लाज वाटते, मला पुणेकर म्हणवून घेण्याची.

21 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Jun 11, 2012, 8:12:13 AM6/11/12
to MadRacer Group, kkiran jagtap
लाज वाटते, मला पुणेकर म्हणवून घेण्याची.
होय एका भ्रष्ट अन आरोपी व्यक्तीकडून पुण्यातील संकुलांचे उद्घाटन केले जाते. पालिकेत प्रवेश करण्यासाठी मोठा स्टंट केला जातो.  होय मी आज झालेल्या कलमाडींच्या पालिका प्रवेश बद्दलच बोलतोय. कसला अभिमान रे तुम्हाला पुण्याच्या कोन्ग्रेस च्या कार्यकर्त्यानो
अरे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ना त्या गोष्टीचा अभिमान बलाग्ताय तुम्ही. अरे कुठे गेली राजांनी शिकवलेली देशभक्ती. 
अरे जनतेचा पैसा लुटतात म्हणून राजांनी आपल्याच सासर्याची संपत्ती , सरदारकी (सुपे ) जप्त केली. अन  सासर्याला कायमच स्वराज्यातून हद्दपार केल.. का..? तर फक्त जनतेचा पैसा कोणी लुबाडत असेल तर त्यावर अंकुश बसावा. अन रयातेपुढे एक आदर्श स्थापन व्हावा. अरे कुठे गेले ते राजांचे संस्कार? की तुम्हीही निशंढ झालात. अरे तुमच्या पेक्षा मुगलांची औलाद  बरी. अरे तुमच्या पक्षात ही आहेत की चांगले कार्यकर्ते, करा ना त्यांचा उदो उदो. की तुमचे चांगले कार्यकर्तेच संपलेत. ? काही चांगल कामच नाही तुमच्याकडे म्हणून अशा गुन्हेगारापुढे पायघड्या अंथरून बसलात ? संपले असतील तर तसं सांगा, आम्ही देतो आणून इकडून तिकडून.

अन काय रे, कालामाडीना अक्कल नाही का. काय हा रुबाब. जणू काही विश्व विक्रम करून आल्यासारखा तोरा होता पालिकेत जाताना. अरे जनाची नाही तर मनाची तरी असावी.

लाज वाटते आम्हाला पुणेकर म्हणवून घेण्याची. सांस्कृतिक राजधानीतला सुसंस्कृत पणा संपला की काय ?  सद सद विवेक बुद्धी संपली की काय. कशाला पुण्यची लक्तरे अशी वेशीला टांगताय. जागे व्हा. अन नसेल तुमच्याकडे लीडर, नेतृत्व तर तयार करा. उठ कामाला लागा. हीच वेळ आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याला मोठे व्हायची. 
बर झाल राजे तुम्ही नाहीत ते, आम्हालाच इतका पच्छाताप होतोय... काय केल यांनी आपल्या पुण्याभूमीच. :'(
खरंच लाज वाटते... 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages