लिंग कोण ठरवणार?

839 views
Skip to first unread message

संदिग्ध

unread,
Jun 20, 2007, 10:26:26 AM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

काही इंग्रजी शब्द मराठीत सर्रास वापरतांना कोणत्या शब्दास कोणते लिंग वापरावे हा एक वादाचा विषय आहे. पुणेकर ब्रेड ला "तो ब्रेड" म्हणतात, तर नागपूरकर "ती ब्रेड". ह्याउलट पुण्यात "ती पेन" असा प्रयोग रूढ आहे, तर नागपूरात "तो पेन". वास्तविकत: पेन ही वस्तू असल्याने "ते" पेन हाच प्रयोग सर्वात संयुक्तिक ठरायला हवा.

(मी बहुतकरून नागपूर आणि पुणे, ह्या दोनच ठिकाणी राहिले, त्यामुळे मला सोलापुरी, कोल्हापुरी, मुंबईकरी प्रयोग माहिती नाहीत.) परंतू जर असे काही इंग्रजी शब्द मराठीत रूढ झालेच आहेत, तर त्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. केवळ पुणेरी म्हणजे शुद्ध, असा नियम लागू नसावा.

मराठीत (आणि संस्कृतात) साधारण आकारा प्रमाणे लिंग ठरवले जात असावे, असा माझा अंदाज आहे. मोठ्या आकारास "तो/ते" आणि छोट्यास "ती" असे संबोधले जाते. उदा. तो रस्ता, ती गल्ली. तो समुद्र, ती नदी. (ह्यावरून आदिकाळापासून स्त्रीलिंगा विषयीचा biased attitude दिसून येतो, हा मुद्दा वेगळा.) शिवाय साधारणत: स्त्रीलिंगी शब्द आकारांत/इकारांत असतात, आणि पुल्लिंगी/नपुंसकलिंगी शब्द अकारांत, उकारांत. उदा. ते पत्र, तो कागद, ती शाई.

आज मात्र जर मराठीचा विस्तार करावयाचा असेल, तर काही परप्रांतीय शब्दांना मान्यता देण्यावाचून गत्यंतर नाही, हे आपण न ठरवता सुद्धा सिद्ध झालेलेच आहे. काही अपवाद वगळता प्रत्येकाच्या बोली भाषेत हे शब्द अनेकदा येत असतात. तेव्हा त्यांचे व्यवस्थीत मराठीकरण तरी व्हावे असा माझा मुद्दा आहे.

मला सुचलेले काही "वादग्रस्त" शब्द वर नमूद केलेलेच आहेत, त्या व्यतिरिक्त अजून काही:

  • संगणक "तो", परंतू कंप्यूटर "ते", असे का?
  • ईमेल "ती" की "ते"

सर्व मराठी भाषिकांमध्ये हया विषयावर चर्चा कधी ना कधी होतच असते. त्यामुळे कृपया आपल्याला अडलेले, नडलेले, खटकलेले, सगळे शब्द ह्या चर्चेत आणावेत. केवळ आपल्या प्रांताचा (नागपूरी, पुणेरी) असा विचार न करता, मराठी भाषेचा विचार इथे करायचा आहे, हे सांगणे न लगे.

मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी
मनोगत : आस्वाद विवाद संवाद

रोहिणी

unread,
Jun 20, 2007, 12:45:20 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

तो, ती, ते

ते पेन, तो ब्रेड, तो संगणक, ती ईमेल, तो ईमेल आयडी

आपली (अस्सल पुणेरी)रोहिणी

केशवसुमार

unread,
Jun 20, 2007, 1:43:06 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

मला खटकलेले

ढेकर आली का आला?
भडंग केली का केले?

केशवसुमार

रोहिणी

unread,
Jun 20, 2007, 1:58:46 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

आली/केले

ढेकर आली, भडंग केले.

सुवर्णमयी

unread,
Jun 20, 2007, 2:00:21 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

पेन,ब्रेड

ते पेन, तो कंप्यूटर, अनेक असतील तर ते कंप्यूटर, ढेकर - ती/ तो दोन्ही योग्य आहेत.
ब्रेड हा शब्द कोशानुसार स्त्रीलिंगी आहे. (मी तो ब्रेड म्हणते) पाव हा शब्द मात्र तो आणि ती असा दोन्ही योग्य आहे. (मी तो पाव असे म्हणते)

सुवर्णमयी

unread,
Jun 20, 2007, 2:01:20 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

सहमत

रोहिणीताईंशी सहमत

प्राजु

unread,
Jun 20, 2007, 8:18:07 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

तसेच..

ते लिंबू की तो लिंबू...? मी ते लिंबू म्हणते. आपण मॅगी खातो ते .. ते मॅगी की ती मॅगी (मी ते मॅगी म्हणते)? मॅगी हे स्त्रिलिंगी नाव आहे. आणि भाज्या वाढण्यासाठी वापरतो तो.. डाव की ती डाव? मी तो डाव म्हणते.. या विषयावरून माझ्यात नि नवऱ्यामध्ये वाद होतो. तो ती मॅगी म्हणतो आणि ती डाव म्हणतो....

- प्राजु.

केशवसुमार

unread,
Jun 21, 2007, 6:11:08 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

सांगलीला

महाविद्यालयात असताना काही जाहिरातीच्या पाट्या बघितल्याच आठवतंय.. गोरे बंधू यांची प्रसिद्ध भडंग ..
असो..भडंग ते असो किंवा ती.. कांदा कोथिंबीर आणि थोडेसे लिंबू घालून एकदम झकास लागते/तो..  

सन्जोप राव

unread,
Jun 20, 2007, 9:00:27 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

मी पण

अनुप्रिता

unread,
Jun 20, 2007, 10:06:21 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

ते ई-मेल

आम्ही तर बुवा ते इलेक्ट्रॉनिक टपाल या हिशोबाने ते मेल आणि त्यांचे अनेक वचन म्हणून त्या मेल्स असं म्हणतो. बाकी रोहिणी ताईंशी सहमत. (कधी कधी लाडात येऊन ते मेलं आलं असं सुद्धा म्हणतो :) )

छू

unread,
Jun 21, 2007, 4:19:16 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

बऱ्याच अंशी/प्रभाव

बऱ्याच अंशी रोहिणीताईंनी सांगितल्याप्रमाणे वापरत आहे.

मात्र तो पेन, तो/ती ईमेल असे वापरतो.

पेन हे शस्त्रापेक्षा जास्त बलवान असल्यामुळे आम्ही त्याला पुल्लिंगी संबोधन देतो.  

-(नवीन पुणेकर) योगेश

असो.

आम्हाला एक कोल्हापूरमधील गडहिंग्लजचे शिक्षक होते शाळेत असताना बरीच वर्षं. ते "खुर्ची घेतलास काय रे बसायला?" "चपाती आणलास काय रे डब्यात?" "डांबावरचा ट्यूबलाईट लावलास काय रे?" "घंटी झाला काय रे?" असे म्हणायचे. आणि तेच योग्य वाटायचे.

त्यामुळे लिंगवचनातील असे फरक जितके अस्सल पुणेकरांना जाणवतात/खटकतात तितके मला तरी जाणवत नाहीत. (लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते.)

पामोल

unread,
Jun 20, 2007, 10:12:09 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

शिकरण

तुम्ही ते शिकरण म्हणता की ती शिकरण? विदर्भात आम्ही ते शिकरण  म्हणतो.  पण पुण्यात लोक ती शिकरण म्हणतात. खरे काय म्हणायचे?

सन्जोप राव

unread,
Jun 20, 2007, 9:05:56 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

मॅगी

मॅगी हे एका स्त्रीचे नावही असल्याने ती मॅगी म्हणणे सोयीस्कर - बरोबर की चूक माहिती नाही!
पण 'मॅगी' असे इंग्रजीत का म्हणता तुम्ही? मी तर बुवा 'शिजवण्यास तयार स्वादयुक्त शेवया' थोडक्यात 'शितस्वाशे' म्हणतो. सुरुवातीला म्हणायला कठीण गेले, पण आता सवय झाली आहे!

