गांधीजींना राष्ट्रपिता दर्जा कोणी दिला?

22 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Apr 3, 2012, 9:57:27 AM4/3/12
to MadRacer Group, kkiran jagtap
महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता हा दर्जा कोणी दिला ?, असा प्रश्न एका दहा वर्षांच्या मुलीच्या मनात आला आणि या प्रश्नाने अगदी दिल्लीपर्यंत गडबड माजवली. या मुलीने माहितीच्या अधिकारांतर्गत थेट पंतप्रधानांच्या ऑफिसकडे विचारणा केली आणि तमाम केंदीय संस्था या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात गर्क होऊन गेल्या. सरतेशेवटी उत्तर असे निघाले की, गांधीजींना राष्ट्रपिता हा दर्जा कोणी, कधी, कसा दिला या बाबत सरकारकडे कसलीच माहिती नाही!

ऐश्वर्या पराशर असे या चिकित्सक मुलीचे नाव आहे. ती सहावीत शिकते. फेब्रुवारी महिन्यात तिने पंतप्रधान ऑफिसकडे माहितीच्या अधिकारांतर्गत आपला प्रश्न पाठवून दिला. महात्माजींना राष्ट्रपिता हा दर्जा दिल्याच्या आदेशाची झेरॉक्स प्रत मिळावी, अशी मागणी तिने या अर्जात केली होती.

पंतप्रधान ऑफिसने हा अर्ज गृह मंत्रालयाकडे पाठविला. हा विषय आपल्या अखत्यारित येत नाही, असे सांगून गृह मंत्रालयाने हा अर्ज पाठवला नॅशनल अर्काईव्ह ऑफ इंडियाकडे (एनएआय). एनएआयच्या सहसंचालक जयप्रभा रविचंदन यांनी ऐश्वर्याला पाठवलेल्या पत्रातून सरकारी यंत्रणांची या प्रश्नामुळे उडालेली त्रेधातिरपीट स्पष्ट झाली आहे.

' आमच्याकडील सार्वजिनक कागदपत्रांमधील नोंदी तपासल्यानंतर असे लक्षात आले, की आपण पाठवलेल्या प्रश्नासंदर्भात कोणतेही विशिष्ट कागदपत्र उपलब्ध नाही. आमच्याकडे गांधीजींबाबतच्या कागदपत्रांचा प्रचंड संग्रह आहे. भारत सरकारच्या पसोर्नेल आणि ट्रेनिंग खात्याच्या मागदर्शक तत्त्वांनुसार आमचे काम केवळ कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे आहे. कोणतेही संशोधन हाती घेणे आमच्या अखत्यारित नाही. तेव्हा आपण येथे यावे आणि संशोधन करावे. आपले स्वागतच आहे!' अशा स्वरुपाचे लेखी उत्तर एनएआयच्यावतीने पाठवण्यात आले आहे

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12520168.cms


Reply all
Reply to author
Forward
0 new messages