महाराष्ट्राचा बिहार होतोय…...

26 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Aug 25, 2013, 7:12:17 AM8/25/13
to MadRacer Group, Kiran Madracer

महाराष्ट्राचा बिहार होतोय…...


नाही हो, तो बाहेरून आलेल्या माणसांमुळे किवा त्यांच्या लोंढ्यांमुळे नव्हे तर सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे, समाजातील कायदा अन सुव्यवस्थेवरील उठलेल्या विश्वासामुळे … 
कुणीही उठाव अन काहीही करावं. न कुणाला कशाची भीती न कशाची चाड.

नाही म्हणायला गल्ली बोळात २-४ गुन्हेगार एक मेकांवर गोळ्या घालयचे. ते समजू शकतो पण आता, आता तर हद्दच झाली. 
नारळीकरांसारख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला भूशावःह माणसाला मारण्यापर्यंत त्यांची मजल जावी. अन त्याहून हि मोठे, कुठे मारले हो? तर पोलिस चौकीपासून अवघ्या ५० मीटर च्या अंतरावर.  हद्द म्हणजे त्या मारेकर्यांचा पोलिसांवरील विश्वास पहा, कि त्यांनी त्यांची गाडी पोलिस चौकीच्या समोर लावलेली. किती हा विश्वास. जनतेचा नव्हे तर गुन्हेगारांचा विश्वास संपादन केला या सरकारने, हीच काय ती यांची मागील ९-१० वर्षाच्या कामाची पोच पावती. 
असणारच हो, कारण गुन्हेगारांना लाजवतील असे पराक्रम गाजवलेले मोठे-मोठे राजकारणी सरकार मध्ये आहेत सध्या. 
या एका धक्क्यातून सावरतो न सावरतो तेच मुंबई  गँगरेपची बातमी येउन धडकली.
देशाची राजधानी नसली तरी मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे "असे आज पर्यंत लोकांना अभिमानाने सांगणारी आमची मान शरमेने खाली झाली.
मुलींना किंवा त्यांच्या पेहरावाला तुम्ही दोष देऊच शकत नाही, पण तरीही लालू सारखे काही राजकारणी मुलींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून मोकळे झाले.  

घटना घडल्या पण त्यामागच्या कारणाचा विचार हा झालाच पाहिजे. 
या दोन्ही घटना तशा पहिल्या तर खूप वेग वेगळ्या, पण त्यामागचे कारण एकच. "शासन, कायदा अन सुव्यवस्था यावरील उडालेला विश्वास

अहो लहानपणी शाळेत शिक्षक/मुख्याध्यापक जर कठोर असेल तर कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आपण त्याचे काय परिणाम होतील याचा ५० वेळा विचार करायचो, अन चुकीची गोष्ट करण्याचा विचारही मनाला शिवत नसे. का? का तर त्याचे परिणाम, त्याची शिक्षा याबद्दल असलेली भीती
भीती एकदम बरोबर शब्द, ती भीतीच आज राहिली नाही लोकांच्या मनात.
आपण काहीही केले तरी कोणी आपले काहीही वाकडे करू शकत नाही. हा त्यांचा विश्वास. 
जो विश्वास जनसामान्यांना मिळायला हवा होता तो गुन्हेगारांना मिळत आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे नं.

ते अघोरी कृत्य करणार्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. पण 
एके काळी मुंबई पोलिस, महाराष्ट पोलिस यांची गणती आशियातील उत्तम पोलिसांमध्ये केल्याचे लेखीवात आहे. पण आज… कोण विचारतो त्यांना?
मागे आझाद मैदानात पोलिसांनाच लोकांनी काठ्याने बडवलं. महिला पोलिसांशी गैरवर्तन केल. पण तरीही सरकार त्या पोलिसांच्या मागे नाही उभ राहील. का तर मतांच्या राजकारणासाठी. हद्द म्हणजे एका महिला पोलिसाने त्या कृत्याचा निषेध म्हणून एक कविता पोलिसांच्या मासिकात प्रकाशित केली तर तिच्यावरच कारवाई. तिला माफी मागावयास लावली. 
राजकारण्यांनो एक सांगा, तुमच्या आया-बहिणींशी असं कोणी वागलं तर?
ज्या राज्यात पोलीस सुरक्षित नाहीत तिथे बाकीच्यांनी सुरक्षेची आशा बाळगणे हेच मूर्खपणाची गोष्ट आहे.  

पुरोगामी, पुरोगामी म्हणता म्हणता महाराष्ट्राचा पुरता सत्यानाश केला यांनी.
कदाचित पुरोगामी हि फक्त आता एक संज्ञाच राहून गेलीय. महाराष्ट्राच गतवैभव. 

लहानपणी आजी सांगायची, दुसर्याच्या परिस्थितीची, व्यंगाची चेष्टा करू नये. परिस्थिती कधी कुणावर कशी वेळ आणेल सांगता येत नाही. अन पहा आज नेमकं तेच झाल.
बिहारला नाव ठेवता ठेवता या राजकारण्यांनी आपल्या महाराष्ट्राचा बिहार कधी केला तेच कळालं नाही.

प्रश्न असतो तिथे उत्तर हे असतंच. अन इथेतर ते साफ दिसतंय - पोलिसांना पूर्ण मोकळीक.
पण दिसत नाही तो ते उत्तर प्रत्यक्षात उतावायाची सरकारची मानसिकता.   
आबा आम्हावर कृपा करा, जरा मनावर घ्या. नाही तुम्हाला काही पराक्रम नाही करायचा फक्त पोलिसांना मोकळीक द्या, स्वातंत्र्य दया. ते आपली जवाबदारी पार पाडतील. 

Kiran Jagtap
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं... 

kKiran Jagtap

unread,
Aug 26, 2013, 1:56:48 AM8/26/13
to MadRacer Group, Kiran Madracer

महाराष्ट्राचा बिहार होतोय…


नाही हो, तो बाहेरून आलेल्या माणसांमुळे किवा त्यांच्या लोंढ्यांमुळे नव्हे तर सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे, समाजातील कायदा अन सुव्यवस्थेवरील उठलेल्या विश्वासामुळे … 

कुणीही उठाव अन काहीही करावं. न कुणाला कशाची भीती न कशाची चाड.


नाही म्हणायला गल्ली बोळात २-४ गुन्हेगार एक मेकांवर गोळ्या घालयचे. ते समजू शकतो पण आता, आता तर हद्दच झाली. 

दाभोळकरांसारख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला भूशावःह माणसाला मारण्यापर्यंत त्यांची मजल जावी. अन त्याहून हि मोठे, कुठे मारले हो? तर पोलिस चौकीपासून अवघ्या ५० मीटर च्या अंतरावर.  हद्द म्हणजे त्या मारेकर्यांचा पोलिसांवरील विश्वास पहा, कि त्यांनी त्यांची गाडी पोलिस चौकीच्या समोर लावलेली. किती हा विश्वास. जनतेचा नव्हे तर गुन्हेगारांचा विश्वास संपादन केला या सरकारने, हीच काय ती यांची मागील ९-१० वर्षाच्या कामाची पोच पावती. 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages