ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची
महवंदनीय, अति प्राणप्रिय, ही माय मराठी अमुची....
हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली,
अस्मानी झळके भव्य पताका, भगव्या जरीपटक्याची......
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
प्रणाम घ्यावा माझा, हे श्री महाराष्ट्र देशा....
भीमा, वरदा, कृष्ण, कोयना भद्रा गोदावरी...
एकपणाचे भरती पाणी, मातीच्या घागरी....
योग्यांची अन संतांची, भक्तांची माळकऱ्यांची,
ही देव देश अन धर्मासाठी, प्राण वेचणाऱ्य़ांची....
योध्द्यांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची,
देशाचे रक्षण करण्यासाठी, जीव खर्चणाऱ्यांची....
ही भूमी सप्तसूरांची, रंगांची अष्टकलांची,
काव्याची, शास्त्रविनोदाची, ही भूमी साहित्याची....
महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची
महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची....
गीतकार: श्रीरंग गोडबोले.
संगीत: अजय-अतुल.
गायक: स्वप्निल बांदोडकर.
| मराठी युवा |