काही समजले नाही.
आपल्याला काय म्हणायचे आहे ते बहुधा, टंकलिखित करता आले आहे असे वाटत नाही.
ऍ हा उच्चार मराठी सोडून कुठल्याही भारतीय भाषेत नाही. त्यामुळे त्यांच्या लिपीत ह्या उच्चाराचे अक्षर नाही. फॉन्ट बनवणाऱ्या कुठल्या मराठी वा अन्य तज्ज्ञाने मराठीची गरज लक्षात घेऊन फॉन्ट बनवलेले नाहीत. त्यामुळे मनोगत सोडले तर कुठल्याही संकेतस्थळावर किंवा संगणकाच्या पडद्यावर ऍ हे अक्षर टंकता येत नसावे. प्रयत्न केलाच तर, एॅ उमटतो. तुम्ही म्हणता त्या रघू नामक फॉन्ट वापरून अि, अी, अु, अू, रृ किंवा नुक्तायुक्त च आणि झ ही मराठी अक्षरे उमटवायचा प्रयत्न करून पाहावा. फार काय, ऱ्या ह्या अक्षरातला चंद्रकोरीसारखा अर्धा 'र'ही अनेक फॉन्ट्सवर नसतो. त्याऐवजी '-'(डॅश) उमटतो.
मराठी आणि युनिकोड
आपण म्हणता ते बरोबर आहे. युनिकोड फॉंटस मध्ये अ च्या डोक्यावर अर्धचंद्र दिला तर ऍ असेच दिसते. याचे कारण युनिकोड परिपूर्ण फॉंट नाही. श्री लिपी सारखे काही फॉंट परिपूर्ण आहेत पण ते युनिकोड नसल्याने नेटवर वाचता येत नाहीत. वाचता न येण्यापेक्षा अपरिपूर्ण फॉंट का होईना, वाचता तर येतो आहे याच भावनेने सर्व लोक युनिकोड फॉंटस वापरतात.युटीअफ
युटीअफ म्हणजे काय?--अद्वैतुल्लाखानमंगल फ़ॉन्ट्स
विंडोज़ एक्स्पीबरोबर आलेले मंगल फ़ॉन्ट्स माझ्या संगणकावर आहेत. पण ते वापरताना ऱ्हस्व वेलांटी व्यंजनानंतर उमटते. व्यवस्थित असलेला दुसऱ्या पानावरचा मजकूर जर नोटपॅडवर चिकटवला तरीही त्या मजकुरातल्या ऱ्हस्व वेलांट्या अक्षरापुढेच येतात. त्यामुळे मी नोटपॅडवर मराठीत काहीही टंकू शकत नाही. मंगल सोडून अन्य टंक वापरून वर्डवर टंकन करता येते.
युनिकोड हे जागतिक भाषांच्या लिपींसाठीचे फ़ॉन्ट असल्याने ते परिपूर्ण नसावेत, हा मराठी संगणकतज्ज्ञांचा पराभव आहे.
पूर्वी मनोगतवर---
मनोगतवर पूर्वी अ या अक्षरावर अर्धचंद्र देता येत होता पण आता तसे होत नाही असे का ?खरयं...!
आपल्या प्रश्ना्शी मीदेखील सहमत आहे, लिहितांना आपण नेहमी ’अ’ वरती चंद्र टाकतो, पण मराठी युनिकोड मध्ये (मंगल फॉन्ट) काही उपलब्ध मराठी टंकलेखन सॉफ्टवेअर्सच्या मदतीने देखील ते शक्य नाही...संगणकावर टाइप करतेवेळी "ऍ" असेच टाइप करावे लागते...याचा विचार करावयास हवाच..अजूनही येतो.
मनोगताचेच अंगभूत टंक आणि लिहिण्याची 'मराठी' पद्धत ठेवली की शिफ्ट दाबून ठेवून 'ई' ची कळ वापरली असता ऍ उमटतो.'मनोगत'साठी
टंकण करताना कळफलक वापरावयाची पद्धत कांहीशी वेळखाऊ वाटते खरी. पण अक्षरावरील अर्धचंद्र देताना उचल-कळ दाबून 'e'कळ दाबल्यास किंवा 'o'कळ दाबल्यास डॅ तसेच डॉ सारखी अक्षरे टंकित करता येतात. पण हलंत (पायमोडी) अक्षर टंकित कसे करायचे, ते अजून मला समजलेले नाही. याबाबत कुणी मार्गदर्शन करेल कां?
अॅ, ऍ आणि युनिकोड
पायमोडी? -पायमोडके अक्षर
पायमोडक्या अक्षरासाठी व्यंजनाची कळ दाबल्यानंतर डॉट् एच् दाबा. या सूचना 'टंकलेखन साहाय्य' मध्ये दिलेल्या आहेत.
कळफलक पद्धत वेळखाऊ का वाटावी? समजले नाही.
मला दोन्ही सारखेच दिसत आहेत :(
इथे देवळेकरांनी दोन्ही पद्धतीने लिहून दाखवले आहे असे दिसते. दुर्दैवाने मला दोन्ही सारखेच दिसते आहे. कदाचित काही ब्राउझर सेटिंग चा प्रॉब्लेम असावा. चर्चा 'ए' वर अर्धचंद्र की 'अ' वर अशी आहे का? असल्यास दोन्हीपैकी व्याकरणदृष्ट्या कोणते बरोबर आहे?
इथे चर्चा चालूच आहे तर
एक सुचवू का? 'ऍ' हे अक्षर (किंवा
त्याचा स्वरासारखा वापर - उदा. -
'कॅ') असलेले मूळचे मराठी
शब्द (इंग्रजी शब्दांचे
उच्चार नव्हे) कुणी इथे एकत्र
करून सूची बनवण्यास मदत करेल
का? मला तर एकही आठवत नाही.
म्हणजे कळेल तरी की नक्की किती शब्द लिहिताना याची आवश्यकता आहे ते. कदाचित की सूची फार लहान असेल.
खूप खूप धन्यवाद
अतिशय चांगले समजावून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद. फाँटलॅब वापरून मी माझ्या टंकातच ऍच्या जागी अॅ टाकून हा प्रश्न अतिशय क्रूडपणे सोडवला आहे.हॅ हॅ हॅ हॅ
मला अनेक आठवतात. नुसतं खॅ खॅ खॅ काय करताहात? तिकडं मूल कॅकॅकॅ करून रडतंय, ऐकू येत नाही?चुकीची माहिती.
"""ऍ हे अक्षर ऱ्हस्व ए दाखवणारं असून दाक्षिणात्य भाषांतील मजकुराच्या लिप्यंतरात ते लागतं.
ही चुकीची माहिती युनिकोडला कुणी कळवली? बरोबर माहिती कळवणारी मराठी तज्ज्ञमंडळी नव्हती का? ऍ हे अक्षर भारतातील फक्त मराठी लिपीत आहे; इतर दाक्षिणात्य वा उत्तरेकडील लिप्यांत नाही. आणि ते अक्षर ऱ्हस्व ए दाखवत नाही तर atom मधल्याला ए चा इंग्रजी उच्चार दाखवते.
मात्र अजूनही ही सुधारणा टंकांनी करून घेतलेली नसल्याने.... कारण? मराठी भाषेसाठी असंख्य टंक आहेत, त्या सर्व टंकांत ऍ टंकता येतो, युनिकोडमध्येच का येत नाही? याचे मुख्य कारण असे आहे की मराठी तज्ज्ञ फक्त देवनागरी टंक करतात, मराठी नाही. त्यामुळे, मराठी श, ख, च, झ, ळ नैरृत्यमधला रृ युनिकोडमध्ये टंकता येत नाहीत. 'ळ' सुद्धा उमटतो तो एक मांडी वर उचलेला. ख्रिस्त(khrist) हा शब्द युनिकोडमध्ये लिहिता येत नाही. कारण 'ख'ला र जोडायला जागाच ठेवलेली नाही.
ऍ(अ वर चंद्रकोर) की ऎ(ए वर उलटी मात्रा)
मी दोन्ही टंकून दाखवले आहेत. हस्व एकारासाठी ऎ, कॅ , वगैरे उलट्या मात्रावाली अक्षरे आणि दीर्घ एकारासाठी ए, के, इत्यादी सुलट्या मात्रावाली. अैकारासाठी ऐ. आता वाचणाऱ्याला कसे दिसतात त्यानेच कळवावे. शिवाय ऍ(अ वर चंद्र), आणि एॅ(ए वर चन्द्र).
