भाषेत अपभ्रंश कसे होतात

291 views
Skip to first unread message

अवधूत कुलकर्णी

unread,
Oct 17, 2006, 1:18:12 PM10/17/06
to manogat_...@googlegroups.com

सध्या म. श्री. दीक्षित लिखित "आम्ही चित्पावन" हे पुस्तक वाचतो आहे. त्यांच्या मते चित्पावन हा शब्द क्षितिपावन या शब्दापासून बनला. त्यांनीच चर्चा केल्याप्रमाणे हा शब्द 'चिपळूण' शब्दापासून अपभ्रंश स्वरूपात रूढ झाला असल्याचेही काहींचे मत आहे. क्षितिपावनपासून चितिपावन>चित्तिपावन>चित्तापावन>चित्तपावन>चित्पावन अशा क्रमाने व्युत्पत्ती मिळू शकते. मात्र चिपळूण शब्दापासून चित्पावन हा अपभ्रंश कसा झाला हे कळू शकत नाही. मूळ शब्दाचा अपभ्रंश बनण्याची क्रिया कशी असते याविषयी कोणी माहिती देऊ शकेल का?

अवधूत.

मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी
मनोगत : आस्वाद विवाद संवाद

विकि

unread,
Oct 17, 2006, 1:43:13 PM10/17/06
to manogat_...@googlegroups.com

विद्रोही साहित्यिकांना विचारा.

विद्रोही साहित्यिकांना विचारा.आम्ही चित्पावन" हे पुस्तक वाचतो आहे. हे वाक्य.

प्रियाली

unread,
Oct 17, 2006, 3:04:55 PM10/17/06
to manogat_...@googlegroups.com

अपभ्रंश

कोणत्याही शब्दाचा अपभ्रंश हा तीन कारणास्तव होत असावा.

  • आकलन
  • श्रवण
  • उच्चार

एखाद्या शब्दाचे नीट आकलन न झाल्याने त्या शब्दाशी साधर्म्य साधणारा शब्द वापरणे. एखादा शब्द योग्य रीतीने न ऐकल्याने व तो सहसा लिहिल्याने किंवा भविष्यात इतरत्र वापरल्याने त्याचा अपभ्रंश होणे व एखाद्या शब्दाचा उच्चार व्यवस्थित न जमल्याने तो अयोग्य किंवा वेगळा उच्चारला जाणे.

नीलकांत

unread,
Oct 18, 2006, 2:50:14 AM10/18/06
to manogat_...@googlegroups.com

आणि एक प्रकार

विदर्भात मुसलमानी हिंदी नावाचा प्रकार आहे. या बोलीत एक विशिष्ट प्रकारचा हेल कायम ठेवून जगातील कुठल्याही भाषेतील शब्द बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात त्यांच्यात असाच संवाद होतो. आणि हा संवाद सार्वजनिक स्थळि असेल तर इतरांचे मनोरंजन होते.

उदा. "मैने तेरेकू इस्कुटर लानेकू कया था ना? "

 'वो बंद पडेली है । कितन्या किका मारके मै थक गया लेकीन वो इस्टर्टच नै हूयी।"

ही एक बोली आहे. यात हेल महत्त्वाचा आहे. आणि अपभ्रंष हे वैशिष्ट्य.

वैदभीय बोली म्हणजेच वऱ्हाडी बोलीत सुद्धा अनेक अपभ्रंश आहेत. खरंतर बोलीत अपभ्रंश जास्त असतात. (येथेच निर्माण होतात असं म्हणा हवं तर) महाराष्ट्रातील प्रत्येक बोलीत असा प्रकार दिसतो.

मात्र तरी प्रत्येक बोलीचा एक विशिष्ट हेल असतो. तो काय ठेवूनच कुठलाही अपभ्रंश होत असावा. अर्थात ही सहज होणारी प्रक्रिया आहे.

---------------------------------------------------

विकी साहेव विद्रोहींवर चिडलेले दिसतात, किंवा त्यांच्या साहित्याचं सखोल वाचन सुरु झालेलं दिसतं. नेमकं काय झालं ते कळेल का?

नीलकांत

अभय नातू

unread,
Oct 17, 2006, 4:12:20 PM10/17/06
to manogat_...@googlegroups.com

अजून एक प्रकार

जाणून-बुजून भ्रष्ट केलेले उच्चार.

अमेरिकेत एबोनिक्स नावाची एक बोली भाषा तयार होत आहे. मुख्यत्त्वे श्यामवर्णीय व्यक्ती ही भाषा बोलतात/लिहीतात. इंग्लिशपासून तयार झालेल्या या भाषेत इंग्लिशमधील अनेक शब्द भ्रष्ट करून योजलेले आहेत. उदा. आस्क - ऍक्स, गिव्ह मी - गिब्मी, मदर - मुदा, इ.

