मनोधैर्य'मधून बलात्कार पीडितांना तीन लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य

2 views
Skip to first unread message

http://marathiasmita.info/

unread,
Sep 11, 2013, 10:17:21 AM9/11/13
to marathi-...@googlegroups.com
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य करणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी 'मनोधैर्य' ही नवीन योजना राज्यात सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ही योजना राज्यात दोन ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येईल. निर्णयाचा लाभ -१. या योजनेंतर्गत बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान दोन लाख रुपये व विशेष प्रकरणांमध्ये कमाल तीन लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. २. त्याचप्रमाणे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकास त्याचा चेहरा विद्रूप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास रुपये तीन लाख आणि इतर जखमांसाठी रुपये पन्नास हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. ३. या अर्थसहाय्याशिवाय अशा पीडित महिला व बालक यांना किंवा त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या आधारसेवा उपलब्ध करून देण्यात येतील. ४. याशिवाय, प्रत्येक प्रकरणात पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, वैद्यकीय उपचार, प्रवास व इतर अनुषंगीक तातडीच्या खर्चासाठी देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील जिल्हा क्षति सहाय्य व पुनर्वसन मंडळामार्फत करण्यात येईल. सद्य:स्थितीत या योजनेतंर्गत येणारा खर्च राज्य शासनामार्फत भागविण्यात येणार आहे. केंद्र शासनाची योजना अंमलात आल्यावर त्याप्रमाणे योजनेची अंमलबजावणी करण्यास व निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages