नमस्कार !
हे एक मदतीचे आवाहन करणारे पत्र !
मोहम्मद शेख हा अभिव्यक्ती अनुभव शिक्षाचा जळगाव मधील कार्यकर्ता आणि आमच्या परिवाराचा चांगला मित्र ! त्याने गडचिरोलीत बी. एड. चं शिक्षण घेतलं आणि नंतर तो एका शाळेत शिकवत होता. गेल्या दोन वर्षांपासून मोहम्मद एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. (Ebstein's anomaly of tricuspid valve) त्याची ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज आहे. मोहम्मदच्या सर्जरीचा अंदाजे चार लाख रुपये आहे. घरची आर्थिक परिस्थिती सर्व खर्च करण्याइतकी नाहीये. घरी सर्व शेती करतात. साधारण तीन लाख रुपयांची आवश्यकता आहे. बंगलोरच्या Narayan Institute Of Cardiac Sciences मध्ये ही सर्जरी करायची आहे. महाराष्ट्रातील कोणतेही ट्रस्टस, क्लब्स परराज्यात सर्जरीसाठी आर्थिक मदत करत नाहीत. गेले १० महिने सर्व संस्था, ट्रस्टसमध्ये चौकशा करून आणि कागदपत्रे देऊन मोहम्मद मानसिक दृष्ट्या खूपच थकून गेला आहे. आपण सगळे मिळून त्याला काही मदत करू शकतो का ?
(अगदी १०० रुपयांपासून कितीही मदत चालेल) ज्यांची मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी त्वरित संपर्क करावा, मी डीटेल्स पाठवेन.
कोणी जास्त रक्कम देणाऱ्या ग्रुप्स, ऑर्गनायझेशन्स अथवा व्यक्ती असतील तर तीही माहिती सांगा..
प्रतीक्षेत,
मुक्ता आणि नावरेकर परिवार
--
जय जगत्
“Boundaries break when people walk,
Barriers break when people talk !!"