'गुढीपाडवा' विषयक आध्यात्मिक माहिती

914 views
Skip to first unread message

एकनाथ पोतदार

unread,
Mar 12, 2010, 3:22:43 AM3/12/10
to may_marathi

अनुक्रमणिका

  


सनातनतर्फे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांना हार्दिक शुभेच्छा !

हिंदूंचा नववर्षारंभदिन गुढीपाडवा

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.

 

 

 

गुढी उभारण्याची पद्धत
 

गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी. उजवी बाजू म्हणजे जिवाची कार्यरत स्थिती.
 
पद्धत : अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.

आ.
गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.

इ.
गुढी आपल्या देहातील सुषुम्नानाडीचे प्रतिनिधित्व करत असल्याने ती जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

प्रार्थना :
`हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्या चरणी प्रार्थना !

'गुढीपाडवा' कसा साजरा करावा?  - ध्वनिचित्रपट


गुढी कशी उभारावी?  - ध्वनिचित्रपट


गुढी खाली कशी उतरवावी?  - ध्वनिचित्रपट


 

 


धर्मध्वज पूजा-विधी
 


संकलन :
श्री. दामोदर वझे,
सनातनचे
साधक पुरोहित

सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: ।

१. आचमन करणे : डाव्या हातात पळी घ्यावी. उजवा हात उताणा धरावा. पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे. पुढील नावे घेत कृती करावी.
श्री केशवाय नम:। (पाणी तोंडात घ्यावे.)
श्री नारायणाय नम:। (पाणी तोंडात घ्यावे.)
श्री माधवाय नम:। (पाणी तोंडात घ्यावे.)
श्री गोविंदाय नम: । (असे म्हणत उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.)
(हात पुसून घ्यावेत व जोडावेत.)
`श्री विष्णवे नम: ।' पासून `श्रीकृष्णाय नम: ।' पर्यंतची श्रीविष्णूची २० नावे म्हणावी.
`श्री विष्णवे नम: । श्री मधुसूदनाय नम: । श्री त्रिविक्रमाय नम: । श्री वामनाय नम: ।
श्रीधराय नम: । श्री हृषीकेशाय नम: । श्री पद्मनाभाय नम: । श्री दामोदराय नम: ।
श्री संकर्षणाय नम: । श्री वासुदेवाय नम: । श्री प्रद्युम्नाय नम: । श्री अनिरुद्धाय नम: ।
श्री पुरुषोत्तमाय नम: । श्री अधोक्षजाय नम: । श्री नारसिंहाय नम: । श्री अच्युताय नम: ।
श्री जनार्दनाय नम: । श्री उपेंद्राय नम: । श्री हरये नम: । श्रीकृष्णाय नम: ।

२. पुनराचम्य :
पुनराचम्य म्हणजे वरील प्रकारे पुन्हा एकदा आचमन करणे.

३. हात जोडून म्हणणे :

इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थान देवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: ।

४. देशकाल : डोळयांना पाणी लावावे. (भारतातील लोकांनी म्हणावयाचा देशकाल) श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया, प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्रीश्वेत-वाराहकल्पे, वैवस्वत मन्वंतरे, अष्टाविंशति तमे युगे, युगचतुष्के, कलीयुगे, प्रथम चरणे, जंबुद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, रामक्षेत्रे, बौद्धावतारे, आर्यावर्तदेशे, शालिवाहन शके, अस्मिन्वर्तमाने व्यावहारिके, सर्वधारीनाम संवत्सरे, उत्तरायणे, वसंतऋतौ, चैत्रमासे, शुक्लपक्षे, प्रतिपद् तिथौ, रवि वासरे, रेवती दिवस नक्षत्रे, एेंद्र योगे, किंस्तुघ्न करणे, सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवंगुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ, मम आत्मन: सकल शास्त्र श्रुति-स्मृति पुराणोक्‍त फल प्राप्‍त्यर्थम् ।

५. संकल्प करणे : भांड्यातील अक्षता उजव्या हाताच्या बोटांनी घेऊन हाताचा तळवा वरच्या दिशेला करावा. मग अंगठा सोडून उरलेल्या चार बोटांवरून अक्षता हळूहळू तळव्यावरती घसरत आणाव्यात. स्वत:चे गोत्र व नाव उच्चारावे, उदा. `काश्यप गोत्र व बाळकृष्ण नाव' असल्यास `काश्यप गोत्रे उत्पन्न: बाळकृष्ण शर्मा अहं', असे म्हणावे व पुढील संकल्प करावा. `अस्माकं सर्वेषां, सह कुटुंबानां, सह परिवाराणां, क्षेम, स्थैर्य, अभय, विजय, आयु:आरोग्य प्राप्‍त्यर्थं अस्मिन् प्राप्‍त नूतन वत्सरे, अस्मद् गृहे, अब्दांत: नित्य मंगल अवाप्‍तये ध्वजारोपण पूर्वकं पूजनं तथा आरोग्य अवाप्‍तये निंबपत्र भक्षणं च करिष्ये । निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनं / स्मरणं करिष्ये । कलश, घंटा, दीप पूजां करिष्ये ।' (`करिष्ये' म्हणतांना उजव्या हातातील अक्षतांवर पाणी घालून ताम्हणात सोडाव्या व हात पुसावेत. ज्यांना गणपतिपूजन करता येत असेल त्यांनी `पूजनं करिष्ये', असे म्हणावे व सुपारीवर किंवा नारळावर गणपतीची पूजा करावी ज्यांना येत नाही, त्यांनी `स्मरणं करिष्ये', असे म्हणावे व खालीलप्रमाणे गणपतीचे स्मरण करावे.)

