घुसखोरीच्या आरोपाचे चीनकडून खंडन

1 view
Skip to first unread message

Jai Maharashtra

unread,
Apr 23, 2013, 11:49:07 PM4/23/13
to JM-...@googlegroups.com

घुसखोरीच्या आरोपाचे चीनकडून खंडन


बीजिंग: लडाखमधून भारतात तब्बल १० किलोमीटरवर घुसखोरी केल्याचा आरोप चीनने फेटाळला आहे. चीनच्या घुसखोरीचा भारताने तीव्र निषेध केलाय. मात्र, चीनने या निषेधाला फारसे गांर्भीयाने घेतलेलं नाही. त्यामुळे भारतानेही सैन्याची तुकडी लडाखकडे रवाना केली आहे.

लडाखच्या डेपांग खो-यातून चीनने भारतात घुसखोरी केली आहे. भारताच्या हद्दीत १० किलोमीटरपर्य़ंत सैन्य घुसवलं असून, दोन किलोमीटरवर त्यांनी छावण्यादेखील उभारल्या आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी याबाबत गेल्या आठवड्यात दिल्लीतील चिनी दुतावासात नाराजी व्यक्त करून निषेधही केला होता. यावर चीनने आज केलेला खुलासा भारतासाठी अधिकच चिंताजनक आहे. चीन म्हणतो, आम्ही भारत – चीन सीमारेषा अजिबात ओलांडलेली नाही. आमचं सरकार दोन्ही देशांतील सीमारेषा कराराला बांधील आहे. एवढंच नाही तर, चीनच्या परराष्ट्र खात्याच्या संयुक्त सचिवांनी या घटनेबाबत बीजिंगला काहीच कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

http://goo.gl/wpfrO
Reply all
Reply to author
Forward
0 new messages