माफ करा. पाठवा म्हटल्यावर क(उलटी मात्रा) बदलून कॅ झाला.
चंद्रपूर का महाड? प्रश्न काय आहे?
चर्चाप्रस्तावातील मुद्यावर उत्तर मिळाल्यासारखे वाटत नाही. चर्चा ज्ञानवर्धक झाली असली तरीही वेगळ्या बाबींचे ज्ञान मिळाले असे वाटते.नैरृत्य
मनोगतावर नैरृत्यमधील रृ rRu ह्या कळक्रमाने विनासायास उमटवता येतो.एटम बम, बैंक आफ़ इंडिया
ऍ हे अक्षर भारतातील फक्त मराठी लिपीत आहे; इतर दाक्षिणात्य वा उत्तरेकडील लिप्यांत नाही.
मराठी भाषेसाठी असंख्य टंक आहेत
चर्चाप्रस्ताव?
चर्चाप्रस्तावातला मुद्दा नीट टंकन करून सांगता आलेला नसल्याने, अंदाजाने प्रतिसाद लिहिले जात आहेत. बहुतेक प्रतिसाद योग्य दिशेने आहेत. प्रस्ताव मांडणाऱ्याने चंद्रपूर की महाड हे नक्की स्पष्ट करावे, नाहीपेक्षा आलेले प्रतिसाद शिरसावंद्य समजावे.फक्त मनोगतावर..
माहीत आहे. फक्त मनोगतावरच नैरृत्य उमटवता येते, अन्य कुठल्याही संकेतस्थळावर नाही. हा शब्द निर्+ऋत या शब्दापासून बनला असल्याने ऋ वर रफार देण्याची वेळ फक्त हा शब्द लिहितानाच येते.
ऌ असलेला एकुलता एक शब्द क्ऌप्ती. पण तो शब्द मनोगतावरही नीट लिहिता येत नाही.(कॢ हा काही क्ऌ नाही.)
एवढा कीस कशाला पाडता?
मराठी साइटवर लिहायचे
म्हणजे वहिनी आलात का? मावशी
गेलात का? असे जिव्हाळ्याचे
संवाद किंवा नले हाइकचे
फोटो टाक. सुले पुलंचे जोक
टाक इतके सामाजिक लिहिता आले
की पुरे की
एवढी डोकेफोड क्शाला
करायची?
ह घ्या हं
(फक्त गाजराचा कीस आवडणारी)
शरू
सहमत
बरोबर. हिंदीत ऍ ऐवजी ए वापरतात, ऑ ऐवजी आ. उदा. एटम बम, बैंक आफ़ इंडिया. सुनील दत्त 'ब्लडी फ़ूल'ला 'ब्लेडी फ़ूल' म्हणायचे. ते आठवले. हिंदी कांदबऱ्यांत येणारे इंग्रजी शब्द वाचताना फार मजा यायची
समजू शकतो. विशेषतः 'एटम बम'मधील 'बम' या शब्दाला इंग्रजीत वेगळाच काही अर्थ आहे हे लक्षात घेता गंमत समजण्यासारखी आहे.
लिनक्स मध्ये कसे वापरणार ?
सुरेंद्र,
धन्यवाद, अधिक माहीती हवी आहे, ती पुढील प्रमाणे,
विंडोज प्रणाली मध्ये कॅरेक्टर मॅप कंट्रॉल पॅनेल मध्ये मिळेल का? मी नेहमी लिनक्स वापरतो (सेंटॉस ५.२) देवनागरीसाठी
SCIM इनपुट मेथड, या मध्ये आपण सांगितलेला झिरो विडथ जॉयनर कसा घालता येईल.
तसेच हे सर्व वर्क अराउंड झाले, मुळ प्रश्न कसा सोडवता येईल?
- संतोष
क्ऌप्ती लिहिण्यासाठी एक क्ऌप्ती करावी लागते!
क्ऌ उमटवणे मनोगतावर शक्य आहे पण त्यासाठी एक क्ऌप्ती करावी लागते.
