱ्यांनी जरूर जावून यावं. मात्र पूर्ण ७-८ दिवस तिथे राहिलं तरच त्यांचा उपयोग होईल.
या संदर्भात मी एक संशोधन करतो आहे. कुणाला Advocacy च्या दिशेने प्रयत्न करायचे असतील तर स्वागत आहेच !
@ संतोष, मित्रा काही चुकलं असेल तर दुरुस्त कर.
आपला,
कल्याण