जनसामान्याची ताकद : आम आदमी चे यश

20 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Dec 8, 2013, 9:01:12 AM12/8/13
to MadRacer Group, Kiran Madracer
आम आदम, आता आम राहिला नाही. त्याने त्याची ताकद दाखवून दिली. 
कालपर्यंत राजकारण पासून दूर जाणारा युवक, नागरिक आता राजकारणात सक्रिय होऊ लागला आहे. अन त्यांनी दाखवून दिले कि राजकारण म्हणजे पैसा, दारू अन गुंडगिरी नव्हे. निवडणुका मुद्यांवर जिंकता येतात अन ते हि तत्वांची तडजोड न करता, सत्याच्या अन सभ्यतेच्या मार्गावर.  धन्यवाद #‎आमआदमीपार्टी‬
खरंच विचार करण्यासारखा आहे हा निकालकालपर्यंत ज्यास कोणी ओळखत नेव्हते तो सामान्य माणूस १०-२० वर्षे निवडून येणाऱ्या आमदारास हरवतो. यातच त्यांची ताकद समजून येते. कोण आहेत आम आदमी पार्टीचे उमेदवार, कार्यकर्ते … भले मोठे राजकारणी प्रस्थ कि गुंड, कुणाचा हात आहे त्यांच्यावर ? यापैकी काहीच नाही. सर्वच नवे चेहरे. आपल्या सर्वांसारखे सुशिक्षित, आपापले काम सोडून काहीतरी बदल घडवायच्या विचारांनी एकत्र आलेली हि जनसामान्य जनता. 
आम आदमी चा विजय हा जनतेचा विजय आहे.
संपूर्ण भारतभर मोदींची लहर असताना इतके मोठे मताधिक्य घेणे म्हणजे खुप मोठी मजल आहे. 

अजूनही वाटते कि आम आदमी ची सत्ता बनायला हवी, वेड्या मनाची वेशी आशा म्हणा हवे तर. 
राजकारण बदलायला लागलेय. सर्वांना हवाय विकास, भ्रष्टाचारमुक्त अन पारदर्शक सुशासन.  ।। स्वराज्य  ।। 


-- B. Regards,

Kiran Jagtap 
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं...
http://kkiranjagtap.blogspot.com

Reply all
Reply to author
Forward
0 new messages