बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

13 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Feb 24, 2015, 2:35:31 PM2/24/15
to MadRacer Group

"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" . 

जेव्हा ह्यांना वाटेल तेव्हा जमिनी देऊन टाकायच्या, अन्याय विरुध्द कायद्याचा आधार घेऊ शकत नाही हाच त्यांचा नवीन कायदा. पोटाच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या, आत्महत्येचा कितीदा विचार आला तरी माती अन पावसावर विश्वास ठेऊन बसलेल्या शेतकऱ्याला आता 

आत्महत्येस सरकारच प्रवृत्त करते आहे.

बहुमाताचा माज चढलाय त्यांना. आज तर वव्यंकय्या नायडू म्हणे कि "बहुमाताला अल्पमत डावलू शकत नाही", आम्ही तुम्हाला चिरडून टाकू ?? 

अहो बहुमत कोणामुळे मिळाले? जनतेमुळेच ना? मग त्यांच्यावरच का तंगड्या वर करताय? 

बहुमतचा आदर करा; अभिमान बाळगा, अहंकार नाही. 


"Businessmen कां साथ, Businessmen कां विकास" !! ?? "Businessmen का काम बनता, भाड मे जाये जनता".  होय, हे आहे भाजपाचे नवे स्लोगन्स. 

मोदीजी, तुमच्या कडून तर अशी अपेक्षा नव्हती. अन त्यावर तुम्ही अजूनही विधेयकाचे समर्थन करताय? तुमच्या पेक्षा काँग्रेस बरी होती हि म्हणण्याची वेळ आणू नका. 

आई भवानी तुम्हाला सुबुद्धी देवो 

 

-किरण जगताप  

एक जनसामान्य नागरिक


Reply all
Reply to author
Forward
0 new messages