६. श्री गणपतिस्मरण
वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। महागणपतिं चिंतयामि नम: ।

७. कलश, घंटा, दीप पूजन करणे :
गंध-फूल अक्षता वाहून कलश, घंटा, दीप यांची पूजा करावी.

१. कलशाय नम: । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।
घंटिकायै नम: । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।
३. दीपदेवताभ्यो नम: । सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि ।

८. ब्रह्मध्वज पूजा
ॐ ब्रह्मध्वजाय नम: । ध्यायामि । (हात जोडावे.) ॐ ब्रह्मध्वजाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । (गंध लावणे)
ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मंगलार्थे हरिद्रां समर्पयामि । (हळद वहाणे)
ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मंगलार्थे कुंकुमं समर्पयामि । (कुंकू वहाणे)
ॐ ब्रह्मध्वजाय नम: । अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि । (अक्षता वहाणे)
ॐ ब्रह्मध्वजाय नम: । पूजार्थे पुष्पं, तुलसीपत्रं, दुर्वांकुरान्, पुष्पमालांच समर्पयामि ।
(फूल, तुळशीचे पान व दूर्वा वहाव्यात व फुलांचा हार घालावा.)
ॐ ब्रह्मध्वजाय नम:, धूपं समर्पयामि । (उदबत्ती ओवाळणे)
ॐ ब्रह्मध्वजाय नम:, दीपं समर्पयामि । (निरांजन ओवाळणे)

९. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीची दोन पाने घेऊन त्यावर पाणी घालावे. नैवेद्याच्या ताटाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकदाच पाणी फिरवावे. नैवेद्यावर तुळशीच्या दोन पानांनी पाणी प्रोक्षण करून एक पान नैवेद्यावर ठेवावे व दुसरे ब्रह्मध्वजाच्या चरणी वहावे. `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । नैवेद्यार्थे पुरस्थापित (नैवेद्याचे नाव घ्यावे.) नैवेद्यं निवेदयामि ।' त्यानंतर `ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा, हे मंत्र म्हणत उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या टोकाने तळवा देवाकडे येईल, अशा तर्‍हेने नैवेद्याचा वास देवाकडे न्यावा किंवा हात जोडून `ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा', या मंत्राने देवाला नैवेद्य समर्पित करावा. नंतर उजव्या हातावर पाणी घेऊन `समर्पयामि' म्हणतांना, ते पाणी ताम्हणात सोडावे. `ब्रह्मध्वजाय नम:। नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि, उत्तरापोशनं समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि ।' उजव्या हातात गंध फूल घेऊन ते ब्रह्मध्वजाच्या चरणी वहावे. `करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।' `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि ।' (विड्यावर पाणी सोडावे.) `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । फलार्थे नारिकेल फलं समर्पयामि ।'(नारळावर पाणी सोडणे)

१०. आरती ओवाळणे
(गणपतीची आरती म्हणावी.) `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । मंगलार्तिक्य दीपं समर्पयामि ।'

११. कापूर ओवाळणे
`ॐ ब्रह्मध्वजाय नम: । कर्पूर दीपं समर्पयामि ।'

१२. `ॐ ब्रह्मध्वजाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ।' (स्वत:भोवती प्रदक्षिणा घालावी. शक्य असल्यास गुढीला घालावी.)

१३. `ॐ ब्रह्मध्वजाय नम:। नमस्कारान् समर्पयामि ।'(नमस्कार करावा.)

१४. प्रार्थना
`ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद । प्राप्‍तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ।।' अर्थ : सर्व इष्ट फल देणार्‍या अशा हे ब्रह्मध्वज देवते, तुला मी नमस्कार करतो. या नवीन वर्षामध्ये माझ्या घरात नेहमी मंगल, म्हणजे चांगले घडू दे. `अनेन कृत पूजनेन ब्रह्मध्वज: प्रीयताम् ।' (उजव्या हातावर अक्षता घेऊन त्यावर पाणी घालून त्या ताम्हणात सोडाव्यात. `विष्णवे नमो ।, विष्णवे नमो । विष्णवे नम: ।', असे म्हणावे व सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन वेळा आचमन करावे.)

१५. निंब पत्र (कडुनिंबाचे पान) भक्षण करावे.
(टीप : शब्दांचा अर्थ कळावा व संस्कृत शब्दांचे उच्चार करणे सोपे जावे; म्हणून ते शब्द तोडून लिहिले आहेत.)


गुढी उभारतांनाचे सूक्ष्म चित्र

 

 


कडुनिंबाचा प्रसाद

महत्त्व : इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडुनिंबात प्रजापति-लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद खातात. पुढील तक्‍त्यात काही पदार्थांची लहरी ग्रहण करण्याची क्षमता दिली आहे. त्यावरून गुढीपाडव्याला कडुनिंब का खातात व दूध, दही, तूप आणि साखर हे पदार्थ चैत्र महिन्यात का खाऊ नयेत, हे लक्षात येईल.



(संकलक डॉ. जयंत आठवले यांना ध्यानात प्राप्‍त झालेले ज्ञान)
कडुनिंबाचा प्रसाद बनवण्याची कृती : कडुनिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून प्रसाद तयार करावा व तो सर्वांना वाटावा.

 

 


संवत्सर पूजा

प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. `वर्षप्रतिपदेला महाशांती करतात. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वहातात. नंतर होमहवन व ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्‍या श्रीविष्णूची पूजा करतात. `नमस्ते बहुरूपाय विष्णवे नम: ।', हा मंत्र म्हणून त्याला नमस्कार करतात. नंतर ब्राह्मणाला दक्षिणा देतात. शक्य झाले तर इतिहास, पुराणे इत्यादी ग्रंथ ब्राह्मणाला दान देतात. `ही शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो, उत्पात घडत नाहीत, आयुष्य वाढते आणि धनधान्याची समृद्धी होते', असे सांगितले आहे.' या दिवशी जो वार असेल त्या वाराच्या देवतेचीही पूजा करतात. वार व त्यांच्या देवता यांची माहिती सोबत तक्‍त्यात दिली आहे.

चैत्रामध्ये देवपूजेत दररोज दवणा वहाण्याचे कारण : पुढील तक्‍त्यात काही वस्तूंच्या शीतलतेची तुलना केलेली आहे. त्यावरून हवामानात बदल होऊन उन्हाळयाची सुरुवात असलेल्या चैत्रामधे देवपूजेत दररोज दवणा (एक सुवासिक वनस्पती) का वहातात, ते लक्षात येईल. चंदन व दवणा यांच्यात शीतलता देण्याची क्षमता सारखीच असली, तरी चंदन फक्‍त ओले असतांनाच शीतलता देऊ शकते, तर दवणा दिवसभर शीतलता देऊ शकतो.


(संकलक डॉ. जयंत आठवले यांना ध्यानात प्राप्‍त झालेले ज्ञान)
संवत्सर पूजेचे लाभ : संवत्सर पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आयुष्यवृद्धी होते, सौभाग्याची वाढ होते व शांती लाभते.

 

 


चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व

महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वा*्मय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.

नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक : या दिवशी
अ.
रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती :
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.


३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्‍या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.' (सनातनच्या साधकाला ईश्‍वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान)

 

 


गुढीपाडवा व गुढीपाडव्याच्या वेळी वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे महत्त्व
 


श्री. भरत मिरजे,
सनातन आश्रम,
मिरज

सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. सूर्योदयानंतर या लहरींची शक्‍ती वाढत असल्यामुळे नंतर या लहरी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवालाच ग्रहण करता येतात. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.
 

आंब्याच्या पानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळया पानांत ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानांत १० टक्के असते. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा. कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्त्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. जिवाला कडूलिंबाच्या पानांच्या माध्यमातून सूक्ष्म-रूपाने प्रजापती लहरी मिळत असतात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते. खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.

१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्‍वराची संकल्प शक्‍ती कार्यरत असणे
४. शक्‍तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रजापति लहरींबरोबरच यम लहरीही कार्यरत असतात. सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी

अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !

आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्‍ती सामावली असेल, ती मला मिळू दे. ती शक्‍ती राष्ट्र व धर्म या कार्यांसाठी वापरली जाऊ दे', हीच आपल्याचरणी प्रार्थना ! - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, २४.२.२००६, दुपारी ३.४५)

 

 


गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्‍तीची मुहूर्तमेढ !


प.पू. पांडे महाराज

प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा !

उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्‍तीचे गूढत्व दर्शवते. `आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील', हे प्रतिप्रदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्यसंकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. गुढीचा भावार्थ गुढीकरता बास (वेळू) घेतात. बासाला कांडे असतात. आपल्या शरीरातील पाठीच्या मणक्याचे हे प्रतिक आहे. पाठीचा कणा जेवढा मजबूत व ताठ राहील, तेवढे त्याचे व्यक्‍तिमत्त्व खुलून दिसते. त्यावर तांब्याला डोक्याचे स्वरूप देऊन निर्गुण संकल्पाला सगुण स्वरूपात आणून कार्यान्वित करतात. त्या प्रकृतीला साडी-चोळीने सजवून, गाठी, कडूलिंबाची व आंब्याची पाने आणि मोहोर लावून तिचा सत्कार करतात. तिची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करतात. सण व उत्सव यांच्या सूत्रांचा अर्थ जाणून घेण्याचे महत्त्व भारतात अनेक सण, उत्सव व परंपरा आहेत. त्यांच्या पाठीमागे महान गूढार्थ भरला आहे. संस्कृतीच्या सूत्रांचा अर्थ कळला की, त्यापासून प्रेरणा व सामर्थ्य प्राप्‍त होते; म्हणून त्याचा अर्थ जाणून घेणे अगत्याचे आहे. आज आपण केवळ रूढी म्हणून सण साजरे करतो. आपण केवळ भौतिक सुखाच्या मागे लागून लाचार व परावलंबी झाल्यामुळे आपल्या धर्मावर होणार्‍या अत्याचारांना तोंड देण्यास असमर्थ आहोत. - प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

 


नवी सृष्टी निर्माण करूया !


लेखक : ज्येष्ठ पत्रकार
श्री. अरविंद कुळकर्णी

मरगळ झटकून हिंदूंना नवी सृष्टी निर्माण करावयाची आहे !

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा होता, असे आपण मानतो. वनवास संपवून सीतेसह रामाने अयोध्येत पुन:प्रवेश केला तो दिवसही चैत्र शुद्ध प्रतिपदाच होता. बहुसंख्य हिंदू या दिवसापासून वर्षांरंभ सुरू झाला, असे धरून चालतात. त्या दिवशी घरावर गुढी उभारतात. पाने भक्षण करतात. ज्योतिषास बोलावून पुढच्या वर्षाचे भविष्य जाणून घेतात आणि महत्त्वकांक्षी अशा शुभकार्याचा संकल्प सोडतात. या वर्षी गुढीपाडवा साजरा करतांना आपल्या मनात पुढील विचार आले पाहिजेत, असे मला वाटते. हाडीमासी खिळलेली मरगळ झटकून हिंदूंना नवी सृष्टी निर्माण करावयाची आहे. या सूर्यमंडळात हिंदूंना त्यांचे राष्ट्र निर्माण करण्याचा अधिकार आहे. मूलभूत आणि नैसर्गिक हक्क. विश्‍वाच्या कल्याणासाठी या पृथ्वीतलावर एक निखळ हिंदू राष्ट्र अस्तित्वात असणे आवश्यक आहे. सर्वेत्र सुखिन : सन्तु सर्वे सन्तु निरामय: सर्वे भद्राणि पश्यन्तु माकश्चित दुखमाप्नुयात ।' हा आशावाद प्रत्यक्षात आणणारी नवी सृष्टी या जगात केवळ हिंदूच निर्माण करू शकतो.

आपण `हिंदु'आहोत या प्रखर जाणिवेने न्यूनगंड जाईल
इतर धर्मात असतात तशा हिंदूंच्या देवदेवता भयकारी नाहीत. त्या माणसाला स्वकतृत्वाचा म्हणजे नराचा नारायण होण्याचा भरवसा देतात. सर्व चराचर विश्‍वात एकच ईश्‍वर वास करत असल्याची हिंदूंची ठाम श्रद्धा असल्याने ते विविधतेतून एकत्व निर्माण करू शकतात. सर्व उदात्त कल्पनांचा उगम हिंदु विचारात आहे. त्याचप्रमाणे ईश्‍वराला दंडाधिकारी न मानता जिव्हाळयाचा सखा मानल्यामुळे वैज्ञानिक सत्याचे आकलन हिंदु ऋषीमुनींना सर्वप्रथम झाले आहे. दुसर्‍याला नष्ट करून हिंदू स्वत:ला मोठा करत नाही. तो सुसंवाद साधून दृष्ट प्रवृत्ती नष्ट करतो आणि शांततामय पुरुषार्थी सहजीवनाचे वातावरण उत्पन्न करतो. जागतिक महासत्ता बनण्याची क्षमता हिंदूंमध्ये आहे. आपण `हिंदु'आहोत हाच निरामय आनंदाचा विश्‍वास आपण जगाला देत आहोत, असा विचार केल्यावर त्याचा न्यूनगंड पळून जाईल आणि विभिन्न क्षेत्रांत जगाचे धुरीणत्व त्यांच्याकडे चालून येईल.

हिंदूंनी संवेदनशून्यतेला तिलांजली द्यायला हवी !
टिळकयुग संपले आणि गांधीयुग सुरू झाले. त्यानंतरची गेली ८६ वर्षे हिंदूंना त्यांच्याच देशात वनवास भोगायला लावला गेला आहे. जे जे म्हणून हिंदुत्वाशी निगडित आहे ते गांधीनिर्मित काँग्रेस संस्कृतीने त्याज्य आणि दंडनीय ठरवले आहे. हिंदु संस्कृतीशी सुसंवाद न साधता हिंदु संस्कृतीचे उच्चाटन करण्याच्या योजना रेटीत इस्लामी आणि ख्रिस्तीसंस्कृती आपले साम्राज्य या भूमीवर प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न करत आहेत आणि काँग्रसी संस्कृतीचे सहकार्य त्यांना मिळत आहे. मातापित्यांच्या शब्दाला मान देण्यासाठी प्रभू रामचंद्राने राजत्याग करून वनवास पत्करला. त्याप्रमाणे गांधींवर विश्‍वास टाकून हिंदूंनी खिलाफत चळवळीत इस्लामची प्रतिष्ठापना करण्यास हातभार लावला; पण वनवास पत्करला तरी रामाने पुरुषार्थाचा, न्यायान्यायविवेकाचा आणि खलनिर्दालनाच्या ईर्षेचा त्याग केला नव्हता. सीतेचे अपहरण, समस्त स्त्रीजातीशी केलेली प्रतरणा आहे, असे त्याने मानले. तो सभ्यतेचा घोर अपमान आहे, असे त्याने मानले. पुरुषांच्या पराक्रमाला ते आव्हान आहे, असे त्याला वाटले. त्याने जनमत संघटित केले. रामाचे आक्रंदन हे समस्त वानरजातीचे आक्रंदन झाले; म्हणून लंकेवर स्वारी झाली आणि रावणाचा वध झाला. राम सीतेसह वर्तमान अयोध्येस परतला. खिलाफत चळवळीमुळे हिंदु वनवासी झालेच; पण त्यांना अहिंसाकाताशी करकचून बांधण्यात आले. त्यामुळे त्यांच्या मनातील करुणा करपून गेली. स्त्रीजातीविषयी वाटणारा उपजत हळूवारपणा लोप पावला. प्रतिकारात ते पंगू झाले. मुसलमानांचे अत्याचार सहन करणे, हाच हिंदु-मुसलमान ऐक्याचा सोपान आहे, असा नवा सिद्धांत त्यांच्याकडून घोकून घेण्यात आला. आपल्या आयांवर, भगिनींवर, बायकांवर आणि मुलींवर भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांनी केलेले सामूहिक बलात्कार हिंदूंनी उघड्या डोळयांनी बघून गप्प बसावे; म्हणून आमच्या नेत्यांनी उपोषणे केली. काश्मीरमध्ये मुसलमान दहशतवादाच्या भितीने हिंदु स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या तिसाव्या वर्षी बंद होऊ लागली, तरी कृती करावी आणि द्रौपदीच्या बाजूला कृष्ण उभा राहिला, तसे आपण आपल्या स्त्रियांच्या रक्षणार्थ धावून जावे, असे हिंदूंना वाटले नाही. या कापुरुषतेचा त्याग हिंदूंनी या गुढीपाडव्याला करावयाचा आहे. या वर्ष प्रतिपदेला हिंदूंनी संवेदनशून्यतेला तिलांजली द्यावयाची आहे. या वर्षारंभाला घराघरावर अशा पवित्र गुढ्या उभारल्या पाहिजेत, प्रत्येक वास्तूवर असे भाग्यशाली भगवे ध्वज डौलाने फडकले पाहिजेत की, त्यामुळे स्नेहबंधनाच्या, पराक्रमाच्या, हौतात्म्य वृत्तीच्या तेजस्वी लहरी वातावरणात प्रसृत होऊन आमच्या मायभगिनींना कलिकाळाचीही भीती वाटता कामा नये. हिंदु स्त्रियांकडे पापी दृष्टीने बघणार्‍यांच्या हृदयात हिंदूंच्या प्रतिकाराच्या नुसत्या कल्पनेनेही धडकी भरावी, असे वीरोचित संकेत वार्‍यावादळाशी झूंज घेणार्‍या भगव्या ध्वजाने प्रस्फुरित केले पाहिजेत.

