आज मला देवाशी भांडायचंय...

35 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Nov 17, 2012, 8:07:53 AM11/17/12
to MadRacer Group
आज मला देवाशी भांडायचंय...खरच भांडायचंय  अन जगदंबेला विचारायचं " खुश तो बहोत होगे तुम ?" कारण  तमाम भारतीयांच्या हृदयाचे सम्राट बाळासाहेब आता तुझाजवळ असतील ना. ते वादळ आता तुझ्या सानिध्यात असेल ना. तरुणांची  भाषा जाणणारा व्यक्ती तुझ्या दरबारी बसेल ना. प्रवाह विरुध्द उभा राहून अन्यायाविरुद्ध सर्वांना एकजूट उभे करणार अस हे व्यक्तिमत्व आता तुझ्याकडे असेल ना. ज्यांच्या एका आदेशावर लाखो शिवसैनिक जीव ओवाळून टाकायचे असा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा बुलंद आवाज आता तूच फक्त ऐकशील ना.

काय मिळवलास तू आम्हा सर्वांना पोरक करून?
"जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला " बदलून टाक हे ब्रीदवाक्य.  
तुझ काय आहे गं, तुझ्या दरबारी सर्व काही कुशल मंगलच असणार. शेवटी किती झाल तरी देवच ना तू. पण आम्हा पामरांच्या दिनियेत कुशल मंगल अस काहीच नाही ग. इथे बदल हे घडवून आणावे लागतात. माणसांच्या दुनियेतील देवमाणसाला का घेऊन गेलीस? 
मान्य आहे, तुलाही रहावलं नसेल. पण अशी माणसे शतकांतून एकदाच घडतात.  शिवाजी महाराज, संभाजीराजांना प्रत्यक्ष पाहण्या इतके आम्ही भाग्यवान नाहीत, पण त्यांचा जाज्वल्य अभिमान आमच्या मनात कोरणारे ते बाळासाहेबच. 
पूर्ण महाराष्ट्र आता सुतकात बुडालाय. अन इथेही तुझीच प्रतिष्टा पणाला लागली, कि जगदंबेला लाखो लोकांनी साकडे घालूनही तिने आम्हाला आमच दान नाही दिल.
तू जिंकून सुध्दा हरली आहेत. 

तू भलेही खुश असशील त्यांची प्राणज्योत घेऊन,पण चुकतेस जगदंबे चुकतेस. 
बाळासाहेब एक व्यक्ती नसून एक विचारसरणी आहे. विचारांच एक वादळ आहे, अन आजही लाखो भारतीयांच्या मनात जिवंत आहे. अन त्यावर ते असाच अधिराज्य गाजवत राहील.


आम्ही सर्व तुझ्यावर नाराज आहोत. महाराष्ट्र पोरका झाला. एका वादळाचा शेवट झाला.  आमचा विठोबा गेला ग. आमचा विठोबा ....
 
बघ बाळासाहेबांना विचारून कि  "कुठे चालालोत आपण?" 
ते म्हणतील 
" मानाचा मुजरा करायला 
जगदंबेच्या दारी 
अन 
राजांच्या दरबारी.......
जय महाराष्ट्र !!!         "

--


B. Regards,
Kiran Jagtap
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं... 


Reply all
Reply to author
Forward
0 new messages