गरीब बिचाऱ्या चिमणीला,
सगळे टपले छळण्याला,
चिमणीला मग राघू बोले,
का गं
तुझे डोळे ओले ?
काऽऽय सांगू बाबा
तुला,
एकटे पणा छळतो मला
!
राघू होता हुशार
फार,
त्याने दिले सल्ले चार !
"झाडां वरती फिरून
यावे,
गाणे गोड गावून
यावे.
बाजूला मग जाऊन
यावे,
गप्पा टप्पा मारून
यावे,"
राघूच्या सल्ल्याने
चिऊताई खूश झाली- खालच्या
साळूबाईंशी गप्पा मारायला
गेली.
साळू बाई, साळू बाई;
कसली
तुमची नेहमीच घाई ?
शेजारी
जरा बसाहो ताई,
तक्रार माझी
फार नाही.
नाही गं बाई,
चिऊताई,
बसायला मला वेळच
नाही,
शाळेची तयारी करायची
घाई,
त्यातच छोटूचा गणवेश
नाही,
वह्या पुस्तके आणायची
बाकी
कव्हर्स त्यांना
घालायची खाकी
होतील आता
पिल्ले गोळा,
करते हं मी
त्यांच्या पोळ्या.
चिमणी ती मग हिरमुसली
झाडा
वर जाऊन बसली
तिकडून आला
चिमणा छान
होता तो खूप गोरा
पान.
येते का गं फिरायला,
गोड
गाणी म्हणायला.
झाडांवरती
फिरून येऊ
गोड गाणी गाऊन
येऊ.
चिमणी आमची खुशीत आली
गाणे
गोड गाऊ लागली
झाडां वरती
फिरू लागली,
चिमण्या संगे
भुर्र उडाली.
खटकले!
बालगीतात कव्हर्स शब्दाऐवजी दुसरा शब्द कोणता वापरावा? मराठी बालगीतात तो शब्द खटकला.छान
आधुनिक चिमणीची गोष्ट छान आहे.अहो श्रावणी -
अहो श्रावणी,छान
माधवराव,
पक्ष्यांचे बालगीत छान आहे.
आपला
(पक्षीनिरीक्षक)
प्रवासी
कव्हरं...
"कव्हर्स"ऐवजी "कव्हरे"/बोली "कव्हरं" असे त्यांचे मराठीकरण केल्यास कसे?
- टग्या
छान
माधवराव, बालगीत आवडले, छान आहे!चिमणी
माधवराव,
चिमणीचे बालगीत खूप छान आहे. आवडले. मला चिमणी खूप आवडते त्यामुळे जास्तीच आवडले.
रोहिणी
सुंदर बडबडगीत
माधवराव,
फारच गोड गीत.
- कुमार
धन्यवाद !
सर्वांना मनापासून धन्यवाद !अक्षर.
माधव,
लिहिता छान. अक्षर किंचित लहान काढले असतेत तरी लोकांनी वाचले असते.
राजीव अनंत भिडे.
अगस्ती, भिडे,टगेराव,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
अगस्ती,
मध्येच एखादा झटका
येतो कविता वगैरे लिहायचा पण
करणार काय येथे चुकीच्या
दुरूस्त्या
सुचवणाऱ्यांपेक्षा काड्या
कोरणारे जास्त आहेत म्हणून
घाबरतो !
भिडे साहेब,
आपली सुचना मान्य. बरहा वरून येथे कॉपी पेस्ट करताना अंदाज न आल्याने फाँट्स जरा जास्तच मोठ्या झाल्यात त्यामूळे हा गोंधळ झाला असावा ! पुढील वेळा लक्षात ठेवेन - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
टगेराव,
कव्हरं हा शब्द जरा
चपखल बसतो- धन्यवाद.
गोरापान चिमणा
कविता मजेदार, छान. कधी न आढळणारा गोरापान चिमणा प्रथमच बघितला. असो. जे न देखे रवी, ते देखे बालकवी.
चित्तरंजन
चिमणीला
माधव कुळकर्णी,
बालगीत मैनेला पण आवडले. राघू हुशार आहे ना त्यात म्हणून!
मस्त कविता
एकदम मस्त. चालीत म्हणता येतेय.धन्यवाद !
धन्यवाद मैना मावशी !