Fwd: Paus kavita

102 views
Skip to first unread message

Chitra Dandekar

unread,
Jul 6, 2016, 2:37:43 AM7/6/16
to gsdoc...@googlegroups.com

Hi everyone,
Sandeep Khare is a well known poet in Maharashtra.
Some of you who have stayed in Mumbai will probably
understand these lines.
It is about welcoming the long awaited rain.
Regards
Chitra

पाऊसराव! -संदीप खरे.

उशिरा बद्दल सॉरी बीरी म्हणणे
जरा राहूनच गेले,
पाऊसराव आले
ते एटीतच आले

ढग रंगाची फेल्ट हैट,
अंगात तोच हिरवागार सूट
म्हणाले कसला दुष्काळ बिष्काळ
गर्मी बिरमी सारे झूट

झोकात चालले, गड़गड़ हसले
डोळ्यात वीजा एकशे सत्तर
आणि हिरव्या हिरव्या सूटामध्ये
मृदगंधाचे उंची अत्तर

पाऊसराव आले आणि
ऑफिस सारे हलून गेले
हाताखालच्या मंडळींना
तड़का फड़की हुकुम गेले

वाऱ्यास म्हंटले आधी दरी
पहिली सगळी झाडून घे
कामास लागा, फांद्या फांद्या वरच्या
पाना पानास खबर दे

ढगांनी झाडू मारून
सगळे उन साफ केले
आणि धूपा सारखे दरीमध्ये
धुके धुके पसरून गेले

धबधब्यांना आदेश गेले,
मारा उड्या चालू व्हा
ढग घेतो आहे झाडून
तुम्ही मागुन पुसून घ्या

धरती खालच्या निजल्या बीजास
थेंब थेंब टप्पल मारून
म्हंटले सोडा आळस आता
वरती यायचे फूली फुलून

पाऊसराव आले आणि
खोळंबलेले काम झाले
समाधीतुन बाहेर येऊन
तर्रारलेला बेडूक बोले

पाऊसराव पाऊसराव
किती बरे खाल्लात भाव
तरी कसे आल्या आल्या
हिरवा करून टाकलात गाव

बिजलीच्या त्या तारां मधून
तेवढ्यात आला अर्जंट फ़ोन
पाऊसराव जमीन बोलतेय
"बायको" तुमची दुसरे कोण?

कुठे होतात इतके दिवस,
सांगा काही पटवा खूण
कुठल्या गावी कुठल्या देशी
उधळत होता आपले गुण

पाऊसराव म्हंटले नाही चिंता
जरी बायको रुसली
अहो मिठीत घेता मुठीत आली नाही
ती बायको कसली!

- संदिप खरे

Sent from my BlackBerry 10 smartphone.

Nandini Gadgilf

unread,
Jul 8, 2016, 8:28:56 AM7/8/16
to Chitra Dandekar, gsdoc...@googlegroups.com
Chitra, 
Paus  Kavita  " mast "
Nandini

Sent from my iPad
Reply all
Reply to author
Forward
0 new messages