"काहीच नाही होऊ शकणार या देशाच. कधीच नाही बदलणार आपण." Time2Change

28 views
Skip to first unread message

kKiran Jagtap

unread,
Aug 14, 2012, 6:44:56 PM8/14/12
to MadRacer Group, kkiran jagtap

"काहीच नाही होऊ शकणार या देशाच.  कधीच नाही  बदलणार आपण."
माहित नाही किती वेळा ऐकलय,  कितीतरी जणांच्या तोंडून ऐकलय. अन खरंच तर आहे...
इतक्या वर्षात काहीच नाही बदललं, बस सरकारवर सरकार बदलले पण रस्त्यावरच कचरा तिथल्या तिथेच. 
का? कारण काहीच नाही होऊ शकत या देशाचं..
कित्येक सरकार चालवणारे मंत्र्यांवर क्रिमिनल केसेस चालू आहेत, तर कुठे कायद्याच रक्षण करणारेच पैसे खाताहेत. 
का? कारण काहीच नाही होऊ शकत या देशाचं..
स्पोर्ट स्टार असो की फिल्म स्टार, आपण त्यांच्यात कधी जातीचा भेदभाव नाही करत, पण नेत्यांनी उचकावल्यावर धर्माच्या नावावर शेकडोंची कत्तल करायला माणसे तयार होतात.
का? कारण काहीच नाही होऊ शकत या देशाचं..
आतंकवादी येऊन, आमच्या डोळ्यांसमोर, आमच्याच शहरांवर हल्ला करतात अन आम्ही शेकडोंच्या संख्येने मेणबत्या पेटवतो.. 
का? कारण काहीच नाही होऊ शकत या देशाचं..

लोकांकडे अफाट पात्रता आहे पण मार्गदर्शनाशिवाय किंमत नाही.
अपरिमित बुद्धिमत्ता आहे पण पैशांशिवाय प्रवेश नाही. 
क्षितिजा पलीकडे झेप घ्यायची इच्छा आहे पण त्यासाठी लागणारी दिशा नाही
 ऑलिम्पिक मध्ये पदके हवीत पण त्यासाठी लागणार मार्गदर्शन अन पैसा नाही.
अन पैशान अभावी, मार्गदर्शानाभावी ती सगळी क्षितीज मनातल्या मनातच विरून जावीत.
का ? काय खरंच काही नाही होऊ शकत का या देशाचं?
 हो खरंच अजून काही नाही होऊ शकत या देशाचं.... :(
खरंच काहीच नाही होऊ शकत का आपल्या देशाचं..? 

होऊ शकत, हो खरंच खूप काही होऊ शकत.
कदाचित हे साऱ्या समस्यांचं उतार नसेल पण ही एक सुरुवात असेल.
सुरुवात जी आपल्या आपल्या हातात आहे. तुमच्या हातात आहे. आपण साऱ्या नेटिझंस च्या हातात आहे.
नव्या दिशा, नवी क्षितीज खुली करण्यास आपण कदाचित कुणाला मदत करू शकू. 
कशी...?
क्रीडा, कला, शिक्षण किवा अन्य कोणत्याही क्षेत्रात आपणास मदत करणारे भरपूर असतात, कमी असते ती फक्त त्याबद्दलच्या जागरूकतेची. तीच कमी आपण दूर करायची.
जेथे जेथे कोणी कसली शिष्यवृत्ती देत असेल, कोणत्या कलागुणांना नैपुण्याच्या जोरावर वाव देत असेल, आर्थिक मदत करत असेल,  मार्गदर्शन करत असेल, ती सर्व माहिती इथे प्रसिद्ध करूयात. म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना एके ठिकाणी अरी माहिती सहजगत्या उपलब्ध होईल. अन कदाचित आपण कोणाच क्षितीज घडवायला हातभार लावू शकू. अन एक स्वप्नातला भारत बनवू शकू.  

"If u want to Change the System, U have to be in the System..."  n this is our system.. this is our style.
We don't want to keep blaming system anymore, we will make role model for the system...
After all, how long do you want to be called as Sleeping Tiger. It time to Wake Up...




--
Thanks and Regards,
Kiran Jagtap.


Reply all
Reply to author
Forward
0 new messages