आज मला समजला की IPL मध्ये पुण्याला का घेतला नाही..... कारण आहे पुणेरी पाट्या.....
Puneri IPL Team notice boards @नेहरू स्टेडीयम
1. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल.
कुठल्याही परिस्थितीत रात्री ११ वाजता सामना संपविण्याची जवाबदारी आयोजकांवर राहील.
सवड मिळाल्यास उरलेला सामना पुढील दिवशी खेळता येईल
@ the Pavilion
१ ."फलंदाजा कडून धावा निघत नसतील तर मैदानावर उगीच टवाळक्या करत बसू नये"
२. गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा व फलंदाजांनी जपून टोलवावा, अन्यथा प्रत्येक नविन चेंडूचे ३० रुपये आकारण्यात येतील.
३. क्षेत्ररक्षकांनी दुपारी १ ते ४ या वेळेत उगीचच Howzzat म्हणून गोंधळ करू नये. जवळ सदाशिव पेठेतील लोक झोपलेली असतात.
@the Stadium Gates
१ . सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे. उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल.
तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा.
एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे.
5. फुंके (सिगारेट, बिड्या, चिलीम), थुंके (तंबाखु, गुटका, मावा, पान) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
6. मैदानात दारु विक्री केली जात नाही. मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
7. फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
@the Stadium Stands
१ . मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
२. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन, चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये; किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये.
अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
३. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देतानाहळु आवाजात आरडाओरड करावी.
हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नाही.
४. अनोळखी वस्तुंना स्पर्श करू नये ...व्यक्तिंसह !
५. सामन्याच्या दरम्यान तुटलेल्या चपला,कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेलीपर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांचीजवाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. तिकडे जाऊन तक्रार करावी.
६. हे पुणे आहे शिमला नव्हे! उन्हाळ्यात गरमहोणारच, पण म्हणून सामना पाहायलामैदानात शर्ट काढून बसू नये. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढण्यात येईल.
७. पाऊस पडून सामना रद्द झाल्यास पैसेपरत मिळणार नाहीत. कृपया हवामान खात्याशी सल्ला मसलत करून मगच तिकीट काढावे...
.
. एकटं एकटं हसु नका शेअर करा....