१. क् लिहावा (k.h.j (के डॉट एच डॉट जे)). निष्पन्न = क्
२. त्यापुढे मोकळी जागा सोडावी. निष्पन्न = क्
३. त्या मोकळ्या जागेपुढे ऌ (L^i) लिहावा. निष्पन्न = क् ऌ
४. क् आणि ऌ मध्ये सोडलेली रिकामी जागा काढून टाकावी. निष्पन्न = क्ऌ
(लिप्यंतराच्या तर्कक्रमात ह्या शक्यतेचा विसर पडल्याने आणि नंतर आतापर्यंत ते लक्षात न आल्याने हे झालेले आहे. ते बदलावे लागेल. क्षमस्व.)
क्ऌ असे लिहायचे असेल तर कसे लिहावे ते वर लिहिलेले आहे. मात्र ऌ हा स्वर असल्याने तो क् ह्या व्यंजनाला जोडताना तो स्वराच्या चिन्हाचे रूप घेईल असे वाटते. जसे क् + ए = के तसे क् + ऌ = कॢ असे व्हायला हवे, असे वाटते.
हिंदीवाल्यांनी थोडेसे बदलायला हवे
हिंदीवाल्यांचा लिपीबदल न करण्याचा दुराग्रह अनाकलनीय आहे. विशेषतः बॅंक हा शब्द हिंदीत जसाच्या तसा घेण्यास काय हरकत आहे? ळ हे अक्षर हिंदीत घेण्यास काय हरकत आहे? त्यात प्रत्येकच ठिकाणी हिंदीत माहिती- निदान नाव तरी - देण्याचा हट्टही. अनेक फलकांवरची वाया जाणारी जागा आणि शाई दोन्हींची बचत होईल.च्च्च्च्
'पाडता' ऐवजी चुकून 'घेता' वाचलं...
(सर्व
प्रकारचे किस आवडणारा...
विशेषतः फ्रान्समधले... ) 
- चैत रे चैत.
(ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)
क्ऌ आणि क्ए
तुम्ही म्हणता तसला क्ऌ काढणे म्हणजे 'क्ए', 'क्उ' सारखे 'के' आणि 'कु' काढणे आहे. ऌ हा क च्या खालीच जोडला गेला पाहिजे, शेजारी नाही. आणि तसे उमटलेले ऌकारान्त अक्षर ओळखून वाचता आले पाहिजे. मनोगतावर तूर्ततरी ते शक्य नाही.'घेता घेता'
'घेता घेता' वाचलंत की काय चैतोबा ? आणि फ्रेंचचा बराच अभ्यास दिसतोय ! परीक्षेस रोज तोंड देता की काय?कॢ मोठ्या आकारमानात पाहा
हा हा नीट वाचा
'पाडता' ऐवजी चुकून 'घेता' वाचलं...
हा हा नीट वाचा चैतबुवा!
नीट वाचाल तर
वाचाल
डोळे उघडे ठेवून वाचणारी
शरू
ड, ड्ड आणि क, कॢ
ड ला खालच्या बाजूला ड जोडताना जसा वरचा ड लहान होतो, तसा क ला ऌ जोडताना क लहान व्हावा. म्हणजे कॢ ओळखता येईल.
च, छ, झ, ळ, र या अक्षरांना नुक्ता कसा देता येईल या माझ्या प्रश्नाचे उत्तर प्रशासकांकडून अजूनही अपेक्षित आहे. तसेच फ़ॅन्सी या शब्दातली चन्द्रकोर फ वर आणणे आधी जमवावे आणि मग कळवावे.
गुर्जी
अहो, ह घ्या म्हटल्यावर घेतलं पाहिजे की नाही?
आणि परीक्षेचं म्हणाल तर, रोज नाही तरी अगदीच तोंडावर आल्यावर तोंड द्यावंच लागतं की...
छे छे
काहीतरी भलतंच बिनसलंय...
आता 'वाचाल'च्या
ऐवजी 'चावाल' वाचलं!! 

(हे.ही.ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)
आता डॉट यू वापरता येईल.
अक्षरानंतर डॉट यू (.u) वापरून आता नुक्ता उमटवता येईल. मात्र नुक्ता देण्याचे संकल्पन नीट न केले गेल्याने सर्व आकारमानांत नुक्ता नीट दिसेलच असे नाही.अलीफ़्, आणि ऐन्
नुक्ते नुसते 'च़, छ़, झ़, ऱ, ऴ'लाच लागत नाहीत तर इतर अक्षरांना लागू शकतात. उदाहरणार्थ, फ़ार्सीत 'अ'साठी अलीफ़् आणि ऐन् ही दोन मुळाक्षरे आहेत. त्या दोन 'अं'चे उच्चारही भिन्न आहेत. त्यामुळे ऐन् असलेले शब्द लिहिताना नुक्तावाल्या 'अ़'ची गरज़ भासते. ऐन् असलेले शब्द: अ़क़्ल्, अ़ज़ब्, आदिलशाह, आशिक, इ़त्र, इ़नायत, ई़सवी वगैरे.
