"ओळखलत का सर मला? " पावसात
आला कोणी
कपडे होते
कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला
वरती पाहून
गंगामाई पाहुणी
आली गेली घरट्यात राहून.
माहेरवाशीण पोरीसारखी
साऱ्या घरभर नाचली
रिकाम्या
हाती जाईल कशी बायको तेवढी
वाचली.
भिंत खचली, चूल विझली
होते नव्हते नेले
प्रसाद
म्हणून पापण्यांवरती पाणी
तेवढे ठेवले.
कारभारणीला
घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखल गाळ काढतो आहे खचली भिंत
बांधतो आहे.
खिशाकडे हात
जाताच हसत हसत उठला
पैसे
नकोत सर जरा एकटेपणा वाटला.
'मोडून पडला संसार तरी मोडला
नाही कणा
पाठीवरती हात
ठेवून फक्त लढ म्हणा'.
-: कुसुमाग्रज :-
कवितेचे नाव "कणा"
ही माझी आवडती कविता आहे.मला ही
कविता
दहावीच्या शालेय
अभ्यासक्रमात होती. खूप
आवडते..
अवांतरः "गद्य
साहित्या" त कविता
लिहीण्यापेक्षा "कविता" या
सदरात त्या टंकाव्यात.
तुम्हाला " आजीच्या जवळी
घड्याळ " कविता पुर्ण येत
असल्यास ती टंकावी. मला नेमकी
काहीच कडवी येतात.
तसेच मी
"उंच उंच डोंगर भवतीऽऽऽ चढले
नील नभात - भिल्लाचे पोर" आणि
"सागरगोट्या खेळत असताना दादा
येताना कवियत्रीला दिसतो आणि
तिचा आनंद गगनात मावत नाही अशा
आशयाची एक कविता होती, नाव
स्मरत नाही" अशा दोन्ही कविता
कुणाला आठवत असल्यास एकण्यास
उत्सुक आहे.
माझीही आवडती...
ही माझीसुद्धा आवडती कविता आहे. नक्की आठवत नाही पण नववीमध्ये होती असं वाटतंय.
तेव्हापासून मी या कवितेची फॅन आहे. आहेच तशी कविता म्हणा... माझ्या ओळखीच्या सगळ्या मराठी कळणाऱ्या लोकांना ही कविता आवडते.
काही
दिवसांपूर्वीच मी ही कविता
मनोगताच्या एडिटर मध्ये
लिहून त्याची छापील प्रत करून
घेतली
गद्य व कविता
कविता/ पद्य विभागात स्वतः केलेल्या कविता तर इतरांच्या कवितांचा आस्वाद गद्य विभागात असे वर्गीकरण आहे असे मला वाटते.
बाकी कुसुमाग्रजांची कणा कविता उत्तमच. अभ्यासक्रमात नव्हती तरी ऐकलेली, वाचलेली आहे. मूर्तीमंत सकारात्मक दृष्टीकोन.
स्थलांतरित
हे लेखन आता कविता विभागात स्थलांतरित केलेले आहे.धन्यवाद
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 'आजीचे घड्याळ' कविता बहुतेक माझ्याकडे आहे. असेल तर नक्की देईन.भिर भिर वारा व्यापुनिया, टाकी सारा प्रांत ll
तरु वेलिने नटलेल्या, या खो-यात सुरेख l
करवंदे विकण्यासाठी, हे भिल्लाचे पोरं ll
करवंदे घ्या करवंदे, सांगतसे ओरडुन l
स्पटिका सम सुंदर दिसती, दंत किती शोभुन ll
हि कविता माझी आई सरिता शिरधनकर, वय-७९ वर्षे हि आज गुण गुणत होती. मी ती ऐकली आणि मला ती आवडली, म्हणून मी तिला पुढे पुर्ण कविता म्हणायला सांगितले, परंतु ती याच्या पुढे सांगू शकली नाही. जर कुणाला या पुढे माहित असेल तर त्यांनी प्लिज ती पुर्ण करा.