कॅश कशी जनरेट करायची?

5 views
Skip to first unread message

Yogesh Sawant

unread,
Apr 27, 2015, 3:09:48 AM4/27/15
to Yogesh Sawant

कॅश कशी जनरेट करायची?
कॅश कशी जनरेट करायची? रोकड पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडत असतो. जेव्हा लागेल तेव्हा बँकेचे ए.टि.एम. कार्ड वापरुन पैसे काढणे याला कॅश जनरेट करणे म्हणत नाहीत. विषेशतः नोकरी करणार्यास मध्यमवर्गीय माणसाला हा प्रश्न नेहमी पडत असतो. कॅश डिस्काऊंटचा फायदा घेण्यासाठी कॅशमधेच पैसे द्यावे लागतात. (अनेक ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा चेकने पेमेन्ट दिल्यास कॅश डिस्काऊंट देत नाहीत. उलट 2 ते 2.5 टक्के जास्त चार्ज लावतात.) तसेच रोजच्या भाजीपाला वगैरे वस्तुंच्या खरेदीसाठी कॅशच असावी लागते. मग ही कॉश कशी उभी करायची?

या साठी मी खाली एक अत्यंत साधा फॉर्म्युला देत आहे. 
1)
एक कॅश बॉक्स घ्या.
2)
या बॉक्समधे 1 रुपया टाका.
3)
रोज या कॅशबॉक्समधे पैसे टाका, पण ते पैसे आदल्या दिवशी टाकलेल्या पैशांच्या दुप्पट असले पाहीजेत. जसे पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसर्या् दिवशी 2 रुपये, तिसर्याम दिवशी 4 रुपये असे.
4) 15
दिवसांमधे या पद्धतीने किती पैसे जमा होतील हे खालील तकत्यात दिले आहे.
5)
दिवस कॅश बॉक्स मधे टाकायची रक्कम रु.
1 - 1
2 - 2
3 - 4
4 - 8
5 - 16
6 - 32
7 - 64
एकुण- 127
8 - 128
9 - 256
10 - 512
11 - 1024
12 - 2048
13 - 4096
14 - 8192
15 - 16384
एकुण-33767


याचा अर्थ तुम्ही 7 दिवसांत 127 रुपये किंवा 15 दिवसात 33767 रुपये कॅश जनरेट करु शकता. याच पद्धतीने तुम्ही 21 दिवसांमधे 4194303 30 दिवसांत 1073741823 एवढी कॅश नजरेट करू शकता. अनेकांना हे अशक्य वाटेल. पण ही गोष्ट कठीण वाटली तरी अशक्य नाही. सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसाने 15 दिवसांची योजना अंमलात आणायला काहीच हरकत नाही. कॅशबॉक्स मधे पडणारे पैसे शक्यतो रोजच्या खर्चातुन वाचलेले, घरातील रद्दी विकुन आलेले पैसे, कॅश डिस्काउंटमधे वाचलेले पैसे, इतर मार्गाने मिळालेली कॅश असावी. घरातील भंगार सामान विकुन बरीच कॅश जनरेट करता येते. घरातील नको असलेल्या जुन्या-पुराण्या पण चांगल्या कंडीशनमधे असलेल्या वस्तु विकुन पण कॅश जनरेट करता येते. काही कॅशची खरेदी पुढे ढकलुन कॅश बॉक्समधे पैसे टाकता येणे शक्य आहे. अगदी नाईलाज झालाच तर बँकेतील पैशांना हात लावावा.

माझा एक मित्र प्रत्येक महिन्याच्या 1 तारीख ते 15 तारीख या दिवसांसाठी हा संकल्प सोडतो त्यामुळे महीना अखेरीलासुद्धा त्याचेकडे भरपूर कॅश असते. माझा दुसरा मित्र हा संकल्प 15 तारीख ते 30 तारीख असा सोडतो व नवीन महिन्याची सुरवात खीशात असलेल्या भरभक्कम कॅशने करतो. 21 दिवस व 30 दिवसांसाठीचा संकल्प हा फक्त मोठे व्यापारी व व्यापारी संस्था यांसाठीच आहे.

या फॉर्म्युलाला पॉवर ऑफ मल्टिप्लिकेशन’ (Power of Multiplication) म्हणजेच गुणाकाराची ताकदअसे म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडींग’ (Power of Compounding) म्हणजेच चक्रवाढीची ताकदठाऊक असायला हवी तशीच ही गुणाकाराची ताकद पण ठाऊक असायला हवी. या दोन पॉवर्स’ (Powers) चा उपयोग आपण आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तसेच आपल्या आर्थिक उन्नत्तीसाठी कसा करुन घ्यायचा हे आपण शिकणे आवश्यक आहे.

अर्थात हा कॅश बॉक्ससंकल्प अंमलात आणायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?

 


--
Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

Make money from Stock Market.
http://sanikastock.hpage.com

Shareyogesh

unread,
Apr 27, 2015, 3:12:15 AM4/27/15
to babajipansare
Get your own FREE website, FREE domain & FREE mobile app with Company email.  
Know More >
Reply all
Reply to author
Forward
0 new messages