बेळगाव: “चीनने लडाख सीमेवरून भारताच्या दहा किलोमीटर हद्दीत घुसखोरी केली
असून, तेथे आपल्या सैन्यासाठी तात्पुरत्या चौक्याही उभारल्या आहेत,” असा
गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी
बेळगाव येथे पत्रकार परिषदेत केला.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी राजनाथ सिंह बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बेळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच इतर विषयांवरही आपली मते मांडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “चीनने लडाख सीमेवरून भारतात घुसखोरी केली असून, आपले सरकार मात्र गप्प बसून आहे.” चीनने भारताला चारही बाजूने घेरले आहे. श्रीलंकेत चीन बंदर विकसित करत आहे. हिंदी महासागरात चीनच्या पाणबुड्यांचा वावर वाढला आहे, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.