तुम्हाला माहितेय काय चुकल श्रीशांतचं? तो राजकारणी व्ह्यायच विसरला, हेच चुकल त्याचं .

24 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
May 21, 2013, 7:16:21 PM5/21/13
to MadRacer Group, Kiran Madracer
तुम्हाला माहितेय काय चुकल श्रीशांतचं?  तो राजकारणी व्ह्यायच विसरला, हेच चुकल त्याचं . 

स्पॉट फिक्सिंग. ६० लाखाच्या घोटाळ्याचा १२ तासात निकाल. 
१. सामना संपताच १२ तासात श्रीशांतला पोलिसांनी अटक केले.कोणी ऐकलं तर म्हणतील किती चपळ अन तत्पर आहेत दिल्ली पोलिस. द्रुष्ट काढा या पोलिसांची.
२. C. B. I. चे अधिकारी रुबाब खात रोज वाहिनीवर नवीन नवीन खुलासे करतात.  
३. संसदेत चर्चा. IPL घोटाळयाच केंद्र बनलेय, जुगाराचा अड्डा बनलाय त्याला बंद करा. 
४. ८ दिवस झाले असतील बहुदा, पण तेव्हा पासून प्रत्येक वाहिनीवर याचीच महाचर्चा किवा २४ तास याबद्दल बातम्या.  
५. सर्वांतर्फे श्रीशांत ला आजीवन बंदी घालण्याची एकमुखाने मागणी.  

तुम्हाला माहितेय काय चुकल श्रीशांतचं?  तो राजकारणी व्ह्यायच विसरला, हेच चुकल त्याचं . खरच वेडाचं  आहे ना तो. बिचारा मूळ मुद्दाच विसरला (Ground Rule) 
"जर घोटाळे करायचे असतील तर तुम्ही राजकारणी असायलाच हव."
"घोटाळे करणे, अन ते समोर आले तरीही… कधीही पकडले न जाणे, त्यांची चौकशी न होणे, तुरुंगात न जाणे, शिक्षा न होणे हा फक्त राजकारण्यांचा जन्मसिद्ध  अधिकार आहे. अन तो ते मिळवतातच". बाकी जनतेने १ आण्याची जरी अफरातफर केली तरी कायदे कडक आहेत. लगेच शिक्षा… 
आता जर हे पहा,
६० लाखाचा घोटाळा म्हणून १२ तासात अटक अन आजीवन बंदी, जर हाच न्याय असेल तर मग करोडो रुपयाच्या रेल्वे, कोळसा, हेलीकॉप्टर… (घोटाळ्यांची यादी खूप मोठी आहे ) घोटाळ्यातील दोषी राजकारण्यांना अटक का नाही? ६०  लाखांचा घोटाळा/अफरातफर म्हणून श्रीशांत वर आजीवन बंदी, मग या राजकारण्यांच काय? त्यांना का नाही बंदी निवडणुकीवर? 
CBI:- सगळी CBI  श्रीशांतच्याच मागे लागली आहे वाटत, कारण इतके घोटाळे समोर येउन सुद्धा कोणी त्याचे धागे दोरे काढायच्या मागे नाहीत. साधा ब्र सुद्धा काढत नाहीत.
CBI गांधी घराण्याच्या ताटाखालाच मांजर झाल आहे. थोड्या दिवसांपूर्वी DMK ने पाठींबा काढल्याच्या दुसर्याच दिवशी त्यांच्या मुलाच्या/जावयाच्या  घरावर पाहते ५ वाजता CBI ची धाड. अतिशोक्ती म्हणजे ५ वर्ष पूर्वी घेतलेल्या गाडीचा कर भरला नाही म्हणून. ५ वर्ष मग काय त्याची कुरवाळत होता का?
पोलीस:- तिकडे दिल्ली पोलिसांनी कारवाई केली म्हणाल्यावर इकडे मुंबई पुणे पोलिस जागे झाले अन आपापल्या इथे तपास करू लागले. अहो पुण्या मुंबईत बॉम्बस्फोट होऊन कित्येक वर्ष झाली अजून त्यातील सर्व आरोपींचा पत्ता लागला नाही. मागील आठवड्यातच ऐकले कि महाराष्ट्र बलात्कारात पहिले राज्य बनले आहे, त्यावर उपाय करा. मागे राहुल गांधीच्या मुंबई दौर्यात तब्बल ४० हजार पोलिस बंदोबस्ताला होते. अहो हि सुरक्षा सामान्य नागरिकांना पुरवली तर बलात्कार तर सोडाच पण कोणी चप्पल चोरायचा विचार हि नाही करणार.
दिल्ली पोलिस:- जंतर-मंतर, सोनियाच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर लाठीचार्ज करतात. अन करोडोंचे घोटाळे करणार्यांना संरक्षण देतात. त्यांना काय म्हणायचं.  
अन सर्वात महत्वाच अन लाजीरवाण म्हणजे मिडिया, वाहिन्यांनी श्रीशांच्या ६० लाखांसाठी ८ दिवस २४ तास बातम्या दिल्या, महाचर्चा भारावल्या. याच  गणितानुसार कोट्यावधींच्या कोळसा घोटाळ्य़ासाठीच २-३ वर्ष २४ तास बातम्या द्यायला हव्यात. अन या आघाडी सरकारनी ४० -५० वर्षांच्या बातम्या आताच रेडी करून ठेवल्या आहेत, काळजी नसावी. पण अस काही घडताना दिसत नाही. हेतू/TRP पुरस्पर बातम्या दिल्या जातात. 
सगळ्याच कारण काय आहे माहित आहे… कारण अगदी सोप्प आहे, 
या देशात राजकारण्यांना सार काही माफ आहे,
अन सामान्य माणसासाठी श्वास घेण सुद्धा पाप आहे. 

आपणही विचार करायला हवा कि श्रीशांत ला आजीवन बंदी घालताय न मग राजकारण्यांना का नको? 
मिडिया ने हि कशाला महत्व द्यावे हे ठरवावे.
पोलिसांनी अन CBI ने जनाची नाही तर मनाची बाळगून कर्तव्य दक्षतेने काम करवे. 
अन हे सगळ घडण जवळ जवळ अशक्यच आहे तेव्हा आपणच राजकारणी झालेल बरं म्हणाल तर वावगे ठरू नये… 

पण जर मला स्वताल विचारताल तर, तर मी नाही हातावर हात धरून बसणार. बदल हा घडवून  आणायचा आहे. आता फक्त लेखणी हाती धरली आहे अजून पुढे रणांगण बाकी आहे… 
 

B. Regards,

Kiran Jagtap
जगावं तर असं जगावं, की इतिहासाने आपल्यासाठी एक  पानं राखावं... 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages