काडी केली तर कारवाई होणारच
नवी दिल्ली। दि. २७ (वृत्तसंस्था)
‘या मेसेजद्वारे मी कळवू इच्छितो की, माझ्या फेसबुक अकाउंटवरील सर्व माहिती ही माझी वैयक्तिक आहे. मी केलेल्या कोणत्याही विधानाबाबत किंवा मी पोस्ट केलेल्या चित्रांबाबत माझ्यावर कारवाई करण्याचा कोणालाही अधिकार नाही.’ या आशयाच्या पोस्टद्वारे स्वत:ची
सुटका करून घेण्याचा विचार
करीत असाल तर तुम्ही मोठय़ा गैरसमजात आहात. कारण, अशा ‘पोस्ट’ने तुमची कोणत्याच कायद्यातून आणि नियमांतून सुटका होऊ शकत नाही.
फेसबुकवरील तुमचे अकाउंट आणि त्यावरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या एक वॉल पोस्ट अनेक जण आपापल्या वॉलवर टाकत आहेत. परंतु, तुम्ही कोणाबद्दल आक्षेपार्ह विधान केले असेल किंवा तुम्ही कोणाची बदनामी करीत असाल तर तुमच्यावर कारवाई होणारच हे विसरू नका.
फेसबुक अकाउंटवरील सर्व फोटो, वैयक्तिक माहिती, व्हिडीओज आदी गोष्टींवर अकाउंटच्या मालकाचाच अधिकार असल्याचे या पोस्टमध्ये नमूद केले आहे. या पोस्टनंतर तुमच्या कोणत्याही अनैतिक पोस्टवर कार्यवाही करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचेही या संदेशात म्हटले आहे. बर्नर संकेत प्रणालीनुसार हा मेसेज आपल्या वॉलवर पोस्ट केल्यानंतर आपले अकाउंट सुरक्षित व खाजगी होत असल्याचा बनाव करण्यात आला असला तरी हा निव्वळ मूर्खपणा आहे.
हा संदेश पोस्ट केलेल्या हजारो जणांना आपले अकाउंट सुरक्षित झाल्याचा भ्रम झाला असला
तरी प्रत्यक्षात अशा कोणत्याही
मेसेज किंवा पोस्टद्वारे ते शक्य
नाही. यासाठी सेटिंग्स हाच योग्य पर्याय आहे.
फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट असल्याने या संकेतस्थळावरील सर्व माहिती
ही सर्वांना दिसणारच. तुम्ही ‘पब्लिक’ पर्यायावर शेअर केलेली माहिती ही जगातील कोणताही फेसबुककर अगदी आरामात पाहू शकतो. अर्थात, सेटिंगद्वारे ती
फक्त आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांनाच दिसावी म्हणून फेसबुकने नियमावलीत आपल्याला यासाठीचे पर्याय दिले आहेत.
याबाबतची माहिती फेसबुकवर लॉगईन होताना दिलेली आहे. परंतु, आपल्यापैकी बर्याच जणांनी ती वाचली नसेलच. आज ती नक्की वाचा.
या संदर्भातील पोस्ट शेअर करणो हा केवळ मूर्खपणा आहे. कारण, अशा प्रकारे आपण सुरक्षा मिळवू शकत नाही आणि आपण जर काही आक्षेपार्ह विधान केले असेल तर कारवाईच्या बडग्यातून स्वत:ला वाचवूही शकत नाही.
सोमवारपासून फिरत असलेला हा संदेश अनेकांनी आपल्या वॉलवर पोस्ट केला आहे. आपली माहिती कोणी पाहू नये त्याचा आपल्याला त्रास होऊ नये ही भावना स्वाभाविक आहे. पण, त्यासाठी वॉल पोस्ट हा योग्य मार्ग नाही. तुमच्या एखाद्या मित्राने असा संदेश आपल्या वॉलवर पोस्ट केला असेल तर त्याला वेड्यात काढू नका; कारण मोठमोठे सेलिब्रिटीजही हा मूर्खपणा करून बसले आहेत.
या सुरक्षेची आपल्याला तरी काहीच गरज नाही. कारण, फेसबुक आपण रोज कुणाशी चॅट करतो, काय बोलतो किंवा कोणते फोटो शेअर करतो हे पाहत नाही. फेसबुकच्या जाहिरातदारांना लोकांचा कल जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट माहिती पुरवली जाते. पण, ती आपल्या खाजगी आयुष्याबद्दल नक्कीच नसते.
--
Sanjay Dusane
Sr.Developer
ABM KNOWLEDGEWARE LTD.
9325734004
------------------------------------
Life Is Green
------------------------------------