२)या उपक्रमाच्या माध्यमातुन : सुशिक्षित लोकांनी राजकीय प्रक्रियेत
सामील व्हावे, आपल्या दैनंदिन आयुष्यात सरकारी निर्णयांचे किती परिणाम
होतात ह्याची जाणीव व्हावी, आपल्या छोट्या मोठ्या अनुभवांचा इतरांना लाभ
व्हावा, तसेच सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणारा एक सामान्य नागरिकांचा
दबाव/अभ्यास गट निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे.
३) इथे चर्चेच्या माध्यमातुन एखाद्या विषयावर/ निर्णयावर तयार केलेले
मुद्दे (गटाच्या नावे) सरकारच्या संबंधीत खात्याशी (संबंधित मंत्री अथवा
त्या खात्याचे सचिव) पत्रव्यवहारा द्वारे कळवले जातील.
४) संबंधित खात्यावर चर्चा करताना केवळ एखाद्या निर्णयापुरते मर्यादित न
राहता, स्वतःच्या अनुभवातुन वा अनेकदा वृत्तपत्रांतुन आलेले लेख /
इंटरनेट ब्लॉग वर केले गेलेले लिखान संकलित करण्याचा प्रयत्न करावा.
संकलित माहितीचा पुढील टप्पा म्हणुन एखादा अभ्यासपुर्ण लेख संपादित करुन
सदर खात्याला पाठवला जाउ शकतो.
५) स्वप्न असे आहे कि, परकीय विषेश्तः प्रगत/विकसीत देशांमध्ये मंत्री वा
मोठा सनदी अधिकारी यांचे जीवनमान/राहणीमान जसे सर्वसामान्य नागरिका
प्रमाणेच असते, तसेच भारतात देखील मंत्री वा सनदी अधिकार्यांची व
सामान्य माणसाची दैनंदीन राहणीमन पातळी एकच असेल, अशी रचना/मानसिक स्थिती
निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. सांपत्तीक व अधिकार वेगळे असले तरी,
'सरकार आपले आहे' अशी भावना जागृत करणे गरजेचे आहे.
६) भारतीय संसदीय राजकारणामध्ये प्रतिमंत्रिमंडळ या संकल्पनेचा उदय
व्हावा ह्यासाठी हे एक पहिले पाउल ठरावे ही अपेक्षा!