यात आकलन, श्रवण, उच्चारांपेक्षा रूढ इंग्लिशपासून वेगळे बोलण्याकडे जास्त भर दिसतो.

अ. ना. 

चित्त

unread,
Oct 20, 2006, 7:07:12 AM10/20/06
to manogat_...@googlegroups.com

उमगलेली कारणे -

मला उमगलेली अपभ्रंशामागची कारणे  -

१. परकीय शब्द जेव्हा एखाद्या भाषेत येतात (जेव्हा त्यांचे आदान होते) तेव्हा ती भाषा, गरज असेल तिथे, आपली लकब, उच्चारांची वैशिष्ट्ये सांभाळण्याचा प्रयत्न करते. कधीकधी काही अक्षरे त्या भाषेत नसतातच. अशावेळी अशी अक्षरे असलेल्या शब्दांचा अपभ्रंश होतो.

२. कालानुरूप भाषा बदलते. उच्चार बदलतात. शब्द बदलतात. तसेच जुन्याजमान्यात शिष्टसंमत असलेले काही उच्चार गळून पडतात. शब्द अशाप्रकारे हळूहळू अपभ्रष्ट होत जातात.

३. अभिजनांची भाषा वेगळी आणि बहुजनांची भाषा वेगळी. बहुजनांच्या भाषेचा शब्दांच्या सोपीकरणाकडे असलेला कल अधिक तीव्र असतो. संस्कृत शब्द प्राकृतात असेच अपभ्रष्ट होत असावेत. अशाप्रकारे प्रसाददानाचे पसायदान झाले असावे.

तूर्तास एवढेच. चुभूद्याघ्या.

चित्तरंजन

भाष

unread,
Oct 25, 2006, 2:43:47 PM10/25/06
to manogat_...@googlegroups.com

चित्पावन

चित्पावन शब्दाची व्युत्पत्ती चिते पासून पावन अशी मी ऐकली होती.  त्याचे स्पष्टीकरण म्हणजे काही वाटसरू(प्रवासी) समुद्रावरून जहाजातून येताना वादळात सापडून कोकणाच्या किनाऱ्याला लागले.  तेथे त्यांना चितेच्या ऊष्णतेने जीवदान मिळाले असा प्रवाद होता.

साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी इलस्ट्रेटेड वीकली या साप्ताहिकात त्याबद्दल मोठा लेख आला होता.

हा अंक मुंबईच्या टाईम्सच्या कार्यालयात मिळू शकेल असे वाटते.

सर्किटमहाशयांकडे याची माहिती काढण्याची आणखी साधने असतील.

हा प्रतिसाद विषयाला सोडून आहे असे वाटल्यास क्षमस्व.

कलोअ,
सुभाष

अवधूत कुलकर्णी

unread,
Oct 25, 2006, 11:53:23 AM10/25/06
to manogat_...@googlegroups.com

धन्यवाद

आपल्या प्रतिसादातून नवीन माहिती मिळाली. मी अजून काही कारणांचा शोध घेत आहे. नेमकेपणाने समजल्यावर त्याविषयी लिहीनच.

अवधूत.

Maanav

unread,
Oct 27, 2006, 5:19:09 PM10/27/06
to manogat_...@googlegroups.com

एस्स

हिन्दित  s  उच्चार  इस अस करतात कारण सरळ आहे, अक्षराचा उच्चार आठवा.

हेल हे सर्व भाषातुन येतात. अमेरिकेत कित्येक असे भाषाभेध आहेत accents म्हणुन. दक्षीनेतिल राज्यात अगदी आनन्द आहे.    यु ओल उच्चार आहे  योल अगदी साग्रसन्गीत हेला सकट.

कोणती भाषा शुद्ध  आणि कोणती अपभ्रश्य हे सान्गणे कठीण.

maanav

नीता आंबेगावकर

unread,
Aug 26, 2009, 4:43:09 AM8/26/09
to manogat_...@googlegroups.com

अपभ्रंश

लेखी भाषा आणि बोली भाषा यात फरक असतो. त्यामुळे एखाद्या शब्दाचा उच्चार बदलत बदलत वेगळाच शब्द बनतो. त्याला अपभ्रंश म्हणतात. उदा. 'महाराष्ट्रा'त रहाणारे ते  'महाराष्ट्रीय' पण हा शब्द जरा बोलायला कठीण आहे. त्यामुळे त्याचे रुपांतर आधी 'मरहट्टी' असे झाले(आठवा शिवाजी महाराजांचा काळ. ) नंतर त्याचे 'मरट्टी' झाले आणि नंतर त्याचा सोपा उच्चार 'मराठी' असा झाला. आजही काही लोक 'अलार्म' याला 'अलाराम' असे सर्रास बोलतात. जर चुकीचे बोलले गेले आणि ते वेळीच सुधारले नाही गेले तर अपभ्रंश होतात.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages