अमर फोटो स्टुडियो चा प्रस्ताव जेव्हा आला, तेव्हा हा प्रयोग नक्की करायचा हा निर्णय घेण्या मागे दोन प्रमुख घटक होते.
१. मंडळाचा सहभाग असणारं पहिलं नाटक हेच असावं !!! सुनील बर्वे, निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, सिद्धेश पुरकर आणि पूजा ठोंबरे हे सर्व एका व्यासपीठावर, एकाच आविष्कारात भेटणार हा 'फोर्मुला' जादू करणार आणि
२. नाटक नक्कीच रंगणार, प्रेक्षक भरभरून दाद देतीलच हि सुद्धा खात्री आम्ही मनात बाळगून होतो!!
आणि त्या दिवशी हजेरी लावलेल्या तुम्हा प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा, शाबासकी चे शब्द, मदतीचं आवाहन ह्या सर्वांनी आम्ही भारावून गेलो, तेव्हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!!!!!
खूप काही सांगण्या सारखं आहे पण काही ठळक वैशिष्ट्य नमूद करतो -
१. प्रयोग सुरु झाल्या नंतर ५-१० मिनिटात Backstage ला निपुण आणि सुनील "अरे काय प्रेक्षक आहेत यार इथे मजा येणार आज". हशा आणि टाळ्या अशा स्वरूपाचं हे नाटक आहे आणि हे दोनही परवाच्या प्रयोगात तुम्ही उत्स्फूर्तपणे दिलंत, हि भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली. कलाकाराला ह्याहून अजून काय हवं
२. हे नाट्यगृह सुंदर आहे, तांत्रिक दृष्ट्या तसेच ग्रीन रूम्स किंवा कलाकारांना कुठलाही प्रयोग यशस्वी करायला ज्या प्रकारची वास्तू लागते त्यातील बऱ्याच सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत
३. मेडनहेड, रेडींग किंवा आस पासचा परिसर तसेच swindan इथून देखील प्रेक्षक यायला तयार होते आणि आले.
४. लहान मुलां कडे लक्षं द्यायला वेगळी प्रशस्त खोली तसेच त्या क्षेत्रातील तज्ञ (सौ स्नेहल वैशंपायन) असल्या कारणाने - पालकांना बऱ्याच प्रमाणात प्रयोगाची रंगत अनुभवता आली
ह्याच बरोबर परवाच्या आभार प्रदर्शनात आवर्जून ज्यांचा उल्लेख करायचा होता पण राहून गेला (पूर्णतः माझी चूक :-( ) त्यांचे इथे जाहीर आभार मानतो -
१. ह्या सर्व घडामोडीं मागील ऊर्जा, शक्ती किंवा नवचैतन्याचं वादळ म्हणूयात - श्री हर्षवर्धन सोमण. हर्ष आख्या भेटीचं आयोजन करतो. प्रत्येक मंडळ जे काही आणि जितकं काही सहाय्य्य करू शकेल ते करतं. फक्त, आयोजन न करता हर्ष स्वतः नाटकाला लागणारा set इथे बनवतो!!!! झपाटलेला ह्या शब्दाचं उदाहरण पाहायचं असेल, तर हर्ष सोबत १५ मिनिटं घालवा :-) :-) आणि असं करताना तो आपल्याला देखील त्या प्रवाहात हलकेच ओढून घेतो
२. swindan मंडळाच्या भार्गवी सरपोतदार आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचे देखील खूप आभार - त्यांच्या सहकार्या मुळे तिकीट विक्री तसेच कार्यक्रमाचं आयोजन सुकर झालं - आवर्जून नमूद करायचं म्हणजे रेडींग प्रमाणेच swindan मंडळाची देखील हि पहिलीच वेळ होती, अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची
३. स्लाव मित्र मंडळाचे (श्री अजय मुरुडकर ) देखील खूप आभार - तिकीट विक्री मध्ये त्यांनी केलेली मदत नक्कीच मोलाची ठरली
४. श्री उन्मेष बुचके - लेस्टर स्थित उन्मेष हर्ष च्या प्रत्येक प्रकल्पात त्याला set च्या ने आणी मध्ये तसेच एक बॅकस्टेज कलाकार म्हणून मोलाची मदत करतात. समोरच्याला आपलंसं करून घेण्याचं उन्मेष च कसब वाखाणण्याजोगंच आहे!
५. सौ चारुता सोमण - फ्रंट ऑफिस ची कामगिरी व्यवस्थित घडण्या मागे चारुता चा सहभाग महत्वाचा आहे त्याच प्रमाणे कलाकारांच्या सर्व प्रकारच्या व्यवस्था योग्य होतायत अथवा नाही ह्या मध्ये देखील चारुता मोठी मदत करते
६. त्या दिवशी शॉर्ट आणि खरं तर ऍड हॉक स्वरूपाच्या चौकशी निशी तात्काळ मदतीला उभे राहिलेले हक्काचे शिलेदार - अतुल व आदिती हिरणवार, केतन दामले, घनश्याम आपटे, चेतन कुबेर, नितीन कानडे, अमित भावे, जीवन काळे व अजूनही काही हात ज्यांची नावं आत्ता सुचत नसली तरी त्यांचे हि खूप सारे आभार व्यक्त करतो.
सर्वात शेवटचे आभार त्यांचे ज्यांनी मला व्यक्तिशः सांगितले कि पुढील वाटचालीत आम्हाला काही मदत हवी असेल तर नक्की सांगा! जरूर सांगूच :-)
पुढील प्रयोग? किंवा अजून काहीतरी अफलातून??? कलाकृती बद्दल लवकरच लिहू....:-)
Kind regards,
Raghavendra
On behalf of Marathi Mandal Reading
marathiman...@gmail.com
https://www.facebook.com/groups/marathimandalreadinguk/?ref=bookmarks