कटू सत्यांना सामोरे जा !
कडुनिंबाची पाने खावयाची याचा अर्थ काही कटू सत्यांना सामोरे जाण्याचा धीटपणा आपण दाखवला पाहिजे. राष्ट्राची प्रकृती सुधारण्यासाठी ते आवश्यक आहे. हिंदूंमध्ये अक्षय अजेय होण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारची गुणसंपदा आहे; परंतु हिंदूंमध्ये राजकीय दृष्टीचा अभाव असल्याने परकियांना हिंदूंवर आक्रमण करण्याचा मोह होतो. `प्रतिकाराची तत्परता न दाखवल्यामुळे हिंदूंचा पराभव होतो', असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून ठेवले आहे. राजकीय दृष्टीच्या अभावाने सद् गुणविकृतीचे विकार आमच्या रक्‍तात शिरले. खेटरांनी पूजा करण्याची ज्यांची योग्यता त्यांना आम्ही सौजन्यापोटी देवघरात स्थानापन्न केले आणि सगळे घर दूषित करून टाकले. तेव्हा आपल्या घरात झाडलोट करण्याची सुरुवात या पाडव्यापासून झाली पाहिजे. कोळिष्टके काढून टाकली पाहिजेत. वर्तमानपत्रे काळजीपूर्वक आणि नियमितपणे वाचण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कोणत्या घटनेने हिंदुहिताचा लाभ किंवा हानी होणार आहे. याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. पूर्वी ज्योतिष्याची सहायता घेत. आजच्या काळात आपले राजकीय भविष्य धट्टेकट्टे निपजावे म्हणून `सनातन प्रभात' सारखी दैनिके आणि साप्‍ताहिके आपल्याला सहकार्य करत असतात. जागल्याचे काम ही नियतकालिके करतात. त्यांना आपण उदार आश्रय दिला पाहिजे.

श्रीकृष्णाला आदर्श ठेवून जीवनशैलीत बदल घडवा !
भगवान श्रीकृष्णाला आदर्श म्हणून डोळयासमोर ठेवून आपण आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणले पाहिजेत. व्यष्टी आणि समष्टीचा तारतम्याचा विचार आपण नीट केला पाहिजे. माणसाने स्वत: उदार आणि सहिष्णू असावे; पण शत्रू असहिष्णू आणि रानटी असतांना समष्टीने सगळे बळ एकवटून त्याचा नायनाट केला पाहिजे. आज व्यक्‍तीगत जीवनात आपण स्वार्थी, भ्रष्ट आणि संकुचित झालो आहोत; मात्र सामाजिक जीवनात मुसलमान दहशतवादाशी लढण्याचे धैर्य नाही. म्हणून आम्ही उदार झालो आहोत. श्रीकृष्णाचे `ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम' हे सूत्र आपण आपल्या व्यक्‍तीमत्वाचा भाग केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे श्रीकृष्णाला समोर ठेवून चालणारे महापुरुष आहेत. त्यामुळे ते अफझलखानाचा कोथळा बाहेर काढू शकले. श्रीकृष्ण आणि छ. शिवाजी महाराज ही आपले दैवत झाली पाहिजेत. ही दैवते सदैव आपल्या दृष्टीसमोर रहावी म्हणून चलनी नोटावर श्रीकृष्ण आणि छ. शिवाजी महाराज यांच्यासारख्या द्रष्ट्या राष्ट्रनिर्मात्याची चित्रे छापली गेली पाहिजेत, अशी मागणी हिंदूंनी एकमुखाने केली पाहिजे.

 

 


खरा गुढीपाडवा !

(साभार : विशेष संपादकीय, दैनिक सनातन प्रभात, चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९२९)


हिंदू गुढ्या उभारण्याची तयारी करत असतांना २००७ साली केरळमधील एन्.डी.एफ्. संघटनेच्या मुसलमान कार्यकर्त्यांनी रा.स्व. संघाचे कार्यकर्ते श्री. लक्ष्मण यांची हत्या करणे अत्यंत क्लेशकारक आहे. हिंदूंचे सण आले की बाँबस्फोट घडवले जातात, हिंदू नेत्यांच्या हत्या केल्या जातात. हिंदु समाजाला त्याबाबत काय वाटते ? हत्या झालेल्या नेत्याच्या शोकसभेत भाषणे करायची, श्रद्धांजली वहायची व घरी येऊन आंघोळ केल्यावर हा विषय विसरून जायचा, ही हिंदू समाजाची रीत बनली आहे. गेल्या तीन महिन्यांत केवळ केरळमध्ये पाच हिंदुत्ववादी नेत्यांची हत्या झाली. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या विवाहाच्या बातम्यांवर चर्चेची गुऱ्हाळे रंगतात; पण या हिंदु नेत्यांच्या हत्यांबाबत चकार शब्दही निघत नाही. `महागायक' ठरवण्यासाठी किंवा क्रिकेटची मॅच पहाण्यासाठी कोट्यवधी हिंदू तासन्तास टी.व्ही.समोर बसू शकतात. नवरात्रोत्सव व गणेशोत्सव यांत हिडिस नृत्य करण्याला धार्मिकता समजणार्‍या हिंदूंना हिंदू नेत्यांच्या हत्येबद्दल काही करावेसे वाटत नाही. मुल्की (कर्नाटक) येथे भाजपचे नेते सुखानंद शेट्टी, केरळ येथे रा.स्व. संघाचे अँड्. पी.पी. वल्सराज कुरूप यांच्या हत्येनंतर बंद पाळण्यात आले, आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली; पण हा केवळ उपचार होता. आतापर्यंत ज्या हिंदुत्ववाद्यांच्या हत्या झाल्या, ते सर्वजण रा.स्व. संघाशी निगडित होते. `योग्य वेळ येताच लाठ्या-काठ्या बाहेर काढू', असे सांगणारे संघवाले संघाच्या शाखेत रोज लाठ्या-काठ्यांचे प्रशिक्षण घेतात. हिंदुत्वाचा कैवार घेतलेल्या स्वयंसेवकांच्याच हत्या होत असतांना मात्र संघवाल्यांच्या लाठ्या-काठ्या शाखेच्या बाहेर दिसू शकल्या नाहीत, हा बलाढ्य हिंदुत्ववाद्यांचा बुळेपणा कि हिंदूंचे दुर्दैव. हिंदु नेत्यांच्या हत्येनंतर केवळ शोकसभा घेतल्या व आदरांजलीची भाषणे ठोकली गेली. शत्रूकडून हिंदूंचा एकेक मोहरा पाडला जात असतांना केवळ आदरांजली वाहून थांबणे हिंदूंना परवडणारे नाही. हिंदुत्ववादी नेत्यांच्या हत्येचा सूड उगवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. गुढीपाडवा हा अनिष्टाचा संहार झाल्याचा आनंदाचा दिवस. रावणाचे पारिपत्य करून प्रभू श्रीराम अयोध्येत परतले त्यादिवशी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या. आज उभारली जाणारी गुढी त्याच विजयाचे प्रतीक. क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांचे मुंडके छाटून ते भाल्यावर टोचून नाचवल्याची काळी पार्श्वभूमीही या दिवसाला आहे. हा गुढीपाडवा हिंदू काय म्हणून साजरा करणार ? विजयोत्सव म्हणून कि एका धर्मविराचा बलीदानदिन म्हणून ? प्रभू श्रीरामाचा पराक्रम वगळता गुढीपाडव्याच्या दिवशीचा अन्य कोणताही विजय हिंदूंच्या खात्यात नाही. गुढीपाडव्याच्या `मुहूर्ता'वर हिंदु नेत्यांची हत्याकांडे मात्र आजही घडवली जातात. शत्रूला तशाच प्रकारे ठेचण्याच्या धर्मकर्तव्याची जाणीव हिंदूंना व्हावी, यासाठी बलीदानाची गुढी उभारणे योग्य ठरेल. हिंदु नेत्यांच्या हत्येनंतर अंत्यसंस्काराला हजारोंनी येतात; पण हिंदू समाज राष्ट्र व धर्म रक्षणासाठी संघटित झाल्यास हिंदुद्वेष्ट्यांना पळता भूई थोडी होईल. हिंदू नेत्यांच्या हत्या होण्याची शृंखला खंडित होईल. हिंदूंनो, त्या वेळी खर्‍या अर्थाने विजयाची गुढी उभारता येईल. समस्या केवळ हिंदू नेत्यांच्या हत्येची नाही. समस्या देवळांच्या रक्षणाचीही आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना, दहशतवाद, धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे, हिंदूंचा वंशविच्छेद, हिंदुद्वेषी राजकारण व जगभर झपाट्याने पसरणारा हिंदुद्वेष, अशा अनेक समस्यांचे डोंगर हिंदु धर्मासमोर आहेत. पाश्चात्तीकरणाच्या प्रभावात गुढी ही एक औपचारिकता ठरू पहात आहे, हीदेखील समस्याच. येत्या काळात हिंदूंना स्वत:चे हिंदुत्व टिकवणे हे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी लागणारे धर्मशिक्षणाचे बळ हिंदूंकडे नाही. अशा अनेक आघाड्यांवरील लढायांत मिळालेल्या विजयानंतरच हिंदूंनी उभारलेली गुढी विजयाची असेल. आमच्या देवांच्या हाती तलवार आहे, परशू आहे, त्रिशूळ आहे, सुदर्शनचक्र आहे; मात्र हिंदूंची मने बोथट झाली आहेत. म्हणूनच कुणीही उठावे आणि हिंदूंच्या देवतांची, श्रद्धास्थानांची नि संतमहात्म्यांची निंदानालस्ती करावी, असे प्रकार वाढीस लागले आहेत. दहशतवाद्यांनी हिंदूंची मंदिरे बाँबस्फोटांनी उडवली. काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना निर्वासित करण्यात आले. तरीही बोथट मनाचे हिंदू वादळ तोंडावर येऊनही शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून निद्रिस्त राहिले. असा लोळागोळा झालेला हिंदु समाज कधीतरी विजयाचा धनी होईल का ? सहिष्णुतेलाही एक मर्यादा असते आणि जेव्हा ही मर्यादा संपते, त्या वेळी ती सहिष्णुता षंढपणा बनते. असा षंढ समाज विजय मिळवू शकेल का ? दुर्बलतेमुळे हिंदु समाजाची आज ससेहोलपट होत आहे. अर्थात ही दुर्बलता गांधी-नेहरूंची देणगी आहे व गेल्या ७० वर्षांत हिंदूंनी ती मोठ्या इमाने-इतबारे स्वीकारली आहे. या दुर्बलतेचा त्याग करण्यासाठी हिंदूंनी वीरतेचे उपासक बनायला हवे. नव्हे ते वीरतेच्या उपासकांचेच वंशज आहेत. पांडुरंगाची मूर्ती फोडणार्‍या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणारे आहेत. हिंदूंनी या विजयाची पुनरावृत्ती करायला हवी. हिंदूंसाठी तोच खरा गुढीपाडवा !

 

 


१. गुढीपाडव्याचा भावार्थ


प.पू. परशराम
माधव पांडे महाराज

उत्तरायणातील वसंत ऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्‍तीचे गूढत्व दर्शवते. `आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील', हे प्रतिपदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्यसंकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. - प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


२. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करतांना `माझ्यात गर्व निर्माण होऊ देऊ नका', असा वर मागणे

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करतांना `माझ्यात गर्व निर्माण होऊ देऊ नका', असा वर मागितला; म्हणून भगवान श्रीविष्णूने हिरण्यगर्भाला, म्हणजेच ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याच्या वेळी कर्मयोगच सांगितला. यामुळे ब्रह्मदेव कर्मबंधनात अडकला नाही. (सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेला ब्रह्मदेवही अहंभावाला दूर ठेवून स्वत:चे कर्तृत्व अर्पण करतो व त्याच्या तुलनेत त्याच्या नखाएवढेही सामर्थ्य नसतांना मनुष्य `हे मी केले', असा गर्व बाळगतो ! - संकलक)


३. हिंदूंनो, तुमची सिंहगर्जना सर्वांना ऐकवा !

`राष्ट्ररक्षणार्थ सिंहगर्जना करून राष्ट्राला विनाशाच्या गर्तेत ढकलणार्‍या राज्यकर्त्यांच्या व शत्रूच्या हृदयांत धडकी भरवण्याची आणि त्यांच्यावर झेप घेऊन त्यांचा अचूक वेध घेत त्यांना कायमचेच नेस्तनाबूत करण्याची वेळ आली आहे. त्याकरता धर्मक्रांती अपरिहार्य आहे !' - डॉ. आठवले (फाल्गुन पौर्णिमा, कलीयुग वर्ष ५१०९ (२१.३.२००८))


४. शुभेच्छा संदेश !

आपण दिवाळी किंवा जानेवारी महिन्यात नववर्षाचे शुभेच्छा संदेश आपले नातेवाईक आणि मित्र यांना पाठवत असतो. त्याऐवजी चैत्र शुद्ध प्रतिपदेस शुभेच्छा संदेश पाठवणे सुरू करावे; कारण हा खरा नववर्षारंभाचा दिवस आहे.

 

 


१. विदेशातील साधकांना आलेली अनुभूती

गुढीपाडव्याच्या दिवशी नामजप करतांना श्रीरामाचे अस्तित्व जाणवणे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी चैतन्य जाणवत होते. सर्वसाधारणपणे आम्ही पती-पत्‍नी सकाळी लवकर उठू शकत नाही. आम्हा दोघांनाही सकाळी उठतांना खूप त्रास होतो. त्या दिवशी मात्र सकाळी लवकर उठून कार्यालयात जाण्यापूर्वी सर्व आवरून आरतीसुद्धा करता आली. असे फार क्वचित घडते. रामराज्यातील त्रासविरहित जीवन कसे असेल, याची अनुभूती दिल्याबद्दल श्रीराम व प.पू. डॉक्टर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्‍त झाली. ब्राह्ममुहुर्ताच्या आधी काही तास आम्ही खूप शांती अनुभवत होतो. नंतर ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी नामजप करतांना श्रीरामाचे अस्तित्व जाणवत होते. आमच्या हृदयातही तो आहे, अशी जाणीव वारंवार होत होती. - श्री. देवांग व सौ. रिशिता गढोया, न्यू जर्सी, अमेरिका.

 

 


गुढीपाडव्यानिमित्त
शुभेच्छापत्रे पाठवा!

नातेवाईक व मित्रमंडळींना सात्त्विक शुभेच्छापत्रे पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा द्या!



       

वरील शुभेच्छापत्रांवर क्लिक करून आपले शुभेच्छापत्र बनवा.

 

 


'गुढीपाडवा' ध्वनिचित्रपट


'गुढीपाडवा' कसा साजरा करावा?  - ध्वनिचित्रपट


गुढी कशी उभारावी?  - ध्वनिचित्रपट


गुढी खाली कशी उतरवावी?  - ध्वनिचित्रपट



--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

Reply all
Reply to author
Forward
0 new messages