द्वारकानाथ कलंत्री

unread,
Jun 21, 2007, 4:39:54 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

मेल आला.

जळगावाला असताना तेथील लोक रेल्वे मेल आला असे म्हणायची. आम्ही नाशिकचे लोक मेल आली असे म्हणायचो.

आता (संगणकीय) मेल पाठवला आणि आताच मेल आली असे म्हणत असतो बुवा...

सुनील

unread,
Jun 20, 2007, 9:33:38 PM6/20/07
to manogat_...@googlegroups.com

शितस्वाशे...

तुम्ही दुकानदारालाही "शितस्वाशे द्या" असेच सांगता की काय?

असो. हलकेच घ्या...

शुभामोडक

unread,
Jun 21, 2007, 5:54:44 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

अजून एक

ट्रॅफीक हा शब्द देखील मी वेगवेगळ्या लोकांकडून तो , ती आणि ते या प्रत्ययां सकट ऐकला आहे. मी ते ट्रॅफीक म्हणते. light या शब्दा बाबत सुद्धा असाच घोळ आहे. "वीज गेली" या अर्थी light गेले म्हणायचे की light गेली ???

माझी एक मैत्रिण light गेला म्हणते.

तसेच "तो ब्लाऊज" की "ते ब्लाऊज" ??? काही जण "मी ब्लाऊज शिवायला दिलं" असं म्हणतात.

मला असे वाटते की एकवचनी असल्यास "तो ब्लाऊज" आणि अनेकवचनी असल्यास "ते ब्लाऊज".

छू

unread,
Jun 21, 2007, 4:05:47 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

हा हा

 

भोचक

unread,
Jun 21, 2007, 7:39:05 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

ट्रक, दुकान


ती ट्रक की तो ट्रक? मी तो ट्रक म्हणतो म्हणजे आकारमाननिहाय त्याला तो म्हणणेच बरोबर वाटते, पण अनेक लोक व अगदी वर्तमानपत्रेही ती ट्रक म्हणतात. काही लोक दुकानाच्या बाबतीतही ती दुकान असे म्हणतात. ते दुकान योग्य वाटते. 

रोहिणी

unread,
Jun 21, 2007, 9:32:06 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

तो/ती/ते

तो/ते ट्रॅफीक, लाइट गेले, ते ब्लाऊज, ब्लाऊजला पूर्वीच्या बायका पोलकं म्हणायच्या. ते पोलकं/ते पोलके

सुजुश्रि

unread,
Jun 21, 2007, 9:52:59 AM6/21/07
to manogat_...@googlegroups.com

तो/ती/ते

ते ट्रॅफीक, तो ट्रॅफीक लाईट, लाईट गेली, तो ब्लाऊज, ते ब्लाऊज (अनेकवचन).  आम्ही मुंबईकर असे म्हणतो बुवा.

ग़ुरुजी

unread,
Jun 22, 2007, 2:53:13 AM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

तो, ती. तें.

मराठीतच एकाच अर्थाच्या दोन निरनिराळ्या शब्दाना आपण दोन निरनिराळे शब्द वापरतो. उदा. तें झाड, आणि तो वृक्ष.

ग़ुरुजी

स्वाती दिनेश

unread,
Jun 22, 2007, 3:41:29 AM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

मराठी-जर्मन

मराठीप्रमाणेच जर्मन मध्येही तो(der)  ती(die)  तें(das)  आहे.आणि काही मराठी व जर्मन शब्दांची लिंगे सारखीच आहेत. उदा.१) तो दिवस- der Tag 2) ती रात्र- die Nacht ३) ती बाटली- die Flashe ४) ती शाळा- die Schule
५)ते पुस्तक- das Buch ६)तो किनारा- der Strand...

काही शब्द मात्र लिंगे बदलतात.उदा.१) ती खुर्ची-der Stuhl २)तो दरवाजा/ते दार- die Tuer ३)ते टेबल/ते मेज- der Tisch ४)ती वही- das Heft..

हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!
हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!हा प्रतिसाद लिहिताना मला १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिणे आवश्यक होते,तरी क्षमस्व!

अनुपमानिनाद

unread,
Jun 22, 2007, 10:07:25 AM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

चालायचेच!

कोसागणिक भाषा बदलते म्हणतात. त्यामुळे 'तो' पेन 'ती' पेन असे चालायचेच! संवाद साधणे महत्त्वाचे.

शुभामोडक

unread,
Jun 22, 2007, 5:47:00 AM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

कल्पना आवडली

तुमची १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहिता येण्या साठी केलेली युक्ती आवडली.

संदिग्ध

unread,
Jul 11, 2007, 12:01:09 PM7/11/07
to manogat_...@googlegroups.com

धन्यवाद!

हा "वाद" रंगविल्याबद्दल धन्य"वाद"! अर्थात, संवाद साधणे महत्त्वाचे, पण तरीही, शब्दकोशाने ह्यावर काहीतरी उपाय काढावा, आणि भाषेतल्या इतर नियमांप्रमाणे "तो" सगळ्यांनी पाळावा असे वाटते. (उपाय हा शब्द पुल्लिंगी आहे ह्याबद्दल तरी दुमत नसावे!)

माझ्या अनेक मैत्रिणींच्या सुखी संसारात ह्या "लिंगभेदामुळे" कलह निर्माण झालेले आहेत, हे मी पाहते आहे. एकीने तर आपल्या मुलीला "तो" आणि "ती" ब्रेड चा वाद नको म्हणून "ते ब्रेड" शिकवलंय!  म्हणजे आपल्या पोरांची मराठी आपल्यापेक्षा खूप पुढे जाणार निश्चित!

जर्मन शब्दांशी केलेली तुलना आवडली. तिथेही "introduction, communication" असे अंती "tion" असणारे शब्द स्रीलिंगी असावे असा नवीन नियम केलेला आहे. अजून काही सम-लिंगी जर्मन शब्द: "फोन आला" = der Anruf, ती बशी = die Untertasse, ती क्रिया= die Aktion असो, meine Liebe" म्हटलं की खरंच "प्रिये!" म्हटल्यासारखं वाटतं की नाही! तसेच, जर्मन मधे जोडशब्द तयार करायची पद्धत आहे, ती ही मराठीत वापरायला हरकत नाही (उदा: शितस्वाशे!) गंमत बाजूला ठेवू, मात्र खरच "वेळापत्रक", "पादचारी मार्ग" असे अजून जोडशब्द करायला हवेत.

स्वाती दिनेश

unread,
Jun 22, 2007, 7:36:15 AM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

जुनी युक्ती

ही मनोगत वरील जुनी युक्ती आहे,:)
स्वाती

शुभामोडक

unread,
Jun 25, 2007, 9:06:58 AM6/25/07
to manogat_...@googlegroups.com

असे का???

मला तर माहीतच नव्हते. खरंच उपयोगी युक्ती आहे.

mate...@gmail.com

unread,
Feb 16, 2020, 7:57:46 AM2/16/20
to मनोगत - चर्चा
उचकी लागली आणि ढेकर आला. याला लॉजिक असे की उचकीचा आवाज नाजूक असतो आणि ढेकर छा आवाज पुरुषी असतो. म्हणून उचकी स्त्रीलिंगी आणि ढेकर पुल्लिंगी.
ती उचकी आणि तो ढेकर.

तो चिवडा आणि ती भडंग. चिवडा केला आणि भडंग केली.या मध्ये तृतीय पंथी काही नाही. चिवडा संपला भडंग संपली. या मध्ये भडंग संपलं असे होत नाही.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages