1 view
Skip to first unread message

Sanjay Dusane

unread,
Jun 6, 2014, 1:43:23 AM6/6/14
to f1, f2, khande...@googlegroups.com

नव्वदीतले जांबुवंतराव जमदग्नी मृत्युशय्येवर होते. गेली ४० वर्षे त्यांच्यावतीने प्रॉपर्टीचा खटला लढवलेल्या ऍडव्होकेट आडदांडांना त्यांनी बोलावून घेतले. खोल गेलेल्या आवाजात त्यांनी विचारले,

जांबुवंतराव जमदग्नी : मला वकील व्हायचंय. काय करावं लागेल?

ऍडव्होकेट आडदांड : अहो, पण, एकदम अचानक हे काय मनात खूळ भरलंय तुमच्या?

जांबुवंतराव जमदग्नी : ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण, मला वकिलीची डिग्री हवी आहे. ताबडतोब. एखाद्या फोकनाड युनिव्हसिर्टीतून ती विकत घ्यावी लागली तरी चालेल. मी हवे तेवढे पैसे देईन तिच्यासाठी.

आडदांड वकिलांनी ५० हजार रुपये मोजून जांबुवंतांच्या नावाची खस्मानिया विद्यापीठाची डिग्री मिळवली. ती डिग्री पाहताक्षणी जांबुवंतरावांचा चेहरा आनंदाने खुलला. त्यावर अतीव समाधान पसरले. पाठोपाठ लगेच त्यांना खोकल्याची भयानक उबळ आली, ते तळमळू लागले. आता त्यांचा अंत जवळ आलाय, हे ओळखून आडदांड पुढे सरसावले. त्यांनी विचारले,

ऍडव्होकेट आडदांड :जांबुवंतराव, तुम्ही मृत्यू इतका समीप आलेला असताना वकील का बनलात इतक्या तातडीनं?

जांबुवंतरावांच्या शेवटच्या श्वासातून घरघरत अखेरचे शब्द बाहेर पडले,

जांबुवंतराव जमदग्नी : जगातून एकतरी वकील नष्ट करण्याचा तोच मार्ग होता...

Reply all
Reply to author
Forward
0 new messages