बंगळुरू: मंगळवारी एमए चिन्नास्वामी स्टेडियम झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुणे वॉरियर्सचा १३० धावांनी पराभव केला. ख्रिस गेलच्या विक्रमी शतकामुळे बंगळुरूने पुण्यावर हा मोठा विजय मिळवला.
ख्रिस गेलच्या नाबाद १७५ धावांमुळे बंगळुरुने पुण्यासमोर २६३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पेलताना पुण्याचा संघ २० ओवरमध्ये ९ फलंदाज गमावत १३३ धावांवरच गारद झाला. स्टीव्ह स्मिथ (४१) वगळता पुण्याच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे पुण्याला मोठ्या पराभव स्विकारावा लागला.
http://goo.gl/irRhT