फ़ार्सीतल्या पाच 'ज़ं'पैकी जीम आणि ज़े ही अक्षरे मराठीत 'ज' आणि 'ज़' अशी लिहिता येतात. पण बाकीची जाल्, जोंय आणि ज्वाद् लिहिण्यासाठी मराठीत खुणा नाहीत. मग फ़ार्सीतले दोन त(ते आणि तोय्), व तीन स(से, सीन् आणि स्वाद्)यांच्याकरिता वेगळ्या खुणा कुठून असणार?
जर्मन लिपीतल्या डिश्, निश्ट् मधले 'श' आणि डाख़,लोख़ मधले 'ख़' लिहिण्यासाठीही नुक्ते हवेच. इतर जागतिक भाषांमधील भिन्नभिन्न उच्चार लिहिण्यासाठी आणखीही खुणा टंकता आल्या पाहिजेत.
खास विनंती: डॉट् यू वापरून मलातरी नुक्ते देता आले नाहीत. कुणाला जमले असल्यास लिहावे.
--अद्वैतुल्लाखान
कॅरॅक्टर मॅप
विंडोज प्रणाली मध्ये कॅरेक्टर मॅप कंट्रॉल पॅनेल मध्ये मिळेल का?
बहुतेक 'ऍक्सेसरीज़ -> सिस्टम टूल्ज़' मध्ये मिळावा असे वाटते...
हाहा...
माझा एक मित्र चुकून 'आयटम बम' म्हणाला होता ते आठवले...
खरी गोष्ट!
गोष्ट खरीच आहे. मराठीसाठी डोके कशाला फोडायचे? ते सर्व आपण इतर भाषांसाठी करू या.
युनिकोडच्या संकेतस्थळावर जाऊन मुद्दाम ०९७२ हे अक्षर काय आहे ते पाहिले. अक्षर ऍ च आहे. पण त्यातल्या अ मधली आडवी रेघ अ च्या कमरेला नाही तर पार्श्वभागाला जोडली आहे. वरची चंद्रकोर ही 'बरोबर' च्या(\/) खुणेसारखी पण कोनाऐवजी गोलाकार जोड आहे. डाव्या दांडीपेक्षा उजवी दांडी मोठी. थोडक्यात वाकडे तोंड केलेली चंद्रकोर. अक्षर अतिशय भेसूर दिसते. असली अक्षरे युनिकोडला कोण पुरवते?
मला...
...'बम फटना' हा वाक्प्रचार अभिप्रेत होता...
चुकीची सुधाराणा
चुकीची सुधाराणा,धन्यवाद 'शुद्ध मराठी'..
कळफलक पद्धत वेळखाऊ का
वाटावी? समजले नाही. - मी
आतापर्यंत लोकसत्ता फॉंट
फ्रीडम् वापरत होतो.
त्यात प्रत्येक अक्षरानंतर
a-क्ळ दाबावी लागत नाही.
त्यामुळे टंकण अधिक गतीने
करणे शक्य होते. 'ff' मध्ये अन्य
ठिकाणी टंकण करून ते इथे डकवता
येत नाही. या चौकटीबाहेर
पानाच्या शेवटी ते दिसू लागते.
नुकतेच, श्रीगणपती
अथर्वशीर्ष टंकित करताना हात
दुखू लागले! कदाचित संवयीचा
परिणाम असेल.
पायमोडे अक्षर टंकित
करणे जमले!
धन्यवाद
धन्यवाद चैत,खरंच की...
युनिकोडात अ वर चंद्र ऍ आणि ए वर चंद्र ऍ साठी २ वेगवेगळी अक्षरं आहेत. मग आपले टंक अशी वेगवेगळी अक्षरचिन्हे का पुरवत नाहीत? मराठीसाठी वेगळा टंक कोणाला माहीत आहे का?
