नमस्कार मंडळी,
कोविड च्या ह्या काळात आपण सर्वच जण new normal ह्या संकल्पनेशी जुळवून घेत आहोत. lock down हळू हळू शिथिल होत असल्यामुळे कला, कलाकार, चित्रपट, गायक अशी मंडळी देखील झूम, फेसबुक अशा व्यासपीठांवरून आपल्याशी संवाद साधत आहेत. त्यांचे येऊ घातलेले प्रकल्प आपल्या समोर सादर करायला एका नव्या उत्सुकतेने तयार आहेत.
काय गम्मत आहे पहा, आत्ता पर्यंत आपण आपल्या आई वडिलांना किंवा इतर नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना technology आणि मुखत्वे social media platforms शी ओळख करून घेऊन आपल्याशी बोलायला, एकमेकांना पाहायला, एकमेकांचे photos पाठवायला शिकताना आणि त्यात माहीर बनताना पाहिले. तेव्हा कुठे वाटलं होतं का कि हेच platforms आपले saviours ठरतील!
परंतु हि परिस्थिती अंगीकारून सर्व कलाकार त्यांची कला आपण पुढे सादर करायला सज्ज झाले आहेत.
कलाकार -तंत्रज्ञ सगळे आपापल्या घरातून काम करुन HD streaming चा आनंद देतात ही तंत्रतज्ञानाची कमाल अनुभवण्यासारखी आहे.कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आणि जगभरातील मराठी रसिकांनी गौरवलेले हे नेटक आता आपल्या भेटीला येत आहे, तेव्हा मनोरंजनाच्या या नव्या अनुभवाचे स्वागत करुया.
नेटकची संकल्पना आणि मोगराचे दिग्दर्शक - हृशिकेष जोशी;लेखक - तेजस रानडे;संगीत - अजित परब
*कलाकार - गौरी देशपांडे, मयुरा रानडे, भार्गवि चिरमुले, स्पृहा जोशी आणि वंदना गुप्ते*
*८ ऑगस्ट २०२० संध्याकाळी ५ वाजता UK वेळे प्रमाणे –
Book tickets on www.charutaentertainments.com