मराठी
ब्लॉगकट्टयाच्या माध्यमातुन आम्ही १२०० मराठी ब्लॉग्जची माहिती एकत्र केली व त्यानंतर इंटरनेटवर विखुरलेल्या मराठी ई-पुस्तकांचे एकत्रीकरण आम्ही
नेटभेट ई-पुस्तके या साईटमध्ये केले. एकुणच इंटरनेटवर मराठी भाषेत निर्माण होणारे साहित्य नेटभेटच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो.
यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ई-मराठीच्या या चळवळीत जास्तीत जास्त मराठी बांधवांचा समावेश व्हावा, मराठी मध्ये विविध विषयांवरील सकस लेखन वाढावे यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ब्लॉग्ज लिहावेत किंवा संकेतस्थळे चालवावीत, इंटरनेटवर मराठीचे अस्तीत्व प्रकर्षाने जाणवेल इतका ऑनलाईन मराठी वाचक व लेखकांचा टक्का वाढावा आणि जे बांधव यापुर्वीच या कामात गुंतले आहेत त्यांना जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने आमचे प्रयत्न चालु असतात.
याच उद्देशांतर्गत आम्ही वाचकांसाठी इंटरनेटवर मराठीचे प्रयत्नपुर्वक प्रतिनिधीत्व करणार्या संकेतस्थळांची यादी घेऊन आलो आहोत. याला आपण एक छोटेखानी वेब डीरेक्टरीच म्हणुयात. सध्याजरी या यादीतील संकेतस्थळांची संख्या १२२ इतकीच असली तरी मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ही यादी हजारो माहितीपुर्ण मराठी संकेतस्थळांनी सजलेली असेल.
कोणत्याही संकेतस्थळाचा या यादीत समावेश करण्यापुर्वी एकच निकष लावण्यात आला आहे तो म्हणजे "मराठी भाषा". मराठीशी संबंधीत विषयांवरील इंग्रजी संकेतस्थळांचा समावेश यामध्ये टाळण्यात आला असून फक्त आणि फक्त मराठी भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या संकेतस्थळांनाच या यादीत जागा देण्यात आलेली आहे.
या यादीत काही मराठी संकेतस्थळांचे नाव देण्याचे राहिले असल्यास कृपया आमच्या निदर्शनास आणुन द्यावे अशी वाचकांना आणि संकेतस्थळाच्या संचालकांना नम्र विनंती. सध्या ही यादी अगदी प्राथमिक स्वरुपात उपलब्ध असून लवकरच विषयवार मांडणी करुन ही यादी पुनर्प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे.
नेटभेटची ही वेब डिरेक्टरी अधिक प्रगल्भ आणि उपयुक्त होण्यास मदत व्हावी यासाठी वाचकांच्या प्रतीक्रीया आणि अभिप्रायांची आम्हांस अत्यंत गरज आहे. ही वेब यादी आपल्याला नक्की आवडेल याची आम्हांला खात्री आहे.
| साधं...सोपं... |
 |
http://www.sadha-sopa.com |
| तुमच्या माझ्या आयुष्यातल्या साध्या सोप्या घटनांवरच्या साध्या सोप्या कवितांची ही एक ऑनलाईन मैफील... इथे जेंव्हा यावंसं वाटेल तेंव्हा या... जे वाचावंसं वाटेल ते वाचा... आणि घटकाभर मन रमवून आपल्या कामाला लागा! |
|
| स्वीकृती सायकोथेरपी सेंटर |
 |
http://www.sweekruti.org |
| प्रत्येकाला मन आहे... काही ना काही समस्या आहेत... सर्व समस्यांचे मूळ प्रत्येकाच्या मनातच आहे... या समस्यांचा गुंता सोडवायचा असेल तर थोडं धाडस करावं, संकोच बाजूला ठेवावा आणि आत्मशोधाच्या यात्रेला सुरुवात करावी... सोबतीला आम्ही आहोतच... |
|
| प्रतिमा प्रकाशन |
 |
http://www.pratimaprakashan.com |
| १९८३ साली अरुण पारगावकर यांनी प्रतिमा प्रकाशन या संस्थेची स्थापना केली. २००८ मध्ये या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली. प्रतिमा प्रकाशनाने १७ मार्च २००८ रोजी रौप्यमहोत्सव समारंभपूर्वक साजरा केला. |
|
| लोकसंवाद |
 |
http://www.loksanwad.com |
| लोकांनी लोकांशी लोकांकरिता साधलेला सुसंवाद....संवाद... साधला जातो शब्दांमधून.... सुरांतून.... कधी शब्दसुरांच्या मैफलीतून...तर कधी नि:शब्द शांततेतून.. |
|
| महापॊलिटिक्स |
 |
http://www.maha.marathiwebsites.com |
| यात मीडिया, राजकारण आणि प्रशासन या क्षेत्रांतल्या खडानखडा घडामोडी तुमच्यासाठी अतिशय वेगाने उपलब्ध आहे तसेच अन्य महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषणही आहेच. याशिवाय आणखी एका सेग्मेंटमध्ये त्याचे फोटो विडियोही उपलब्ध आहेत. |
|
| मराठी मनोरंजन |
 |
http://www.marathimanoranjan.com |
| मराठी मनोरंजन क्षेत्रातील तारे तारका व त्यांचे चाहते यांना एकत्र आणणारं एक ऑनलाईन व्यासपीठ म्हणजे मराठी मनोरंजन डॉट कॉम! या व्यासपीठावर नव्या पिढीतल्या अनेक तारे तारकांचे ऑफिशियल फॅनक्लब्ज आहेतच या शिवाय अनेक तारे लिहित आहेत त्यांचे ब्लॉग्ज! या दोन्ही सोबत आपल्यासाठी येथे आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रामधील ताज्या घडामोडी, नव्या उपक्रमांची माहिती आणि परिक्षणे! |
|
| मराठी दर्पण |
 |
http://www.marathidarpan.com |
| सर्व मराठीजनाना मराठीतून ऍकमेकासी संवाद साधता यावा, मराठीतून अभिव्यक्त होण्यासाठी एक हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हाव हाच हेतु मनात ठेवून हे संकेत स्थळ तयार केल आहे. |
|
| बोला पुणे |
 |
http://www.bolapune.com |
| ’बोला पुणे’ काय आहे? - तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांवरील चर्चासत्रांची मालिका! प्रत्येक विषयामधील तज्ञांकडून मार्गदर्शन, सखोल चर्चा व त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तरे वजा संवाद |
|
| अंतरंग पुणे |
 |
http://www.antarangapune.com |
| या संकल्पनेच्या माध्यमातून रंगभूमीवरून झेप घेऊन चित्रपट दूरदर्शन क्षेत्रात नावारूपाला आलेल्या दिग्गजांना पुन्हा एकवार आपल्या घरटयाकडे यायला लावणार .. नऊ दिग्गज दिग्दर्शक अनेक दिग्गज लेखक आणि अभिनेत्यांना घेऊन नऊ एकांकिका सादर करणार एकाच ठिकाणी …. मराठी रसिक प्रेक्षकांना पुन:श्च एकवार नाटकाच्या सुवर्णकाळात घेऊन जाणारा एक अभिनव उपक्रम …. |
|
| मिसळपाव |
 |
http://www.misalpav.com/ |
| अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. |
| मराठी समुदाय |
| मनोगत |
 |
http://www.manogat.com/ |
| ज्यांना मराठीत लिहिण्याबोलण्याची आवड आणि इच्छा आहे त्यांना मराठीतून आपले विचार व्यक्त करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर सूचना, अभिप्राय, टीका टिप्पणी करण्यासाठी, आजूबाजूला चाललेल्या घटनांवर आपली मते मराठीतून व्यक्त करण्यासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे. |
| मराठी समुदाय |
| मराठीमाती |
 |
http://www.marathimati.com/ |
| मराठीमाती :महाराष्ट्र राज्य पर्यटण(सैर सपाटा), संस्कृती, साहित्य, महाराष्ट्रातील कला, क्रीडा विषयक अस्सल मराठमोळे मराठी संकेतस्थळ |
| मराठी समुदाय |
| लोकायत |
 |
http://www.lokayat.com/ |
| साध्या सोप्या मराठीतून संगणक आणि इन्टरनेटची ओळख करून देणे. रोजच्या वापरातील तांत्रिक बाबींतील अडचणी सोडवण्यासाठी हे संकेतस्थळ आहे. |
| संगणक |
| संत तुकाराम |
 |
http://www.tukaram.com |
| महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष तुकाराम (१६०९-१६५०) यांचे काव्य मराठी मनाचा चिरंतन आविष्कार आहे आणि तो ज्ञानदेव-नामदेवांपासून उत्क्रांत होत आलेल्या मराठी काव्याचा उत्कर्ष आहे. |
| व्यक्तीविषयक |
| अवकाशवेध |
 |
http://www.avakashvedh.com/ |
| सर्वांनाच नसेली तरी अवकाशाबद्दलची जिज्ञासा बहुतेकांना असते. विविध क्षेत्रांमध्ये मराठी भाषा प्रगती करीत असताना खगोलशास्त्र आणि अवकाश-विज्ञान या विषयामध्ये देखिल इंटरनेटच्या माध्यमातून मराठी माणसाचे ज्ञान वाढावे या उद्देशाने अवकाशवेध.कॉमची निर्मिती केली गेली आहे |
| ईतर |
| मराठी पुस्तके |
 |
http://marathipustake.org |
| मराठीत असलेले खुले व अभिजात वाङ्मय लोकांना मुक्तपणे वाचता यावे, त्याचा मुक्तपणे प्रसार व्हावा या करिता आम्ही पुढाकार घेत आहोत. या योजनेत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, किर्लोस्कर, देवल, राजवाडे, ह.ना. आपटे इत्यादिंचे साहित्य लोकांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे. |
| मराठी पुस्तके |
| मराठी सूची |
 |
http://www.marathisuchi.com |
| इथे तुम्हाला तुमच्या मराठी लेखांचे, मराठी ब्लोग्सचे, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी गोष्टी इ. नोंदी जमा करू शकतात. जिथे तुम्ही नोंद जोडल्यावर त्यावर तुमचे मित्र आणि संकेतस्थळाचे सदस्य मत नोंदवू शकतात, प्रतिक्रिया लिहू शकतात, आणि ते सुद्धा मराठीमध्ये. |
|
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
You received this message because you are subscribed to the Google Groups "माय मराठी " group.
.
.