विशिष्ट मराठी शब्द

5,352 views
Skip to first unread message

मनकवडा

unread,
Jun 22, 2007, 11:44:31 AM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

या विषयी पूर्वी चर्चा झालेली असल्यास क्षमस्व.

ज्या शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार वेलांटी ई.. येत नाही अशा शब्दांना काही विशिष्ट नाव आहे का? मला सुचणारे शब्द / नावे खालीलाप्रमाणे.  या यादीत भर घालणार का? विशेषता: चार किंवा जास्त अक्षरे असल्यास मजा येईल वाचायला

हडपसर
मदत
अहमदनगर
कळतनकळत
सदस्यत्व

मनकवडा
मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी
मनोगत : आस्वाद विवाद संवाद

सुवर्णमयी

unread,
Jun 22, 2007, 2:08:54 PM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

सरसकट

अशा शब्दांना काही नाव आहे की नाही ते माहिती नाही.
सरसकट, अघळपघळ, कटकट, मळमळ,सळसळ, तळमळ, दलदल, उघड, धडधड, भरभर,पटपट, नटखट, थडथड, बडबड,कडकड,फडफड,चटकन, टचकन, वसकन, धडक, बसकण,  उसण, दळण, वळण , वळचण
दरमजल,मजल,उचल
आणखी शब्द आठवत नाहीत...

वरदा

unread,
Jun 22, 2007, 4:27:21 PM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

हे घ्या आणखी शब्द

जवळ, बदल, अभय, शरद, सवत, गवत, मयत, रयत, गझल, गरळ, परळ, गडगडत, कमळ, ढगळ, मरगळ, तरल, सरल, पडझड, हळहळ, गहजब, चढण, गवळण, चळत, दडपण, कढ, कढण, कसर, वटकन, पखरण, बखर, पकड, सवड वगैरे..

दोन अक्षरी शब्द असंख्य मिळतील - कर, खर, दर, भर, कड, तड, पण वगैरे...

ह्यात उ, ऊ, इ, ई ने सुरू होणारे वा हे स्वर असलेले शब्द चालू नयेत, पण वर काही दिलेले आहेत (उदा. उसण वगैरे) म्हणून माझेही काही - उथळ, उसळ, नऊ, मऊ, ऊन, ऊस, उदय, उदर, उतरण, ऊर, चटई, अंमळ, उकड वगैरे...

काना, मात्र, उकार नसलेले पण जोडाक्षर चालत असल्यास (उदा. वर दिल्याप्रमाणे सदस्यत्व वगैरे) तर हे आणखी काही - अद्दल, बक्कळ, तद्दन वगैरे..

असो.

प्रियाली

unread,
Jun 23, 2007, 6:23:06 AM6/23/07
to manogat_...@googlegroups.com

सहमत

घ्या आणखी काही -

सहमत, असहमत, गडबड, खडखड, करमत, कसरत, वटवट, परखड, लटपट, हलकट, पसरट, मरगळ, खळखळ, कळकळ, तगमग, बसकण, मतलब, बळकट, मळकट

वचन, वतन, मरण, चमन (गोटा)  , सरळ, गरळ, सदर, सबळ, अमर, जवळ, वरण, चरण.

जर, तर, जय, सय, लय, वय, दोन अक्षरी क्रियापदे अनेक मिळतील.

सुवर्णमयी

unread,
Jun 22, 2007, 5:16:36 PM6/22/07
to manogat_...@googlegroups.com

ह्म्म

ह्यात उ, ऊ, इ, ई ने सुरू होणारे वा हे स्वर असलेले शब्द चालू नयेत,
- हो असे धरायचे तर मग काही शब्द चालणार नाहीत, क ख ग घ इत्यादींसमोर येणारे उकार आकार चालू नयेत असेच डोक्यात होते:)

ठणठणपाळ

unread,
Jun 25, 2007, 7:42:11 AM6/25/07
to manogat_...@googlegroups.com

आणख़ी भर

करमरकर,तळवलकर,हळदणकर,खळदकर

कमल,शरद,बबन,नमन

सरसकट,रमत गमत, चटक मटक,

sskora...@gmail.com

unread,
Oct 10, 2015, 4:09:32 AM10/10/15
to मनोगत - चर्चा
बदक मगर कमळ कमल कलम परकर

sskora...@gmail.com

unread,
Oct 10, 2015, 4:11:06 AM10/10/15
to मनोगत - चर्चा
खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका शब्दात आणि मराठीमध्ये असावीत .... पण त्या
शब्दान मध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू
नये.. अवधि - 1तास

उदाहरणार्थ :
मुलाचे नाव - शरद

१) गावाच नाव : अहमदनगर
२) मुलीचं नाव : कमल
३) आडनाव : करमरकर
४) धातू : जस्त , रजत
५) रंग : धवल
६) गोड पदार्थ : खरवस
७) वस्तू : उलथन . चटई
८) पूजा साहित्य : जल तबक
९) दागिना : नथ
१०) हत्यार : करवत
११) पक्षी : बदक
१२) प्राणी : तरस . हरण

Challenge...

udayvela...@gmail.com

unread,
Feb 2, 2019, 1:54:12 AM2/2/19
to मनोगत - चर्चा


On Friday, 22 June 2007 21:14:31 UTC+5:30, मनकवडा wrote:

या विषयी पूर्वी चर्चा झालेली असल्यास क्षमस्व.

ज्या शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार वेलांटी ई.. येत नाही अशा शब्दांना काही विशिष्ट नाव आहे का? मला सुचणारे शब्द / नावे खालीलाप्रमाणे.  या यादीत भर घालणार का? विशेषता: चार किंवा जास्त अक्षरे असल्यास मजा येईल वाचायला

हडपसर
मदत
अहमदनगर
कळतनकळत
सदस्यत्व

मनकवडा
talwalkar
 
Reply all
Reply to author
Forward
Message has been deleted
0 new messages