तीच बोलली होती
कि भेटा एकदा मला…।
मनातलं खूप सार
सांगायचंय तुम्हाला….।
मी पक्षाचा प्रचारक
मला कुठला वेळ
म्हटलं जावू भेटायला
जरा काढू तिची कळ
मी खूप उत्सुकतेने
गेलो राव तिला भेटायला….
डोळे गरगर फिरवत
शेजारणीबद्दल लागली सांगायला…।
ऐकून तिची कर्म कहाणी
सर्व गेले फुकट…।
कशासाठी आलो तेच कळेना
पाहून स्वभाव तिचा तापट…।
म्हटलं आलीस तर आलीस
आता मोदींना मत दे
शेजारीण होती दुसर्या पक्षाची
योग्य वेळ आहे आता तिचा बदला घे…।
ती लागली बोलायला
जळल मेल राजकारण…।
राज वरून लक्षात आलं तिच्या
पवार साहेबांच धोरण…।
मत वैगरे काही नाही
सारा पैश्यांचा खेळ म्हणाली…।
काल जन्माला आलेली कार्टी
झेंडे घेवून नाचतात म्हणाली…।
असतात सारे बोलबच्चन
धमक्या आणि मुत्र सिंचन…।
सगळ्यात मस्त ठोकशाही
फालतू वेळ नाही म्हणाली…।
(जाता जाता तिने)
साहेबांचे आभार मानले
धोरणापुढे लोटांगण म्हणाली…।
मोदींना मात्र शुभेच्छा दिल्या
पंतप्रधान व्हा म्हणाली…. …।