कविताविश्व | ebook: Lek Ladaki- Kanya din visheshank

88 views
Skip to first unread message

MK Ebooks

unread,
Oct 12, 2011, 10:24:25 AM10/12/11
to mkeb...@googlegroups.com
रसिक वाचकहो,
नमस्कार,

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे ,
जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने "  

ह्या ओळी ऐकल्यावर गहिवरून न येणारा माणूस विरळाच !!!!!! 
एक तर वसंतराव देशपांड्यांचे आर्त सूर आणि "लेक " हे मनाचा हळवा कोपरा जपणारं नातं .....

खरंच मुलगी असणं म्हणजे घराला घरपण असणं, भव्य अंगण जसं फुलबागेशिवाय ओकंबोकं दिसत, तसं मुलीविना घर..!

मुलगी घराचा उंबरा असते आणि सगळ्या घराला एका सूत्रात बांधणारा धागा असते..

आईची कानगोष्टी करणारी सखी 
बाबांची काळजी करणारी,
करारी बाबांमधलं हळवेपण जपणारी 
दादाची "सीक्रेट" लपवणारी.. त्याला प्रत्येक वेळी पाठीशी घालणारी "बेस्ट फ्रेंड".. 

अश्या एक ना अनेक नात्यात तिचं फक्त असणंही खूप काही देतं..!   

पण आज दुर्दैवाने "ती" च नकोशी झालीये .....
कुटुंबसंस्थेचा कणाच मोडकळीस येऊ लागलाय ....

म्हणूनच "स्त्री भ्रूण हत्येचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही तुम्हासमोर सादर करतोय....

मुलीच्या नात्यातले अनेक रेशमी पदर.....

तुम्हालाही ह्यात तुमची लेक लाडकी नक्की दिसेल ...

वाचा.. आणि 
१. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ग्रुपचं सदस्यत्व घ्या, जेणेकरून अशीच सुंदर सुंदर ई-पुस्तकं तुम्हाला नियमित मिळत राहातील ! 
२. आपल्या मित्रमंडळींना सुद्धा हा मेल पाठवा.. त्यांनाही ग्रुप मध्ये येण्यास सांगा..!!

धन्यवाद..!
"मराठी कविता समूह" संचालक मंडळ.

Lek Ladaki - Kanya din visheshank.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages