शुद्धलेखनाचे नियम शुन्य असावेत
भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी लागू केलेल्या शुद्धलेखन
नियमावलीत एकूण १८ नियम आहेत. त्यातील अनुस्वाराबाबत १ ते ४ नियम,
र्हस्व-दिर्घाबाबत ५ ते ८ नियम आणि 'किरकोळ' या मथळ्याखाली ९ ते १८ नियम
दिलेले आहेत. 'शुद्धलेखनाचे नियम शुन्य असावेत' हे विधान स्पष्ट करणारे
लेख, वेबवर प्रसिद्ध करण्याचा माझा विचार आहे.
वेगवेगळ्या वेब, ब्लॉक, कम्यूनिटी, ग्रूपवर ही चर्चा झाली तर सर्वांचे
विचार एकमेकांना कळायला सोपे जाईल. यातून संवादाला व्यापक स्वरूप येईल.
ज्या वेब, ब्लॉक, कम्यूनिटी, ग्रूप वगैरेंना यात भाग घ्यावासा वाटत असेल
त्यांनी मला ईमेल अथवा फोन-मोबाईलवर संपर्क साधावा.
जर कोणी यासाठी वेब सुरू करून, ती नेहमी माझ्यासाठी मॅनेज करायला तयार
असतील तर तशा व्यक्तींनी मला ईमेल अथवा फोन-मोबाईलवर संपर्क साधावा.
आपल्या सर्वांचा या चर्चेतील सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक लेख आणि
त्याबाबत वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अगत्याचे आहे.
त्यासाठी विविध वेब, ब्लॉक, कम्यूनिटी, ग्रूप वगैरेंना लेख पाठविणे आणि
मी तयार करून दिलेली उत्तरे सर्वांना पोस्ट करणे, असे कॉर्डीनेटरचे काम
करणार्या व्यक्ती अथवा संस्थेची मदत हवी आहे.
आपण अशी चर्चा घडवून आणायला काय मदत करू शकता ते कळवा.
आपला,
शुभानन गांगल.
१९/२०, आयडियल अपार्टमेंटस, गुलमोहर रोड, जुहू, मुंबई ४०००४९
फोनः ९१-२२-२६२०१४७३, मोबाईलः
९८३३१०२७२७, ईमेलः
ganga...@gmail.com