Groups
Groups
Sign in
Groups
Groups
Marathi Material
Conversations
About
Send feedback
Help
मॅजेस्टिक ई पुस्तकांची ऑनलाईन विक्री करणार
2 views
Skip to first unread message
marathiasmita.info
unread,
Sep 11, 2013, 8:17:08 AM
9/11/13
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to marathi-...@googlegroups.com
मॅजेस्टिक ई पुस्तकांची ऑनलाईन विक्री करणार
- -
बुधवार, 11 सप्टेंबर 2013 - 03:30 AM IST
मुंबई - पुस्तकांच्या खरेदीसाठी दुकानात जा, ती खरेदी करा, सांभाळत घरी न्या या सगळ्यांतून वाचकांची सुटका करण्यासाठी ऑनलाईन पुस्तक खरेदीचा पर्याय पुढे आला. फ्लिकर आणि बुकगंगाने हा पर्याय उपलब्ध केला असताना आता या स्पर्धेत मॅजेस्टिकही उतरणार असून, सध्याच्या टेक्नोसॅव्ही वाचकांसाठी मॅजेस्टिक प्रकाशनने ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केली आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर सर्व प्रकाशकांची मराठी आणि इंग्रजी पुस्तक खरेदीची सुविधा उपलब्ध होणार असून, ती वाचकांना घरपोच मिळणार आहेत. majesticonthenet.com या संकेतस्थळावर ही सेवा उपलब्ध होणार आहे. संकेतस्थळाची वैशिष्ट्ये - कादंबरी, कथा व कवितासंग्रह, नाटक, पाककृती, बालवाड्.मय, अनुवादित पुस्तके, समीक्षा अशी सर्व प्रकारची आणि प्रकाशकांची पुस्तके एका क्लिकवर खरेदी करता येणार. - महाराष्ट्रातील सर्व प्रकाशकांची 300 किंवा त्यावरील किमतीची मराठी आणि इंग्रजी ऑनलाईन खरेदी केलेली पुस्तके मॅजेस्टिक स्वखर्चाने वाचकांपर्यंत पोहोचविणार आहे. - "कॅश ऑन डिलिव्हरी' या योजनेंतर्गत 500 रुपये व त्यावरील पुस्तके ऑनलाईन पेमेंट न करता थेट घरी आलेली पुस्तके पैसे देऊन घेता येतील. - कॅश ऑन डिलिव्हरीची सेवा सध्या मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी आणि पुणे येथे उपलब्ध असेल.- वेबसाईटवर कथाकथन, नाटक, बालगीते, शास्त्रीय संगीत, भक्तिगीते, चित्रपट यांच्या सीडीही खरेदी करता येतील. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचकाला त्याच्या गरजेनुसार सुविधा पुरविणे आवश्यक आहे. त्यानुसार काळाची गरज ओळखून आम्ही हे पाऊल उचलले असून, पुढच्या टप्प्यात ई पुस्तकेही वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. - अशोक कोठावळे, प्रकाशक, मॅजेस्टिक प्रकाशन.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages