महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८१ च्या परंतुका अन्वये केलेल्या लेखापरीक्षकांच्या नेमणुकीच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत

47 views
Skip to first unread message

Ramesh Prabhu

unread,
Jan 22, 2016, 8:09:24 PM1/22/16
to mswacoop...@googlegroups.com, Ramesh Prabhu
प्रति 
सनदी लेखापरीक्षक,



विषय :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८१ च्या परंतुका अन्वये केलेल्या लेखापरीक्षकांच्या नेमणुकीच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत. 

महोदय/ महोदया,


वरील विषय संदर्भात आमच्या संस्थेमार्फत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना दिनांक ४ जानेवारी २०१६ ला एक निवेदन देण्यात आले होते ज्या मध्ये जवळपास २० विषयांवर प्रस्ताव दिलेला आहे त्यामध्ये परंतुकाचा वर नमूद केलेला प्रश्न महत्वाचा असल्यामुळे या वर ताबडतोब निर्णय घेण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांनी  दिनांक २१ जानेवारी २०१६ रोजी परत एकदा सर्व अधिकारी व लेखापरीक्षा नियम समितीची बैठक बोलावून सादरीकरण करण्यात आले व वरील विषयावर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने खालील विषय आमच्या संस्थेकडून मांडण्यात आले आहेत. 

अशा भरपूर संस्था आहेत ज्यांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कलम ८१ अंतर्गत लेखापरीक्षाकाच्या नेमणुका केलेल्या आहेत परंतु कलम ७९ (१ ब) व ७५ (२ अ) मध्ये नमूद केल्याप्रमाणे नेमणूक केलेल्या प्रमाणित लेखापरीक्षक किंवा सनदी लेखापाल यांची नेमणूकी ची माहिती शासनाच्या सांकेतिक स्थळावर तांत्रिक कारणामुळे ते अपलोड करू शकले नाहीत किंवा या बाबतची माहिती संस्थेला नसल्यामुळे  त्यांनी लेखापरीक्षाकाचे समतिपत्र जिल्ला  विशेष लेखापरीक्षक किवा जिल्ला उपनिबंधक कार्यालयामध्ये सादर केलेले नाहीत. वरील कारणामुळे उपनिबंधकने कलम ८१ च्या अधिकाराचा वापर करून सर्व संस्थावर नवीन लेखापरीक्षाकाच्या नेमणुका केलेल्या आहेत यावर आमच्या संस्थेमार्फत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. म्हणून परंतुका अन्वये  केलेल्या नेमणुकाना  स्थगिती देण्यात यावी आणि संस्थेने नेमलेल्य लेखापरीक्षकाना मान्यता द्यावी. 
मा निबंधक यांनी यावर असे सांगितले कि अशा  परंतुका अन्वये अन्याय झालेल्या संस्थांची नावे आपल्या संस्थामार्फत दयावी जेणेकरून परंतुका अन्वये दिलेला आदेश मागे घेण्याचा विचार करता येईल. म्हणून आपणास विनंती आहे कि आपल्याकडे असलेल्या अशा संस्थांची यादी पुढील प्रमाणे माहिती देवून आमच्या संस्थेकडे तातडीने पाठवावी म्हणजे ती दिनांक २७ जानेवारी रोजी मा. निबंधकाकांकडे पाठविता येईल 

१) संथेचे नाव व पत्ता:-
२) लेखापारीक्षाकाचे नाव :- 
३) प्यानल क्रमांक :- 
४) सर्व साधारण सभेचा दिनांक :-
५) परंतुका अन्वये निर्गमित केलेला आदेश क्रमांक :-
६) जिल्हा उप निबंधकाचे नाव व लेख परीक्षकाचे नाव :- 


कृपया वरील माहिती तातडीने पुढील ई मेल आयडी  वर पाठवावी 




आपला स्नेहांकित 
सीए. रमेश प्रभू 
अध्यक्ष 
महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन  


Best Regards

--
With Best Regards
 
CA. Ramesh S. Prabhu
Chairman, Maharashtra Societies Welfare Association
A2-302, Laram Center, S.V. Road, Opp: Railway Station
Andheri(W), Mumbai- 400 058
Tel: 9820106766/ 022- 42551414
Reply all
Reply to author
Forward
0 new messages