♥कळत नकळत♥

3 views
Skip to first unread message

mibokya

unread,
Jul 4, 2014, 3:48:02 AM7/4/14
to maharash...@googlegroups.com
♥कळत नकळत♥

असावीस तू अशीच नेहमी 

हसत खेळत माझ्याशी 
बरे वाटते जीवाला तेंव्हा 
स्पर्श होतो ग स्वर्गाशी
दिस सारा क्षणात सरतो
कळत नाही कधी
मावळतीला सूर्य ढळतो
तुझ्या सहवासात हरवून जातो
विसरून ग स्वत:लाच
तू दिलेली एक हाक 
दिवसभर कानात गुंजत असते
दूर राहतो जेंव्हा तुझ्यावाचून
आठवण तुझीच येत असते 
का तुला अस वाटत ग 
विसरलो तुला मी गर्दीत
दर्दीत तर जीव होरपळलाय
प्रश्नांचा हलकल्लोळ तर मनात दाटलाय
विखुरल्यात दाही दिशा 
कळत नकळत
वेडा जीव तडफडतोय 
मनातच जळत जळत 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages