दुष्काळी भागात काम करण्यासाठी पहिली बॅच तयार

1 view
Skip to first unread message

sayali

unread,
Apr 2, 2013, 2:11:11 AM4/2/13
to nirmaan...@googlegroups.com
प्रिय सर्व,

युक्रांद व पुण्यातील इतर अनेक संस्थांनी मिळून दुष्काळी भागात काम करण्यासाठी एक कृती कार्यक्रम तयार केला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रांद व निर्माणच्या युवकांनी दुष्काळीभागाचा दौरा केला होता. त्यावेळी जालना व बीड मधील कलेक्टर व सामाजिक संस्थांशी झालेल्या बोलण्यावरून खालील कामे पुढे आलीत. ह्यामध्ये कुठलीच कामे श्रमदानाची नाहीत. 

1. प्रत्येक गावात Tanker च्या नेमून दिलेल्या फेऱ्या होत आहेत कि नाही ह्याचे ऑडिट करणे 
२. बारा हजार लिटर क्षमता असलेल्या Tanker मध्ये पाणी पुर्ण भरलेले आहे कि अर्धवट भरलेले Tanker आणले जात आहेत ह्याचे ऑडीट करणे  
३. गाळ काढणे, चार खणणे अशी अनेक कामे असून सुद्धा मजुरांकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना कामावर जाता येत नाही. त्यांना जॉब कार्ड काढून देण्यात मदत करणे. 
४. तसेच रोजगार हमी मजुरांची मजुरी बँक अकाउण्ट मध्ये जमा होणार आहे पण लोकांकडे बँक अकाउण्ट नाही ते काढून देणे. 
५. ज्याप्रमाणे Tanker चे ऑडीट करणे महत्वाचे आहे त्याच प्रमाणे चारा छावण्यांचे देखील ऑडीट करणे गरजेचे आहे. तसेच गरजेपुरत्या चारा छावण्या आहेत कि अजून सुरु करण्याची गरज आहे हे सुद्धा तेथील अधिकाऱ्यांना सुचवणे हे मोठे काम असू शकते. 

तेथील अधिकाऱ्यांशी बोलण्यावरून हे लक्षात आले कि फ़िल्ड्वरिल feedback त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची अत्यंत गरज आहे. तसेच तेथील स्वयंसेवी संस्थांवर त्यांचा पुर्ण विश्वास असून त्यांच्याकडून आलेल्या recommendation वर ताबडतोप काम करण्याची त्यांची तयारी आहे. 

ह्या दुष्काळामध्ये निधीची गरज कमी असून लोकांनी वेळ देण्याची गरज अधिक जाणवते आहे. 

काम करण्यासाठी बीड मधील शिरूर तालुक्यातील २-३ गावे निवडली आहेत. तसेच जालना शहरात देखील काम होणार आहे. 

आपल्यापैकी ज्या लोकांना किमान ४ दिवस देणे शक्य आहे त्यांनी ह्या Xcel sheeT मध्ये आपले नाव व कधी व किती वेळ देणे शक्य आहे हे लिहावे. त्यानुसार  बॅचेस करून आपण लोकं पाठवू शकू.
 


तेथे राहण्याचा व जेवणाचा सगळा खर्च तेथील स्वयंसेवी संस्था करणार आहेत. पहिली  बॅच  ८ एप्रिल रोजी रवाना होणार आहे. 

आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संखेने ह्या कार्यक्रमात भाग घेऊन हातभार लावावा हि विनंती.   


--
sayali  (A +ve)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages