Marathi translation of Adon Olam

63 views
Skip to first unread message

Aharon Varady

unread,
Aug 13, 2023, 11:19:50 PM8/13/23
to jewish-l...@googlegroups.com
If anyone is able, please help proofread this transcription of a 19th century Marathi translation of Adon Olam. My goal is to set the lines of this sefaradi nusaḥ of the piyyut side-by-side with its translation.

(Transcription follows link to source images: <https://archive.org/details/TheDailyPrayersTranslatedFromHebrewToMarathiJosephEzekielRajpurkar1889/page/n27/mode/2up>).
---

जो जगताचा स्वाभि, त्याने कोणताहि घडविलेला पदार्थ उत्पन्न होण्यापूर्वी राज्य
केले; ज्यावेळी सवे त्याच्या इच्छेप्रमाणे झालें, तेव्हां त्याचें नाम राजा
असें म्हटलें गेटे, आणि सर्वे संपल्यावरहि तो. भयंकर (राजा ) राज्य
करीतच होता, करीत आहे व तोच सर्वकाळ गौरवाने राहाल, तो एक
आहे आणि त्यांची बरोबरी व त्याची संगत करणारा दुसरा कोणी नाहीं. तो
आरंभावांचून व अंतांबांचून आहे; आणि साम्यं व अधिकार ( सर्वे ) त्याचाच
आहे. त्यास उपमा नाहीं व तुलना नाही, तो बदलत नाहीं व पालंटत नाही,
त्यामध्ये संयोग नाहीं व वियोग नाहीं, त्याचें सामथ्यं व त्याचा पराक्रम मोठा
आहि. तो माझा देव व माझा जीवेत उद्धारक आहे, आणि संकटांच्या दिवशी
माझ्य़ा. विभागाचा खडकरूप आश्रय आहे. तो माझा झेंडा व माझा आश्रय आहे.
मी हाक मारितो त्या दिवशीं तोच माझ्या प्याल्याचा वांटा आहे, तोच निरोगी
करणारा व उपचार करणारा आहे व तोच मजवर पाहारा करणारा व मला साह्य
करणारा आहे. ज्यावेळीं मी निजतों. व जाग्रत होतों, तेव्हां मी आपला जीव
त्याच्याच हातीं सोंपवितो, आणि माझा आत्मा व माझें शरिरही. देव माझा
आहे, मी भिणार नाहीं. त्याच्या पवित्र मंदिराविषयी माझा जीव हर्षित
होईल; तो आमचा माशीयाह लवकर पाठवील, मग आम्हा आपल्या पवित्र
मंदिरा त्याच्या भयंकर नामानें गायन करूं. आमेन, आमेन.

--
Aharon Varady, M.C.P., M.A.J.Ed.
Community Planner, Educator
Pronouns: He/him/his

Aniruddha Walke

unread,
Feb 16, 2024, 6:38:26 AMFeb 16
to Jewish Languages
Hi Mr Varady,

Joined the group today and came across this post. Went through the transcription, and as a native Marathi speaker, I found it to be mostly accurate, except for a couple of words. Here is the proofread version:

जो जगताचा स्वामि, त्याने कोणताहि घडविलेला पदार्थ उत्पन्न होण्यापूर्वी राज्य केलें; ज्यावेळी सर्व त्याच्या इच्छे प्रमाणे झालें, तेव्हां त्याचे नाम राजा असे म्हटलें गेले, आणि सर्वे संपल्यावरहि तो भयंकर (राजा ) राज्य करीतच होता, करीत आहे व तोच सर्वकाळ गौरवाने राहील. तो एक आहे आणि त्याची बरोबरी व त्याची संगत करणारा दुसरा कोणी नाहीं. तो आरंभावांचून व अंतांवांचून आहे; आणि सामर्थ्य व अधिकार ( सर्व ) त्याचाच आहे. त्यास उपमा नाही व तुलना नाही, तो बदलत नाहीं व पालटत नाही, त्यामध्ये संयोग नाही व वियोग नाहीं, त्याचें सामथ्यं व त्याचा पराक्रम मोठा आहे. तो माझा देव व माझा जिवंत उद्धारक आहे, आणि संकटाच्या दिवशी माझ्या विभागाचा खडकरूप आश्रय आहे. तो माझा झेंडा व माझा आश्रय आहे. मी हाक मारितो त्या दिवशीं तोच माझ्या प्याल्याचा वांटा आहे, तोच निरोगी करणारा व उपचार करणारा आहे व तोच मजवर पाहारा करणारा व मला साह्य करणारा आहे. ज्यावेळीं मी निजतों व जागृत होतों, तेव्हां मी आपला जीव त्याच्याच हातीं सोंपवितो, आणि माझा आत्मा व माझें शरिरही. देव माझा आहे, मी भिणार नाहीं. त्याच्या पवित्र मंदिराविषयी माझा जीव हर्षित होईल; तो आमचा माशीयाह लवकर पाठवील, मग आम्ही आपल्या पवित्र मंदिरीं त्याच्या भयंकर नामानें गायन करूं. आमेन, आमेन.

I hope this helps, even if it's six months too late!

Regards,
Aniruddha Walke (he/him)
Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, Maharashtra, India - 411006

Reply all
Reply to author
Forward
0 new messages