पाऊण तासांत लुटले एक कोटी

0 views
Skip to first unread message

Sanjay Dusane

unread,
Feb 2, 2013, 5:56:13 AM2/2/13
to f1, f2, khande...@googlegroups.com, ahirso...@groups.facebook.com, sonar.sa...@groups.facebook.com, sonar...@groups.facebook.com



ऑनलाइन टीम
मुंबई, दि.२ - देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्याही वापरल्या जात आहेत. त्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही मोठे आहे. असाच एक गुन्हा घडलाय मुंबईतल्या उपनगरात. मुलुंडमधल्या अंकुर कोरणे यांचा इंटरनेट बँकिंगचा आयडी व पासवर्ड हॅक करून त्यांच्या खात्यातील एक कोटी रुपये अवघ्या ४५ मिनिटांत १२ वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांत ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी हा गंभीर गुन्हा घडला असून कोरणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी हॅकर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकका कॉस्मॅटिक कंपनीचे संचालक असलेल्या कोरणे यांचे येस बँकेच्या मुलुंड आशखेत खाते आहे. काल त्यांच्या याच खात्यातून पाऊण तासांत १ कोटी रुपये वेगवेगळ्या बँकांच्या खात्यात ट्रान्स्फर झाले. आरटीजीएस प्रणालीचा गैरवापर करून सायबर चोरांनी कोरणे यांचे १ कोटी रुपये लांबवले. या प्रकारामुळे मुलुंड पोलीसही चक्रावले असून त्यांनी हे प्रकरण सायबर सेल व आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 
कोरणे यांना पैसे ट्रान्स्फर झाल्याचा पहिला मेसेज येताच त्यांनी बॅकेत संपर्क साधून आपले खाते गोठवण्याची मागणी केली. मात्र बँकेने त्यांचे न ऐकता पोलीस एफआयआरची मागमी केली. त्यामुळे सायबर चोरांचे फावले व त्यांनी आणखी पैसे सहज लांबवले, असा आरोप कोरणे यांनी केला आहे.
--
Sanjay Dusane
Sr.Developer
ABM KNOWLEDGEWARE LTD.
9325734004
------------------------------------
Life Is Green
------------------------------------
Reply all
Reply to author
Forward
0 new messages