दिनूचे बिल

268 views
Skip to first unread message

कोंबडी

unread,
Jun 9, 2006, 11:03:41 PM6/9/06
to manoga...@googlegroups.com

आचार्य अत्रे यांची ही बालकथा बहुदा पूर्वी मराठी अभ्यासक्रमात असे. माझ्या वेळपर्यंत ती अभ्यासक्रमातून वगळली गेली होती. मध्यंतरी एकदा अत्र्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्याचे संकलन असलेल्या ध्वनिफितीत ही कथा सापडली, आणि अत्र्यांचा एक वेगळाच पैलू समोर आला. "श्यामची आई" सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन अशीच संवेदनशील व्यक्ती करू जाणे!

मला मनापासून आवडलेली ही कथा मनोगतींसाठी ध्वनिफीत ऐकून टंकलिखित करीत आहे. तेव्हा चू. भू. द्या. घ्या.

कथेची शेवटची ओळ मला अधिक भावते. तुम्हालाही नक्की आवडेल.

- कोंबडी

दिनूचे बिल

दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणी तपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत. कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा." तर कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं बिल किती झालं ते सांगा."

दिनू एका लहानश्या खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे त्याला अजून कळले नव्हते.

दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"

डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात बिल. वाच!"

दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं -

रोग्याला तपासण्याबद्दल ... १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल ... २० रुपये
आठ वेळा औषधांबद्दल ... ८ रुपये
-------------------------
एकूण ... ३८ रुपये

दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय वाटले कोणास ठाऊक? काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्या आईच्या नावावर एक बिल तयार केले. त्याच्यावर लिहिलं होतं - 

आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये
शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे
-----------------------------------
एकूण ... ४ रुपये

ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी लवकर उठला. त्याच्या उशाशी ४ रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरी लिहिलेले होते. त्याने कागद उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केले होते.

लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही
गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही
---------------------------------
एकूण ... काही नाही.

दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले, व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला.

आईने दिनूला कुरवाळले. आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली,

"तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"

 

 

 

 

मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी
मनोगत : आस्वाद विवाद संवाद

चक्रपाणि

unread,
Jun 9, 2006, 11:23:37 PM6/9/06
to manoga...@googlegroups.com

शाळेत

चौथीपाचवीत कधीतरी मराठीच्या पाठ्यपुस्तकात ही गोष्ट अभ्यासायला होती. छान आहे. पुन्हा इथे वाचायला मिळाल्याबद्दल कुकूऽच कूऽऽ (मनःपूर्वक धन्यवाद!) (ह. घ्या.)

राजीव_अनंत

unread,
Jun 10, 2006, 12:39:49 AM6/10/06
to manoga...@googlegroups.com

कथा

आचार्यांची कथा भावस्पर्शी आहे.

राजीव अनंत भिडे.

द्वारकानाथ कलंत्री

unread,
Jun 10, 2006, 3:01:42 AM6/10/06
to manoga...@googlegroups.com

समयोचित.

अत्रे यांची येत्या १३ ला पुण्यतिथी आहे. या काळात त्यांचे समयोचित स्मरण केल्याबद्दल आभार.

शीला७१२

unread,
Jun 10, 2006, 8:23:52 AM6/10/06
to manoga...@googlegroups.com

ह्रदयस्पर्शी

अतिशय भावुक कथा.आपण मनोगतावर सादर केल्याबद्दल धन्यवाद.

शीला

लिखाळ

unread,
Jun 10, 2006, 11:55:57 AM6/10/06
to manoga...@googlegroups.com

आभार.

कथा टंकलिखित करून येथे देण्याच्या उत्साहाचे कौतुक आणि धन्यवाद.
--लिखाळ.

अभिजित पापळकर

unread,
Jun 12, 2006, 4:11:41 AM6/12/06
to manoga...@googlegroups.com

भावस्पर्शी !

खरेच भावस्पर्शी कथा;

अभिजित

एकलव्य

unread,
Jun 10, 2006, 4:12:47 PM6/10/06
to manoga...@googlegroups.com

माझेही...

... असेच आभाराचे शब्द स्वीकारावेत.

धन्यवाद कोंबडीताई!

एक वात्रट

unread,
Jun 12, 2006, 5:37:50 AM6/12/06
to manoga...@googlegroups.com

२४८८??

हे २४८८ काय आहे? thinking

एक वात्रट

एक वात्रट

unread,
Jun 12, 2006, 8:05:30 AM6/12/06
to manoga...@googlegroups.com

अहो पण...

त्यांना चांगलं कोंबडी हे नाव आहे की. त्यांना असं एखाद्या कैद्याला बोलवावं(कैदी नं. ४२० हाजीर हो...) तसं मनोगती नं. २४८८ असं का बोलवताय? tongue

एक वात्रट

एक वात्रट

unread,
Jun 12, 2006, 5:34:10 AM6/12/06
to manoga...@googlegroups.com

सुंदर !

सुंदर कथा, माझी खूप आवडती.

आपल्या अत्रेसाहेबांचं हेच तर वैशिष्ट्य आहे. एका बाजूला खो खो हसवतील, कधी कधी अशी भावपूर्ण कथा सांगून रडवतीलही.

एक वात्रट

मृदुला

unread,
Jun 12, 2006, 5:43:35 AM6/12/06
to manoga...@googlegroups.com

गोष्ट आवडली

छान गोष्ट. इथे दिल्याबद्दल आभार.

अनुप्रिता

unread,
Jun 12, 2006, 8:32:14 AM6/12/06
to manoga...@googlegroups.com

पिल्लांसाठी

कोंबडीताईंसह सगळ्यांच्याच पिल्लांना सांगण्यासारखी गोष्ट आहे. लहानपणची आठवण पुन्हा करुन दिल्याबद्दल आभार.

चित्त

unread,
Jun 12, 2006, 11:31:54 AM6/12/06
to manoga...@googlegroups.com

धन्यवाद

कोंबडी, कथा टंकून इथे टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अत्र्यांच्या इतरही लघुकथा द्यावात ही विनंती.

भोमेकाका

unread,
Jun 13, 2006, 12:13:22 PM6/13/06
to manoga...@googlegroups.com

गोष्ट इथे

लिहिल्याबद्दल...

शाबासकी!

टग्या

unread,
Jun 13, 2006, 3:52:35 PM6/13/06
to manoga...@googlegroups.com

सहमत

अत्र्यांच्या इतरही लघुकथा द्यावात ही विनंती.

सहमत. शालेय वयात अत्र्यांची 'समुद्राचे देणे' या नावाची एक अशीच हृदयस्पर्शी कथा वाचली होती. संग्रही असल्यास आणि शक्य झाल्यास द्यावी. (आपण किंवा इतरही कोणी.)

- टग्या.

टग्या

unread,
Jun 13, 2006, 3:48:08 PM6/13/06
to manoga...@googlegroups.com

आभार

सुंदर, हृदयस्पर्शी कथा. संग्रहणीय. लहानपणी वाचली होती. इथे दिल्याबद्दल आभार.

- टग्या.

श्रावणी

unread,
Jul 5, 2006, 12:10:43 PM7/5/06
to manoga...@googlegroups.com

मीही!

कथा इथे दिल्याबद्दल मी ही आभारी आहे. आणखी कथा वाचायला आवडतील.

श्रावणी

प्रभाकर पेठकर

unread,
Jul 5, 2006, 1:13:17 AM7/5/06
to manoga...@googlegroups.com

तात्पर्य..

कथेचे तात्पर्य फक्त आई-मुलाच्या नातेसंबधापुरते मर्यादीत नसून सर्वच क्षेत्रात आपले 'डोळे उघडणारे' आहे.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages