1 view
Skip to first unread message

Sanjay Dusane

unread,
May 1, 2013, 1:37:12 AM5/1/13
to f1, f2, khande...@googlegroups.com, ahirso...@groups.facebook.com, sonar.sa...@groups.facebook.com, sonar...@groups.facebook.com
तमाम मराठी भाषिकांना मग ते उच्चवर्णीय असोत वा मागासवर्गीय हिंदू असोत वामुसलमान ओबीसी असोत वा मराठा वा आदिवासी सर्वांना विश्वास वाटेल अशा बिगरराजकीय संघटनेची आता गरज आहे ती राज्यकर्ते आणि विरोधी पक्षांना मार्ग दाखवणारीअसेल आणि प्रसंगी फटकारे देणारीही 

मुंबईमधे मराठी टक्का कमी होत आहे का या प्रश्नाने सध्या मुंबईतील मराठीजनांनाग्रासले आहे केवळ परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे नव्हे तर निवाऱ्याचे व रोजगाराचे प्रश्नबिकट झाल्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेरची वाट धरू लागला आहे सत्ताधाऱ्यांविषयीकाय बोलावे मराठी माणसाची वट मुंबईतच नव्हे तर स्वपक्षातही नसल्याचेसोयरसुतक काँग्रेस पक्षातल्या मराठी नेत्यांनाही नाही गोदी घाऊक बाजार मुंबईबाहेरहलवून मुंबईत गरजणारा कष्टकरी माथाडी कामगाराचा आवाज हरवल्यानंतर लबाडनेत्यांची वक्रदृष्टी गिरण्यांच्या जमिनीकडे वळली गिरणी मालकांच्या घशात या जमिनीघालण्यासाठी गिरणी कामगारांचा संप चिरडून टाकण्याचे कारस्थान पूर्वीच रचले गेलेहोते याचाच पुढचा भाग म्हणून गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी गिरण्यांच्याजमिनीतून मिळणाऱ्या हिश्श्याचा मोठा भाग सत्ताधाऱ्यांनीच पुन्हा गिरणी मालकांनाआंदण दिला व मुंबईत स्वत च्या मालकीच्या घराचे स्वप्न पाहणारा गिरणी कामगारदेशोधडीला लागला गिरण्यांच्या जमिनीवर कामगाराच्या वारसांना रोजगार उपलब्धहोण्याचे स्वप्नही मृगजळ ठरले रोजगार मुंबईबाहेर गेला म्हणून किंवा नष्ट झाला म्हणूनमुंबईबाहेर फेकला गेलेला मराठी कामगार ही मुंबईतून बाहेर जाणाऱ्या मराठीमाणसांच्या लोंढ्याची सुरुवात होती 

मराठी माणसाचे कैवारी म्हणवणाऱ्या शिवसेनेची उदासीनताही बुचकळ्यात टाकणारीहोती मुंबईत येणारे लोंढे हीच एकमेव आपत्ती आहे असे भासवून मराठी माणसालाचिथावण्यापलीकडे फार काही झाले नाही ज्या रोजगाराच्या शोधात परप्रांतीयबेरोजगारांचे तांडे मुंबईत आले त्या स्वरूपाच्या रोजगारामध्ये मराठी तरुणांना रस होताका सुरक्षारक्षक रिक्षा टॅक्सी चालक फेरीवाले लाँड्री आदि व्यवसायांमधेपरप्रांतीयांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला तो मराठी बेरोजगार तरुणांनी हे व्यवसायस्वीकारण्यास नकार दिला म्हणूनच ना सुतारकाम गवंडीकाम हिऱ्यांना पैलूपाडण्याचा उद्योग इत्यादी व्यवसाय तर अंगभूत कौशल्यांमुळे परप्रांतीयांच्याच ताब्यात गेले१२ १४ तास काम मेहनतीची तयारी नियमांवर बोट ठेवून काम न करता कामाच्याठिकाणी जुळवून घेण्याची तयारी यामुळे परप्रांतीय माणूस नोकरीवर ठेवणे मराठी 'साहेबांनाही जास्त सोयीचे वाटू लागले बुद्धिकौशल्यावर आधारित व्यवसाय वारोजगारांतही मराठी माणसाला फार वाव मिळत नाही याचे कारण कॉल सेंटरमधल्यानोकऱ्या असोत वा मोबाइल फोन दुरुस्तीसारखे छोटे व्यवसाय असोत आवश्यक कौशल्यअंगी बाणवण्याकडेही मराठी तरुणांचे दुर्लक्ष झाले या उभरत्या क्षेत्रांतही अन्य प्रांतांतूनआलेल्या लोकांनी रोजगाराच्या संधीचा ताबा घेतला जागतिकीकरण व उदारीकरणानंतरमनुष्यबळामधे घट करण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीच्या भुलविणाऱ्या योजना जाहीर झाल्या .परिणामी मुंबईतल्या मराठी माणसांनी गावाकडचा रस्ता धरला 

रोजगाराबरोबरच निवाऱ्यासंबंधीचे प्रश्नही मराठी माणसांसाठी जटिल होऊ लागले . 'मुंबईचे शांघाय करण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर जागांच्या किमती आकाशाला भिडल्या .पुनर्विकासातून मिळणारा मलिदा नजरेत भरल्यामुळे मोठमोठ्या पुंजीपतींनी व परप्रांतीयकंपन्यांनी पुनर्विकासाकडे मोहरा वळवला या कंपन्यांमध्ये आपला काळा पैसागुंतवणाऱ्या राजकारण्यांचा वरदहस्तही बड्या विकासकांना लाभला कधी धाकदपटशादाखवून कधी मोठमोठ्या रकमांची आमिषे दाखवून कधी वाढीव बांधकामे अनधिकृतठरवून त्यावर पालिकेमार्फत कारवाई करण्याच्या धमक्या देऊन राहत्या जागा खालीकरण्याचे सत्र सुरू झाले पुनर्विकास योजनांतील विक्रीयोग्य सदनिका घेणे तर धनाढ्यपरप्रांतीयांनाच शक्य होऊ लागले मूळ रहिवाशांच्या पुनर्वसन सदनिकाही अवाढव्यकिमती देऊन खरेदी करण्यात येऊ लागल्या मुंबईतील मोक्याच्या जागी असलेल्यामराठीबहुल वस्त्यांमध्ये घोंघावणारे पुनर्विकासाचे वादळ आता उरल्यासुरल्या मराठीटक्क्याचा लचका तोडूनच थांबेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत 

मुंबईमध्ये मराठी टक्क्याची घसरण थांबणार कशी उद्योग व आस्थापनांमध्येस्थानिकांनाच प्राधान्य मिळावे यासाठी १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्याची अट बदलून २० वर्षेकिमान वास्तव्य व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक करणे म्हाडाच्या ८० टक्के सदनिकामहाराष्ट्रातील मूळ मराठी भाषिक लोकांकरिता राखून ठेवण्यासंबंधी आग्रही भूमिका घेणे ,सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये नोंदणी करताना सभासदांमध्ये किमान ५० टक्केमहाराष्ट्रात २० वर्षे वास्तव्य असणारे रहिवासी असणे अनिवार्य करणे अशा सुधारणाकरण्याबाबतची शक्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे 
मराठी माणसाच्या मुंबईतील अस्तित्वाची लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे .अशा वेळी मराठी माणसांना गरज आहे ती खंबीर नेतृत्वाची आणि संघटनेचीही !बाळासाहेब ठाकरेंच्या रूपाने खंबीर असे नेतृत्व व शिवसेनेच्या रूपाने अन्यायावर झेपघेणारी संघटना १९६०च्या दशकामधे मराठी माणसाला लाभली होती ८० टक्केराजकारण व २० टक्के समाजकारणाच्या भाषेने मराठी माणूसही प्रभावित झाला होता .१९७०च्या दशकामध्ये बँका विमा कंपन्या आदिंमधील नोकऱ्यांमध्ये बहुसंख्येने मराठीमाणसाचा शिरकाव होण्यास ही संघटनाच कारणीभूत होती तथापि सत्तेपासून दूर राहूनसत्तेवर रिमोट कंट्रोल ठेवणारे बाळासाहेब अंगी क्षमता व नेतृत्वाचे गुण असूनहीदक्षिणेतल्या करुणानिधी एन टी रामाराव उत्तरेतल्या मुलायमसिंह लालूप्रसादयांच्यासारखे महाराष्ट्राचे निर्विवाद नेते होऊ शकले नाहीत सरकारी कर्मचाऱ्यांचा संप ,गिरणी कामगारांचा संप यासह कामगार चळवळीला वेळोवेळी केलेला विरोध दलितचळवळीवर झालेले हल्ले मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि मंडल आयोगाला केलेलाविरोध यामुळे विविध मराठी भाषिक समाजघटक बाळासाहेबांपासून दूर गेले व परिणामीमराठी माणसाची ही चळवळ निष्प्रभ होऊ लागली शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा हातीघेतल्यावर तर मराठीच्या आंदोलनाची स्थिती असुनी नाथ आम्ही अनाथ अशी झाली हेकटु सत्य आहे म्हणूनच आज पुन्हा एकदा मराठी माणसांच्या एकजुटीची वज्रमूठनिर्माण करताना तमाम मराठी भाषिकांना मग तो उच्चवर्णीय असो वा मागासवर्गीय ,मराठी हिंदू असो वा मराठी मुसलमान ओबीसी असो वा मराठा वा आदिवासी सर्वांनाविश्वास वाटेल अशी बिगर राजकीय संघटना निर्माण करावयास हवी मोलमजुरीसाठीआलेल्या गरीब श्रमिक परप्रांतीयाला लक्ष्य बनवून द्वेषाचे राजकारण करण्याऐवजीसंपत्तीच्या जोरावर मुंबईतील मराठी ठसा पुसण्यास पुढे सरसावलेल्या धनाढ्यांचे मनसुबेउधळून लावले पाहिजे हत्यार घेऊन नव्हे तर बुध्दिकौशल्याच्या बळावर रणनीतीआखली पाहिजे महाराष्ट्रावर राज्य अजून मराठी माणसांचेच आहे ज्यांना राज्यकर्त्यांवरअंकुश ठेवायचा आहे ते विरोधी नेतेही मराठीच आहेत म्हणून राज्यकर्ते व विरोधी पक्षयांना मार्ग दाखवणारी व प्रसंगी फटकारेही देणारी शक्ती म्हणून मराठी माणसांसाठी ,मराठी संस्कृतीसाठी मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्यांची बिगर राजकीयसंघटना निर्माण होणे ही काळाची गरज आहे 

अजित सावंत

--
Sanjay Dusane
 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages