श्री स्वामी समर्थां

14 views
Skip to first unread message

Shareyogesh

unread,
Jul 3, 2013, 1:50:16 PM7/3/13
to kiranpansare

आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्धअसलेल्या कर्दळीवनातीलनिबिड अरण्यात, एकांतस्थळी एकमहात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता, वेली,झुडपे, वारूळहीउगवू लागली. एकेदिवशी एका लाकूडतोड्याने वारूळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाववारूळ फोडून त्यासमाधीस्त योग्याच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोड्या भयभीत झाला. इतक्या त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देहभानावरआले. लाकूडतोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थविश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरूश्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला.म्हणूनच त्यांचा प्रगटदिन साजरा केला जातो.

श्रीशैल्य पर्वतराजीतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थांनीकोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या, हेइतिहासाला ज्ञात नाही. परंतु स्वामींच्या कथनातून वेळोवेळी जी माहितीझाली त्यातून काही आडाखे बांधता येतात.

ते सर्वप्रथम काशीक्षेत्री आले. त्यानंतर आसेतुहिमाचलविविध तीर्थक्षेत्रांतून त्यांनी भ्रमण केले. ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथमसोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले. स्वामींनीअक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ वास्तव्य केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते.

चैत्र वद्य 13, मंगळवार, बहुधान्यनाम संवत्सर शके 1800 इ.स 1878 यादिवशी सायंकाळी चारच्या सुमाराला श्री स्वामी महाराज निजानंदी विलीनझाले.

श्री स्वामींनी शिप्य श्री बाळप्पा महाराजांवरअनुग्रह केला. त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन,अक्कलकोटला मठ स्थापन केले. बाळप्पांनामंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदशाक्षरी महामूलमंत्राचा उपदेश केला.स्वामीभक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. बाळप्पा महाराजांनी स्वामींच्याआज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रेय गुरुपीठाची स्थापना केली. गुरू दत्तात्रेयांच्या परंपरेतीलभगवान अवधूत दत्तात्रेय, श्रीपादश्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती (गाणगापूर) आणि श्री स्वामी समर्थ अशी श्रेष्ठ गुरुपरंपरा अवधूत पीठास लाभली आहे.महान गुरू परंपरेतील श्री स्वामी समर्थांच्या नंतरचे चौथे उत्तराधिकारीम्हणून अक्कलकोट रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शिवपुरी आश्रमाचेसत्यधर्मप्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज 1938 मध्ये पीठारूढ झाले.

श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथनकेलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आत्मसाक्षात्कार करून घेण्याससाधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावरसाधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधनाकरावी. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर, हे मंत्रस्वरूप मानून अंत:करणाने ग्रहण करावे.अशी गुरुसेवाकेल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते. वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये. निरंतरकेवळ विषय चिंतन करणा-या स्त्री अगर पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीहीतसेच व्हाल. दुष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर, तुम्हीही दुष्ट व्हाल. एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशीभावना करा, जेणेकरून तुमचेमन निरंतर पवित्र राहील. परावलंबी नसावे, स्वत: उद्योग करावा व खावे. गांजा केव्हाही ओढूनये, त्याने अपाय होतो. आपल्याधर्माप्रमाणेच (कर्तव्यकर्मानुसार) वागावे, त्यानेच सर्वत्र विजय प्राप्त होतो. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवायशेत आपण होऊनपीक देत नाही, त्याचप्रमाणेतुम्ही स्वत: कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणारनाहीत. साधना करताना ज्या काही सिध्दी प्राप्त होतात, त्यांचा चमत्कार दाखविण्याच्या कामी उपयोग करणे गैर आहे. परमार्थज्ञानाचाउपयोग स्वचरितार्थाचे साधन म्हणून करणे हे अयोग्य आहे.

ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणा-या सर्व धर्ममतांचे व सर्वपंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत. या जगात प्राप्तहोणारी सुख-दु:खे, परमात्माच्याइच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा. मूर्तिपूजा हीत्याविषयी रहस्य जाणून करावी, केवळ मूर्तिपूजाचकरीत राहणे, हेचमनुष्यप्राण्याचे कर्तव्य नाही. परमात्मप्राप्ती हे खरे ध्येय असल्यानेउत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे

Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

Make money from Stock Market.
http://sanikastock.hpage.com



Get your own FREE website and domain with business email solutions, click here
319677_177215435756542_2121874495_n.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages