"मी पंतप्रधान झालो तर … "

2,078 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Mar 7, 2013, 12:44:55 AM3/7/13
to MadRacer Group, Kiran Madracer
"मी पंतप्रधान झालो तर … " देवा खरच एक दिवस का होईना पण दे रे सत्ता हाती.
वैतागालोय रे खूप आता. काही चांगली बातमी कळेल म्हणून रोज न चुकता बातम्या पाहतो, मराठी हिंदी अन अगदी इंग्रजी सुद्द्धा… पण रोज.. हो रोजंच कोणानाकोणा घोटाळ्याची बातमी. मला तर वर्षात दिवस कमी अन घोटाळेच जास्त दिसताहेत. हसू नकोस खर आहे हे.
लहानपणी आजी ना म्हणी सांगायची, "कुंपण शेत खातंय" तुझ्या हि आजीने सांगितली असेल हि म्हण तुला. आज परिस्थिती याच्याही पुढे गेलीय, "शेत खाउन पुढारी मस्त ढेकर देऊन बसलेत वर कुंपणाच्या कॉट्रक्टचे पैसे पुढार्यांच्या निकटवर्तीयांना ५-१० वेळेस मिळालेही पण कुंपण अजून दिसत नाही अन दिसणारही नाही. "
चोर अन पोलिस फरकच काही दिसत नाही, रक्षकच भक्षक झालेत. दिवसा ढवळ्या मुलींची इज्जत लुटली जाते. जाती पातीच्या राजकारणात सर्वांचा भुगा पाडला जातोय. जीव ओवाळून टाकायला तयार असे "कार्यकर्ते" आहेत पण जीव कोणासाठी ओवाळून टाकावा हि "अक्कल" त्यांना नाही. पूर्वी चौकातल्या पारावर व्हायची ती चर्चा आता फेसबुक च्या भिंतीवर होते. तरुण वर्ग तरी काय करणार. रोज एखाद्या 
घोटाळयाच्या पोस्ट वर टिपण्णी देऊन शिव्यादेत शांत बसणार. कारण सर्वांनाच माहित आहे कि काही फरक पडणार नाही.
आज तर हद्दच झाली. पंतप्रधान म्हणाले "जो गरजते हे, वो बरजते नही ॥" हसावं की रडावं तेच कळत नव्हत. ९ वर्ष गप्प होते काय दिवे लावले कुणास ठाऊक. हो पण या दिव्याखाली अंधार म्हणून बाकीच्या मंत्रांनी पोटभर घोटाळे करून घेतले हे मात्र खर.     
देव मला खरच इतिहासात रमून नाही बसायचं, पुढच्या पिढीसाठी इतिहास घडवायचाय. माझ्याकडे जादूची  छडी नाही कि जेणे मी एका दिवसात सगळ ठीक करेल पण "नायक" बनून एका दिवसात अपराध्यांचा/घोटाळेखोरांचा कर्दनकाळ नक्कीच बनेल. अन खर सांगू का देवां मी या जगातील चांगल्या लोकांना बोलत करेल कारण..कारण वाईट लोक हे प्रोब्लेम नव्हतेच कधी. कारण वाईट हि एक प्रवृत्ती आहे अन ती राहणारच. प्रोब्लेम आहे तो चांगल्या लोकांचा अबोला. अन जेव्हा ते हा सोडतील तेव्हा परत कोणास तुला अशी विनंती करायची गरज पडणार नाही.  
बघ बाबा, मी तुला माझा पूर्ण कार्यक्रम सांगितला. आता कर माझी इच्छा पूर्ण..  अन हो कार्यक्रम पत्रिका दाखवून आश्वासन विसरायला मी कोणी राजकीय पुढारी नाही हं ...

--


B. Regards,
Kiran Jagtap
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं... 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages