'सोपी मराठी खरी मराठी' हे पुस्तक १२ डिसेंबरला प्रसिद्ध करत आहे.
त्याचे मनोगत -
'''मराठीला सायन्स साक्षर बनवणे, हा सर्वात महत्त्वाचा विचार ठरतो.
या विचाराच्या मार्गात ज्या ज्या गोष्टी आड येतात त्यांचा समुळ नाश करणे
योग्य ठरते.
बदलत्या काळातील बदलत्या मराठीची ती एकमेव गरज ठरते.
पारिभाषीक शब्दांतुन उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करणे, हा पर्याय गेल्या
कित्येक पिढ्यांना उपलब्ध होता, पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही.
सायन्समधील 'प्रतीशब्द' आणि 'शुद्धलेखन' हे दोन अडथळे लेखकाला पार पाडावे
लागतात!
मराठीने देवनागरीत राहुन, जास्तीतजास्त परंपरा जपत, आवश्यक ते बदल घडवणे
गरजेचे आहे.
त्याचा प्रस्ताव या पुस्तकात मांडला आहे.
आपला स्नेही,
शुभानन गांगल