जाताजाता -
शु. म., मला तरी युनिकोडाच्या
संकेतस्थळावरचा ऍ ठीक वाटला...
चंद्रही ठीक वाटतोय आणि आडवी
रेघही...
युनिकोडावरचा ऍ -

मनोगताचा ऍ -

असं करून बघा
इतर ठीकाणी टंकलेलं पहीले नोटपॅडात कॉपीपेस्टा.दोन्ही चित्रे
तुम्ही काढलेली ऍ ची दोन्ही चित्रे माझ्या संगंणकाच्या पडद्यावर उमटलेलीच नाहीत. आणि यांत मला काही आश्चर्य वाटत नाही. तुम्ही टाइप केलेला मजकूर किंवा डकवलेले चित्र मला मुळाबरहुकूम दिसेलच असे नाही. तुम्हा वापरत असलेला न्याहाळक आणि त्याची आवृत्ती माझ्यापेक्षा वेगळी असेल तरी कधीकधी दोघांच्या दिसण्यात फरक येतो. युनिकोडच्या संकेतस्थळावरचा ऍ मला कसा दिसतो? तर एक इंग्रजी 3 चा आकडा. त्याच्या मध्यभागातून नाही तर त्याच्या खालच्या अर्धगोलाच्या मध्यातून काढलेली एक आडवी रेघ. तिला जोडलेला स्वरदंड. आणि वर शिरोरेषेच्या वरच्या भागाला कोनाऐवजी गोलाकार केलेले एक बरोबरचे चिन्ह..
हिंदी हस्ताक्षरी अ असाच असतो. इंग्रजी तीनचा आकडा काढून त्याच्या शेवटाला गाठ मारायची, आणि गाठीतून बाहेर पडून हात न उचलता वरखाली जाऊन स्वरदंड काढायचा. 'क' कसा काढतात? आधी शिरोरेषा, तिला जोडून उभा स्वरदंड, आणि किंचित वर जाऊन स्वरदंडाच्या दोन्ही बाजूला दोन वर्तुळे. हा 'क', 'ळ'च्या मध्यातून वर जाणारी रेघ दिसावी तसा दिसतो. त्याला 'र' जोडून क्र करताच येत नाही. युनिकोडवरची सर्वच अक्षरे अशी हिन्दी वळणाची आणि भेसूर आहेत.
अकारपूर्तीसाठी ए.
शब्दाच्या मधल्या भागात जी कानामात्रा नसलेली व्यंजने येतात, ती मुळात पायमोडकी असल्याने ती पूर्ण करण्यासाठी त्या व्यंजनाची कळ दाबून नंतर 'a' दाबावा लागतो. पण हेच अकारान्त व्यंजन जर शब्दाच्या शेवटी आले तर 'ए' दाबायची गरज पडत नाही.
अर्थात हे मनोगतावरच. त्यामुळे तसे फारसे हात दुखत नाहीत. फाफॉ, उबंटू किंवा तिसराच एखादा न्याहाळक वापरून अन्य फ़ॉन्टमध्ये आधी लेखन करायचे आणि नंतर ते इथे डकवायचे या द्राविडी प्राणायामाची काही गरज़ नाही. आपण वापरतां त्या फ़ॉन्ट फ्रीडम्वर अकारान्त व्यंजनांसाठी 'ए' लागत नसेल, पण जोडाक्षरासाठी दोन व्यंजनांदरम्यान काहीतरी कळ दाबावी लागत असणारच. मनोगतावर त्या कळीची गरज पडत नाही. एकूण काय मेहनत सारखीच.
कृ आणि क्ऌ
मनोगतावर कृ कॉपीपेस्टायची गरज नाही. kRu ने कृ उमटतो.
असाच दुसरीकडून उचलून डकवून क्ऌ जमतो आहे का ते पाहा ना. ऌ 'क'च्या खाली आला पाहिजे आणि तो लृ (म्हणजे'ल'ला ऋकार दिल्यासारखा) दिसता कामा नये. थोडक्यात काय तर, ऌ ची उंची ल इतकीच हवी.
उबुंटू
"फाफॉ, उबंटू किंवा तिसराच एखादा न्याहाळक वापरून..."उबंटू
मला ऑपेरा लिहायचे होते, चुकून उबंटू लिहिले गेले. चूक दाखवून दिल्याबद्दल आभार.