Fwd: Marathi Panchtantra

2 views
Skip to first unread message

Amit Harhare

unread,
Mar 6, 2014, 8:42:26 AM3/6/14
to itmilanchinchwad
---------- Forwarded message ----------
From: "Vikas Phadke" <vika...@gmail.com>
Date: 06-Mar-2014 5:51 PM
Subject: Fwd: Marathi Panchtantra
To:
Cc:

---------- Forwarded message ----------
From: nilesh mulik
Date: 2013-11-30 9:27 GMT+05:30
Subject: Fwd: Marathi Panchtantra
To: 




अदृश्य खजिन्याची गोष्ट

 

फ़ार फ़ार जुनी गोष्ट आहे. एक घनदाट जंगल होते.त्या जंगलात एक सिंह राज्य करत होता. त्याला सर्वजण घाबरत आणि त्याचेच सर्वजण ऐकत. एके दिवशी एक कोल्हा त्याच्याकडे आला आणि म्हणाला...

लहानपणी आपण सर्वांनीच अशा गोष्टी ऐकल्या असतील. वाचल्याही असतील. या गोष्टींतले प्राणी बोलत. गुंतागुंतीचा विचार करत. एकमेकांना उपदेश करत. एकमेकांवर कुरघोडी करत. यातला कोल्हा लबाड असे. गाढव बिनडोक असे. ससा चतुर असे. हत्ती शांत डोक्याने विचार करी. ईसापनिती, जंगल जंगल बात चली है पता चला है म्हणत गोष्टी सांगणारं जंगलबुक, हितोपदेश, पंचतंत्र अशा पुस्तकांतून अशा खूप गोष्टी वाचल्याही असतील. गंमत जंमत करत शिकवण देणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या या गोष्टी तुम्हाला आठवत असतील वा नसतील कदाचित. पण त्या गोष्टींनी तुमच्या मनावर केलेले खोलवरचे संस्कार मात्र तुमच्या मनातून आजही पुसले गेले नसणार. आणि हीच तर या गोष्टींची खासियत. पुर्वीच्या काळी या आणि अशाच गोष्टींतून मुलं शहाणपण आणि मूल्यं शिकत. त्याचा वापर आयुष्यभर करत. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च शिक्षण घेतलं तरी मूल्यशिक्षण आणि शहाणपणाची शिदोरी मात्र बालपणी याचगोष्टींतून मिळालेली असे.

हल्ली जो तो उठतो तो एम बी ए करतो. तीसेक वर्षांपुर्वी MBA हा शब्दही फ़ारसा कुणाला माहित नव्हता. मॅनेजर बनण्यासाठी काही विशेष वेगळं शिकावं लागतं हेही माहित नव्हतं लोकांना. मुळातली बुद्धीमत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर लोक मॅनेजर बनत. पण ते काम करत कसं? की जुने सगळे लोक मठ्ठ होते? त्यांना ते शहाणपण कुठून मिळे?

या MBA मध्ये सगळी जी तंत्रं शिकवतात ती Maslow, Peter Drucker, Koontz, Douglus Mcgregor, Philip Kotlerवगैरे पश्चिमी महान लोकांनी शोधली असं सांगितलं जातं. “म्हणजे मग त्यांच्या आधीच्या लोकांचं काय? भारतीय वगैरे लोकांना काही अक्कलच नव्हती का?” असं मला नेहमी वाटायचं. पण चाणक्य, दासबोध वगैरेंमध्ये जे शहाणपण शिकवलं जातं त्याचं काय?

अचानक पंचतंत्र हाती आलं. म्हणजे लहानपणी गोष्टी वाचल्या होत्या. मस्त होत्या. गंमतीदार होत्या. पण त्यातलं शहाणपण हे म्हणजे आताचं मॅनेजमेंटचं शास्त्र, आणि तेही व्यवस्थित मुद्देसूद स्वरूपात मांडलेलं हे आत्ता लक्षात आलं. Five Techniques of Management. पंच तंत्र. कुठेही राज्य करण्यासाठी पाच तंत्रं यायला हवीत.

Inline image 1

खूप बारकाईने आणि गंभीरपणे विचार केला की हे लक्षात येतं की हा एक फ़ार मोठा खजिना आहे. अगदी सहज हाताशी असलेला. पण झालंय काय की घरकी मुर्गी दाल बराबर. आपल्याच देशातलं हे पंच तंत्र आपण ना बारकाईने अभ्यासत. ना गंभीर घेत. टाईमपास म्हणून वरवर वाचतो फ़ारतर. तेही लहानपणी.

म्हणूनच आता आम्ही हे पंच तंत्र मोठ्यांसाठी त्याच्या मूळ रुपात आणलं आहे. याचा तुम्ही अभ्यास करावा. नीट पहावं. अगदी जसा MBA चा करतो तसा अभ्यास करावा. जमल्यास हे पुस्तक वाचल्यानंतर एक प्रश्नपत्रिका तयार करावी. आणि त्यात पास होणाऱ्यांना पंचतंत्र विशारद ही पदवी द्यावी.

पंचतंत्र वारंवार आणि सूक्ष्मपणे वाचताना या २३०० वर्षांपूर्वीच्या त्या विष्णुगुप्तांना मनातून शंभरदा साष्टांग दंडवत घालून झाला माझा. कारण हा अभ्यासक्रम तयार करतांना त्यांनी जी गुंतागुंतीची पद्धत, पण वरवर सहज साधी सोपी गोष्टीरूप करून वापरली आहे त्याला जगात तोडच नाही. पाचही तंत्रांचा सखोल अभ्यास, तोही त्याच्या सर्व अंगांचा, त्यातही संयमित उपयोग कसा करावा, अतिरेक होऊ नये, बॅलन्स कसा करावा हे सर्व त्यात आलंय. Is Management an art or science? “मॅनेजमेंट हे शास्त्र की कला” हा प्रश्नच श्रीमान विष्णूगुप्तांनी निकालात काढला. इतक्या कलात्मक रितीने सौंदर्यपूर्ण काव्यरूपात,  छंदबद्ध, गण मात्रांचा बॅलन्स संभाळून इतकं गहन शास्त्र इतक्या काटेकोर पद्धतीने, इतकं अचूकपणे, परिणामकारक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या डोक्यात ठोकून पक्कं करणारं एक, एक तरी उदाहरण कोणी पश्चीमी मॅनेजमेंटशास्त्रात दाखवावं.

याचा अर्थ नवीन मॅनेजमेंट शास्त्र निरुपयोगी आहे असं अजिबात नाही. आताच्या समाजात आणि आर्थिक परिस्थितीत खेळाचे नियम बदललेले आहेतच. त्याच बरोबर या पुस्तकातली जाती पाती आणि स्त्रीविषयक मतं ही जुनाट आणि न पटणारी आहेत. त्यामुळे या पुस्तकाचा आधार घेऊन वागायला जाणं हे अनेकदा चुकीचं ठरेल. हे पुस्तक वाचताना त्याचा काळ आणि त्या काळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यांचं भान ठेवूनच वाचायला हवं.  या पुस्तकातील अनेक मतांशी आम्ही सहमत नाही.

पण २३०० वर्षांपूर्वी लिहीलेलं पंच तंत्र आताच्या मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी एकदातरी नीट अभ्यासलंच पाहिजे हा मात्र आग्रह आम्ही धरतो. त्यातला प्रत्येक प्राणी हा विशिष्ट मानवी प्रवृत्तीचा प्रतिनिधी आहे. आणि असे दोन किंवा अनेक प्रवृत्तींचे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात काय घडतं, त्यांच्याशी आपण कसं वागावं, आपलं नुकसान होऊ न देता त्यांच्याशी मैत्री कशी करावी, आपल्याविरुद्ध कोणी जात असेल तर त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार त्याच्यापासून कसं निपटावं... एक ना अनेक असंख्य धडे या गोष्टींतून घेता येतील.  या गोष्टी कालातीत आहेत. आणि म्हणूनच हे ज्ञानही २३०० वर्षांनतर जिवंत आहे. उपयोगी आहे.

आणि त्याच्याबरोबर मनोरंजन... फ़्री फ़्री फ़्री... आहेच.

 

अशी मराठीतली चांगली चांगली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी ई साहित्य प्रतिष्ठान काम करते. त्यांना तुमची मदत हवी. पैसे नकोत. देणग्या नको. फ़क्त आपल्या आठ मित्र किंवा नातेवाईकांच्या ई मेल आय डी कळवा. म्हणजे त्यांनाही अशी पुस्तकं पाठवू. हळू हळू हा ज्ञानाचा वृक्ष इंटरनेटच्या माध्यमातून वाढवूया.

आमचा पत्ता : esa...@gmail.com


Inline image 2

--
ई साहित्य प्रतिष्ठान
punchtantra.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages