Balaji vishvnat peshve (shriwardhan)

9 views
Skip to first unread message

@@@VAIBHAV@@@

unread,
Jul 13, 2012, 4:53:09 AM7/13/12
to shriwardh...@googlegroups.com, mitra...@googlegroups.com, runanuba...@googlegroups.com, mitramarathi


        
बाळाजी विश्वनाथ भट
पूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे)
जन्म १६६०
मृत्यू १७२०
सासवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
उत्तराधिकारी थोरले बाजीराव पेशवे
वडील विश्वनाथ परशरामपंत भट
पत्नी राधाबाइ
संतती थोरले बाजिराव, अन्नत
पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले
पेशवे पंतप्रधान होते. महादजी विसाजी देशमुख
हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष.
भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन
या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती.
हि देशमुखी शके १४०० पासुन शके १६०० पर्यंत
अव्याहत चालु होती असे इतिहासाचार्य राजवाडे
म्हणतात तर रीयासतकार १४७८ च्या सुमारास
हि देशमुखी मिळाली असावी असे मानतात. तसेच
बाळाजी विश्वनाथाचे वडिल व
आजोबा शिवछत्रपतींच्या सेवेत असावेत
असेहि रीयासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास
महादजी या परंपरागत देशमुखीवर होता. महादजीस,
नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले.
शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ
उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता.
बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल
व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास
मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण
मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील
’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स.
१६८९ च्या सुमारास म्हणाजे
शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल
खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले.
त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत
या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला.
त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात
घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच
किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून
"बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास
आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर
मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे
त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे
याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन"
गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक
वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात
’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो.
बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ
होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव
आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव"
हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-
वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९
मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई
झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले.
म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे
कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव
वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित
बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला.
स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.
२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे
औरंगजेबाचा मृत्यु झाला. हि बातमी मिळताच
माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा -
आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला.
इदच्या मुहुर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने
स्वत:ला बादशहा म्हणून जाहिर केले. व आपला भाऊ
शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला.
याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने
त्याने ८ मे १७०७ रोजी शाहुंची सुटका केली. मात्र
येसुबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये
शाहु महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे
औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिध्द केले
होते, शाहुने गादिवर आपला हक्क सांगताच संघर्ष
होणार हे अटळ झाले. शाहुने सुरुवातीला समजुतदारपणे
घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच
शाहुंचा नाईलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम
त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहुंनी धनाजीस
बोलणी करावयास बोलावुन घेतले.
धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ,
बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहुंचा पक्ष
बरोबर असुन त्यांचा पक्ष घेण्याची गळ
धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहुंच्या बाजुएन
गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर
खेड येथील लढाईत शाहुंनी आपले वर्चस्व सिध्द केले.
शाहुंनी धनाजीरावांना सेनापतीपद,
नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास
मुतालिक म्हणुन नेमले आणि सेनाकर्ते
असा किताबहि दिला.
अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या.
ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ
स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात
आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे
त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर
आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे
आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात
आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला,
मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर
बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर
बसवले. याच तहानुसार
बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली.
मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये
म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे
भल्याभयांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे
केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे
महत्वाचे. १७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे
मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू
महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू
महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात
तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने
सहजगत्या पेलले.
महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट
घराण्याचा ज्ञात पुरुष. त्यास नारो महादेव व
परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र
कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी.
विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ
होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं
देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब,
संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं.
वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील
’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स.
१६८९ च्या सुमारास म्हणाजे
शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल
खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले.
त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत
या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला.
त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात
घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच
किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून
"बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास
आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर
मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे
त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे
याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन"
गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक
वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात
’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो.
बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ
होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव
आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव"
हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-
वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९
मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई
झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले.
म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे
कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव
वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित
बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला.
स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.
बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य
यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले.
त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली.
धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस
घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल
अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र
मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत:
अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता.
महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन
मारला होता. अशाच अस्मानि-
सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन
तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे
गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते.
बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होता.
१७०५ च्या दरम्यान त्याने देखिल आपली समशेर
गाजवली आणि बहुतेक ती जस्तच
परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये
बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती,
आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात
स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल
मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक
मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त
पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य
मुद्रा विजयहेतराम।"
छ. राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ
’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले.
४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६
वर्षे मराठी सत्ता औरंग्याशी झुंजत होती. सातारा,
परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले
फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर
त्याने त्या काळी २ लाख रुपये
मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५०
हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व
तोरणा घेतला. १७०२ मध्ये
सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे
पडले म्हणुन प्रदीर्घ लढ्यानंतर
तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत
"बाळू पंडीत" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र
तत्पूर्वी किल्ला लढवत
असताना "दारुगोळा कामी भासतोय, तरी त्वरा करा!"
असे दारुगोळा पाठविण्या संबधीचे पत्र त्याने
"अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहीलेले आढळते.
औरंगजेबाच्या मृत्युपश्चात शाहु
महाराजांची सुटका झाली. या वेळी बाळाजीने
शाहूंचा पक्ष घेतला. अर्थातच स्वराज्याच्या २
गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक
जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू
महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार
चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर
शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु
शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन
त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू
बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने
दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन
रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार
बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली.
मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये
म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे
भल्याभल्यांच्या मतीला गुंग करणारी आहेत(वाक्याचे
विकिकरण करा). आणि हे केवळ त्याने शब्द
सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे...

वैभव शिगवण ( श्रीवर्धन / रायगड  )
Click here to join my group
_{ श्रीवर्धन कट्ठा }_ 
http://groups.google.com/group/shriwardhan-kattha/subscribe

Reply all
Reply to author
Forward
0 new messages