सचिन ने आपल्याला काय शिकवलं?

22 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Nov 14, 2013, 4:06:10 PM11/14/13
to MadRacer Group, Kiran Madracer

सचिन ने आपल्याला काय शिकवलं? क्रिकेट…साहजिकच आहे.
पण फक्त क्रिकेट? तर नाही, सचिन ने आपल्याला जगायचं कसं ते शिकवलं. मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं . ते करतना मध्येच कुठे ठेच लागली, कुठे पडलो तर निराश न होता पुन्हा चालायला शिकवलं. स्वप्न सत्यात उतरताना त्यांचं कौतुक करणं शिकवलं. यशाची शिखर गाठूनही पाय जमिनीत रोऊन उभ राहायला शिकवलं. 
प्रतिस्पर्ध्याचा मान राखणे शिकवलं,खिलाडू वृत्तीने लढण शिकवलं.
विविध जाती धर्माच्या लोकांना भांडण विसरायला शिकवलं. भारतीय म्हणून ताठ मानेने चालायला शिकवलं. सचीह्न ने आपणास एकत्र यायला शिकवलं. 
कोणीही न हलवू शकणारा  ध्रुवतारा झाल्यावरही, कुणासही कमी न लेखात प्रत्येक लहान थोरासाठी प्रेम अन जिव्हाळा बाळगणं शिकवलं.
आपल क्षेत्र कोणताही असो त्यातील सर्व गोष्टीत पारंगत होऊन त्यावर अधिराज्य गाजवायला शिकवलं. खरंच सचिन ने आपणास जगणं शिकवलं. 
"देवपण मिळवूनही  माणुसकी न विसरलेला असामान्य माणूस, सचिन रमेश तेंडुलकर. "
धन्यवाद सचिन.


मला सचिन व्हायचंय… माझ्या क्षेत्रातील.….


-B. Regards,

Kiran Jagtap 
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं...
http://kkiranjagtap.blogspot.com

Reply all
Reply to author
Forward
0 new messages